पोस्ट्स

मे, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सावरकर - राष्ट्र तपस्वी

इमेज
  भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारकांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली ; परंतु काही व्यक्ती अशा होऊन गेल्या की , त्यांच्या कार्याचे मूल्यमापन त्यांच्या काळात झाले नाही आणि मृत्यूनंतरही त्यांच्याभोवती वाद , दुर्लक्ष आणि उपेक्षेचे वलय कायम राहिले. मला वाटतं विनायक दामोदर सावरकर हे त्यातील सर्वांत ठळक उदाहरण मानावे लागेल. त्यांचे संपूर्ण जीवन संघर्ष , त्याग , राष्ट्रभक्ती आणि बौद्धिक तेजाने भरलेले ; पण तरीही त्यांना तहयात आणि मृत्यूनंतरही अपेक्षित सन्मान लाभला नाही. सतत असा काही नरेटीव सेट होतो ज्यामुळे भारतीय म्हणून वेदना होतात. ज्या संपूर्ण कुटुंबाने त्यांचे आयुष्य स्वातंत्र्यासाठी, भारत भूमी साठी वाहिले त्यांना अपेक्षित सन्मान का दिला जात नाही. त्यांनी कुटुंबाची आहुती देऊन चूक केली का? की सावरकर अद्यापही आपल्याला समजले नाहीत ? असा प्रश्नही पडल्या शिवाय राहत नाही.   सावरकरांचे जीवन हे केवळ एका राजकीय नेत्याचे नव्हते , तर ते क्रांतिकारक , साहित्यिक - ( भाषेचे शुद्धीकरण आणि शब्दकोश- अवश्य पहावा आणि वाचवा ), इतिहासकार (त्यांच्या काळात उपलब्ध साहित्याच्या आधारावर त्यांनी ...

घुटमळलेलं मन

इमेज
            सकाळीच आठवणं झाली , तशी या साठी काही विशेष दिवस असे काही लागत नाही. साऱ्या गोष्टी डोळ्या समोर सहज तरळून जातात. सिनेमाच्या पडद्यावर जशा फ्लॅशबॅक स्वरूपात दाखवल्या जातात ना अगदी तशाच ! सारं काही कालच घडलं असं वाटतं, आपण हतबल होऊन फक्त वाट पाहत होतो पण नियतीला तिचा डाव साध्य करायचा होता तो तिने केला. मेंदूतील रक्तस्त्राव पूर्ण क्लिअर करणं खूप जटिल प्रक्रिया, त्यात झालेला रक्तस्त्राव क्लीन करे पर्यन्त नुकसान झालेल्या पेशी , त्यामुळे होणारे इतर परिणाम हे सारं खूप गुंतागुंतीच आहे. तरी सकाळी ऑपेरिटीव पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर म्हणाले, “खूप सहन केलं त्यांनी”, एक डॉक्टर हे म्हणतो याचा अर्थ त्या ऑपेरेटीवने होणाऱ्या वेदनांचा अंदाज त्यांना असतोच. एवढ्या वेदना सहन केल्या पण शुद्ध काही आली नाही.             तो निर्जीव पांढराशुभ्र हॉस्पिटलचा कॉरिडॉर , औषधांचा उग्र वास , डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचं गंभीर शांतत्व आणि आतून सतत धडधडणारं मन — आजही सगळं तितकंच जिवंत वाटतं. आपण बाहेर उभे , पूर्ण हतबल. हातात काहीच...

राजा शिवाजी – चित्रपट समीक्षण

इमेज
  राजा शिवाजी – चित्रपट समीक्षण भारतभूमीचे आराध्य दैवत , वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहणे म्हणजे त्यांच्या अद्वितीय पराक्रम , धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेला अर्पण केलेली एक भावपूर्ण आदरांजली होय. आज पर्यन्त अनेक चित्रपट निर्मात्यानी असा प्रयत्न केला आहे. यासाठी विविध ऐतिहासिक दस्त ऐवज वापरुन आपल्या राजांचा इतिहास मोठ्या पडद्यावर चितारला आहे. १ मे रोजी रितेश देशमुख लिखित दिग्दर्शित “राजा शिवाजी” चित्रपट प्रदर्शित झाला. तसा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायचा होता पण संध्याकाळचे तिकीट मिळालं, पण ठरविल्या प्रमाणे फर्स्ट डे पाहिला. तसा हा चित्रपट तयार होण्यास दहा वर्षाचा काळ लागला, आणि मराठी चित्रपट सृष्टीतील बिग बजेट चित्रपट ! मेगा स्टार कास्ट, भव्य सेट आणि सोबतीला कॉम्प्युटर ग्राफिक्स ! तंत्रज्ञान फार पुढे गेलं आहे, क्रोमा ग्रीनचा वापर केला की संगणकावर सारं कसं सहज साध्य होतं. चित्रपटात महाराजांचे विविध पैलू समोर येतात, महाराजांना पडद्यावर साकारण्याचे धनुष्य पेलण्याचा रितेशने प्रामाणिक प्रयत्न केला आहे. रितेश आणि त्याचे वडील यांच्यातील नाते संपूर्ण महाराष्ट्रास ...