तंत्रज्ञानाची कमाल
तंत्रज्ञानाचा
चमत्कार हा एक रोमांचकारी पण तितकाच सुखद अनुभव देणारा आहे. मी ब्लॉग चा वापर करण्यास
तशी सुरुवात २०१३ मध्येच केली होती परंतु कामाच्या व्यस्तते मुळे ती अव्याहत सुरु
ठेवण कठीण झाल होत. आता या महिन्यात परत प्रयत्न करतोय ब्लॉग सतत अपडेट ठेवण्याचा !
फक्त या वेळी जरा तांत्रिक बाबींकडे जास्त लक्ष दिल आणि एक सुखद आणि रोमांचकारी
अनुभूती तंत्रज्ञानाने मला दिली ....
ब्लॉग (https://amitkamatkar.blogspot.in )
लिहियला सुरु केल्यानंतर २८ जून ला पहिली पोस्ट टाकली आणि सोशल मेडिया मध्ये आवाहन
केल “ब्लॉग पहावा”, अर्थात मित्र-परिवारातून या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद मिळाला
आणि त्यानंतर आणखी चार पोस्ट (विविध विषयांवर) मी पोस्ट केल्या त्यालाही खूप
सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि पहाता पहाता पेज पाहणाऱ्यांची संख्या पाचशेच्या वर
गेली आणि हा आकडा सतत वाढतो आहे. माझ्या पोस्ट केलेल्या “सेवाभाव”या पोस्टने
काहीतासात वाचकांची “शंभरी” गाठली म्हणजे शंभर लोकांनी पोस्ट वाचली, आता तुम्ही म्हणालं
मला कस कळालं ? हा तर रोमांचकारी अनुभव आहे, या शंभर मंडळींनी माझ्या पेजवर जेवढा
वेळ घालवला त्याचा एक रिपोर्ट तयार झाला आणि हा सरासरी पाच मिनिटे एवढा काऊंट झाला
!
स्मार्ट तंत्रज्ञान काय असतं त्याची
अनुभूतीही यामुळे आली, ब्लॉग ला नव्याने भेट देण्याची टक्केवारी ६५% इतकी आहे तर
३५% टक्के लोकांनी ब्लॉगला परत (repeat
users) भेट दिली. या सोबतच ६१% लोकांनी ब्लॉग चे वाचन करणे पसंत
केले, तर ६५% लोकांनी विविध सेशन्स मध्ये ब्लॉग वाचला. (सेशन चा अर्थ – एखादी
व्यक्ती ब्लॉग वरील माहिती पाहण्यासाठी विविध लिंकचा वापर करून ब्लॉगवर थांबलेली
वेळ – time period user actively engaged in event). ब्लॉग
चे वाचक भारतात तर आहेतच पण युके, यु.एस, स्पेन, साउथ कोरिया येथूनही वाचक ब्लॉग
ला भेट देत आहेत हे पाहून स्फूर्ती मिळते. तुम्हास वाटेल कि विषय/लिखाण मराठी
मध्ये आहे तर इतर देशात ते वाचनीय असेल का तर पूर्ण लिखाण (टायपिंग)हे युनिकोड
मध्ये असल्याने सहज वाचनीय आहे आणि तितकच सहज
भाषांतर करण्याजोग सुद्धा आहे. जेवढे युजर/वाचक ब्लॉग ला भेट देतात त्यांनी ब्लॉग
किती वेळा पाहिला आणि वाचला हे अगदी त्याच्या सुरुवातीच्या वेळेपासून ते ब्राउजर
बंद करे पर्यंतच्या वेळे पर्यंत सर्व माहिती तंत्रज्ञान तुम्हाला देते आहे.
जग बोटांवर स्थिरावत आहे, ई-बुक्सचा
वापर वाढत असताना आपण या मध्ये मागे राहता कामा नये.. चला तर मग हि ई-संस्कृती
अंगीकारुयात !!
ब्लॉग ला भेट द्या - https://amitkamatkar.blogspot.in
अमित
कामतकर
Kharach sir tantadhyan vaparnaryavarti avalambun ahe ami tumchya blog vat pahato
उत्तर द्याहटवाKharach sir tantadhyan vaparnaryavarti avalambun ahe ami tumchya blog vat pahato
उत्तर द्याहटवा