195+ मराठी लेखांचा प्रवास: Amit Kamatkar Blog ची कहाणी
आज अनेक दिवसांनंतर ब्लॉगच्या Admin Console ला भेट दिली आणि लक्षात आलं की माझ्या ब्लॉगवर एकूण १९५ लेख वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. इंटरनेट हे माहितीचे मायाजाल म्हणतो खरे पण आपण आजवर या एवढ्या मोठ्या समूहास काय दिलं? तर अनुभव आणि ज्ञान याच्या जोरावर हे लेख ! जे कदाचित कुणासाठी प्रेरणा देऊ करतील, कुणासाठी माहितीचा खजिना म्हणून ज्ञान देऊ करतील. ज्ञान दिल्याने वाढते हेच खरे, या देण्यात जो आनंद आहे तो अनमोल आहे. स्वत:चे कौतुक म्हणून नाही पण वाचन तुम्हाला विचाराने समृद्ध करतं, नवी दिशा देतं आणि प्रेरणाही देतं, ब्लॉगला भेट दिल्यास तुम्हास देखील याची प्रचिती येऊ शकेल. “ समृद्ध ” होणं या पेक्षा काही वेगळं असेल असे नाही वाटत. समृद्धता ही केवळ संपत्ती , वैभव किंवा भौतिक सुखसुविधांची बेरीज नसून , ती जीवनाच्या व्यापक आणि सूक्ष्म पैलूंना स्पर्श करणारी संकल्पना आहे, असे मी मानतो. ब्लॉगवरील हे लेख कुण्या एकाच विषयावर नाहीत तर त्यात बॉलीवुड, सुलेखन, माहिती तंत्रज्ञान, चालू घडामोडी, प्रासंगिक, माहितीपर, करिअर विषयक, व्यावसायिक मार्गदर्शन, स्टार्टअप, अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञान विषयक, मनोगत अ...