डिजिटल मार्केटिंग हि संज्ञा आजकाल सगळीकडे वापरली जाते पण त्याची व्याप्ती समजून घेण्याची गरज आहे. बऱ्याच वेळा डिजिटल मार्केटिंग म्हणजे पेपर जाहिराती (इलेक्ट्रॉनिक मेडिया), टेलीविजन जाहिराती असा गैरसमज प्रचलित आहे. पण इंटरनेट सुविधेचा वापर करून जे मार्केटिंग केले जाते त्यास डिजिटल मार्केटिंग असे म्हणतात. या मध्ये वेब साईट, इमेल, इन्स्टन्ट मेसेजिंग, रिच साईट समरी (RSS फीड), विडीवो इ. बाबींचा समावेश असू शकतो.अर्थात सोशल नेट्वर्किंग साईटस फार मोठी भूमिका पार पाडतात. व्यक्तिगत मेसेजेस पोहोचविण्याचे काम फेसबुक व ट्विटर या सोशल नेट्वर्किंग साईट करीत असतात. डिजिटल मार्केटिंग हे जाहिरात माध्यम म्हणून आपण पाहू लागलो तर जाहिराती करण्यासाठी सर्च इंजिन्स, वेब साईट, सोशल मेडिया, मोबईल एप्स यांचा समावेश सहज करता येवू शकेल. आपण त्यातील काही प्रकार पाहूयात.. पेड सर्च : पेड सर्च किंवा पे पर क्लिक जाहिराती मध्ये एखादा ठराविक शब्द जर युजर सर्च करीत असेल तर त्या अनुषंगाने सर्वात प्रथम दाखविला जाणारा प्रायोजित परिणाम... युजर या...