फॉलोअर

नो युवर कस्टमर – ग्राहक ओळखा

 व्यवसायात यशस्वी व्हायचं असल्यास, ग्राहक ओळखणे हि कला आत्मसात करणे आवश्यक आहे. यास कला म्हणणेच योग्य होईल कारण जर ग्राहक आहे तर व्यवसाय आहे, हे साध सोप गणित आपल्या लक्षात यायला हवं, नाही का? एखाद्या व्यवसायाचं यश, अपयश हे फक्त ग्राहक ओळखता न येणं एवढ्यावर अवलंबून असू शकतं. ग्राहकास काय हवं हे जर आपण जाणलं (यासाठी स्वत: ग्राहक होण फायदेशीर होवू शकतं) तर आपण त्याचे उपाय तयार करू शकतो, विविध सेवा उपलब्ध करून देवू शकतो. व्यवसाय जिथे सुरु करायचा आहे तेथील लोकसंख्या शास्त्र आपल्याला बरीच मदत करू शकतं, तेच आपले ग्राहक होणार आहेत त्यामुळे तेथील लोकांच्या गरजा, विविध सेवांप्रती त्यांचे वर्तन आणि उत्पादनाच्या किमती विषयी असणारी संवेदनशीलता याचा अभ्यास व्यवसायाचे विपणन (मार्केटिंग) करण्याकामी मदतगार ठरू शकतो. ग्राहकास समजून घेणं यामध्ये त्याच्या मुलभूत, सामाजिक, भावनिक, विशिष्ट कार्यासबंधी असणाऱ्या गरजा लक्षात घेणं आवश्यक असतं. आपल्या ग्राहकांसाठी आपण जितके अधिक मूल्य तयार करू शकता तेवढे आपण व्यवसायात यशस्वी व्हाल. 

     ग्राहकास काय हवं याचा अभ्यास झाला कि त्याची टॅब्युलर स्वरूपात रचना करा, त्यांच्या गरजा, खर्च करण्याची क्षमता, त्या भागातील इतर स्पर्धक त्यांच्याकडे ग्राहक का? आकर्षिला जातोय त्याची कारणं, आणि महत्वाचं ग्राहकाची सर्वोत्तम गरज काय आहे? त्यास तुम्ही कसे पूर्ण करू शकत आहात तेच तुमच्या व्यावसायिक यशाचं गमक ठरू शकतं.व्यवसायात ग्राहकच सर्वकाही आहे परंतु प्रत्येक ग्राहक आपला नसतो हे सूत्र लक्षात ठेवावं.  

      ग्राहकाच्या नकारात्मक पैलूचा फायदा कसा घेता येऊ शकतो याकडे जातीने लक्ष देणे फायदेशीर ठरू शकते. या नकारात्मक भावना, म्हणजे अवांछित खर्च किंवा जोखीम असू शकतात जी आपल्या ग्राहकांना आधी, दरम्यान किंवा तुमच्याकडील सेवा अथवा वस्तू मिळवून घेतल्यानंतरही अनुभवतात, जसे कीः वस्तू अथवा सेवेची किंमत, वाईट भावना- निराशा अथवा त्रास, सुमार कामगिरी, भिती आणि जोखीम या सर्व गोष्टींचा विचार करावा यासाठी तुमच्या मित्रांसोबत अथवा जमल्यास एखाद्या ग्राहकासोबत चर्चा करता आली तर उत्तम, त्याच्या कडून वरील विविध विषय माहिती करून घेता येऊ शकतील आणि त्यावर उपाय करणे सोईचे होवू शकतं.

ग्राहकास नेहमी त्याच्या पैशाच अतिरिक्त मूल्य हवं असतं ग्राहकाची नेहमी व्यावसायिकांकडून कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची मागणी असते. यास पुटिंग आईस ऑन केक असं म्हणूया , हे अतिरिक्त फायदे आहेत ज्याची आपल्या ग्राहकांना अपेक्षा असू शकते, आपल्या ग्राहकांना  आपल्या कडून इच्छा असू शकतात याची सदैव जाणीव असणे आवश्यक. ग्राहकांशी संवाद ठेवणं व्यावसायिकास फायदेशीर ठरतं कारण त्याच वरून विविध बाबींची व्यावसायिक मांडणी करणं तुम्हास सोईचं होवू शकतं.

शुभेच्छांसह .....

 

अमित बाळकृष्ण कामतकर 

सोलापूर 


इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं

टिप्पण्या

  1. Nice post.KYC in banking parlance denotes legal meaning. I.e. in pre digital Era all local customers were known but not now. Entire ba k customers can visit u and situation may be complex. In clearing of cheques physical cheques are not available and photo emage on screen u ha e to paSs cheques and protect yourself from mistake or fraud.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?