फॉलोअर

डिजिटल मार्केटिंग



डिजिटल मार्केटिंग हि संज्ञा आजकाल सगळीकडे वापरली जाते पण त्याची व्याप्ती समजून घेण्याची गरज आहे. बऱ्याच वेळा डिजिटल मार्केटिंग म्हणजे पेपर जाहिराती (इलेक्ट्रॉनिक मेडिया), टेलीविजन जाहिराती असा गैरसमज प्रचलित आहे. पण इंटरनेट सुविधेचा वापर करून जे मार्केटिंग केले जाते त्यास डिजिटल मार्केटिंग असे म्हणतात. या मध्ये वेब साईट, इमेल, इन्स्टन्ट मेसेजिंग, रिच साईट समरी (RSS फीड), विडीवो इ. बाबींचा समावेश असू शकतो.अर्थात सोशल नेट्वर्किंग साईटस फार मोठी भूमिका पार पाडतात. व्यक्तिगत मेसेजेस पोहोचविण्याचे काम फेसबुक व ट्विटर या सोशल नेट्वर्किंग साईट करीत असतात.
            डिजिटल मार्केटिंग हे जाहिरात माध्यम म्हणून आपण पाहू लागलो तर जाहिराती करण्यासाठी सर्च इंजिन्स, वेब साईट, सोशल मेडिया, मोबईल एप्स यांचा समावेश सहज करता येवू शकेल. आपण त्यातील काही प्रकार पाहूयात..

पेड सर्च : पेड सर्च किंवा पे पर क्लिक जाहिराती मध्ये एखादा ठराविक शब्द जर युजर सर्च करीत असेल तर त्या अनुषंगाने सर्वात प्रथम दाखविला जाणारा प्रायोजित परिणाम... युजर या परिणामावर क्लिक करीत असल्यास / क्लिक केल्यास जाहीरातदारास पैसे द्यावे लागतात.

सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन: वेब साईट ला भेट देणाऱ्या (सर्च इंजिन द्वारे), युजरला  साईटला भेट देणे सोयीचे व्हावे या साठी सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन केले जाते. साधारणपणे गुगल या सर्च इंजिन चा वापर सर्वात जास्त केला जातो. युजर जेंव्हा एखादा कि-वर्ड गुगल सर्च इंजिन मध्ये लिहितो तेंव्हा पहिल्या पानावर दिसणाऱ्या साईटस या सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन केलेल्या असतात. एका सर्वे मध्ये असे निदर्शनास आले आहे कि ६७% क्लिक हे फक्त यादीतील पहिल्या पाच साईट ला मिळतात.

कंटेंट मार्केटिंग : साईट वर असणारा मजकूर हा फार महत्वाचा असतो. या मजकुरावर बऱ्याच बाबी अवलंबून असतात. डिजिटल मार्केटिंग करताना (मजकूर) कंटेंट मार्केटिंग हे सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन साठी सुद्धा महत्वाचे असते.कंटेंट मुळे सोशल मेडिया मध्ये जाहिरात उठून दिसते आणी ग्राहकास आकर्षित करण्यात यशस्वी होते.

सोशल मेडिया मार्केटिंग:  जेफ बुल्स डॉट कॉम या वेब साईट च्या सर्वेक्षणानुसार यु.एस. मध्ये जवळपास ४७% इंटरनेट युजर आहेत. हे  युजर्स फक्त विदिओ आणि सेल्फी साठी इंटरनेट वापरत नाहीत तर काही शिकण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी सोशल मेडीयाचा वापर करतात. साईट वरील मजकूर बऱ्याच वेळा काम करून जातो ज्यामुळे युजर साईट शी जोडला जातो आणि ग्राहक बनतो. तो स्वत:तर ग्राहक बनतोच पण त्याच्या मित्र-मैत्रणीना देखील ग्राहक बनण्यासाठी सुचवितो हे महत्वाचे !!

ई-मेल मार्केटिंग : मागील दोन दशकापासून ई-मेल हा इंटरनेट युजरचा अविभाज्य घटक आहे. ई-मेल मार्केटिंग करताना युजरला गुंतविणारा, त्याच्याशी निगडीत आणि माहिती देणारा असा मजकूर त्यामध्ये असणे हि अत्यावश्यक बाब आहे. ई-मेल मार्केटिंग यशस्वी होण्यासाठी खालील बाबी खूप महत्वाच्या आहेत. १) विश्वसनीयता २) व्यक्ती सापेक्षता  ३) संवादात्मक ४) समन्वय साधणारा आणि ५) धोरणात्मक अशा प्रकारचा ई-मेल असणे गरजेचे आहे.

मोबईल मार्केटिंग : मोबईल, आजच्या धकाधकीच्या जीवनातील अविभाज्य घटक !! मोबईल वापरत नाही असे क्वचितच कुणी असाव ! एका यु.एस. कंपनीने मोबईल वापरणाऱ्या व्यक्तींचा सर्वे केला तर त्यांना असे आढळले कि ४४% लोक झोपताना मोबईल सोबत घेवूनच झोपतात कि जेणे करून कांहीच व कोणताच मेसेज त्यांच्याकडून वाचायचा/ पहायचा राहून जावू नये. भारतातही या पेक्षा काही वेगळी स्थिती नाही. यामध्ये एस.एम.एस. ते एम.एम.एस., ऐप मार्केटिंग असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

            डिजिटल मार्केटिंग वर लिहीण्यासारख व सांगण्यासारख बरच काही आहे पण आज इथेच थांबतो पण एक आनंदाची बातमी नक्कीच शेयर करेन, आता तुमच्या कंपनीचे /इन्स्टिट्य़ूटचे / फर्म चे डिजिटल मार्केटिंग करून मिळण्याची सुविधा विद्या कॉम्प्युटर्सने देऊ केली आहे. अधिक माहितीसाठी विद्या कॉम्प्युटर्सला भेट द्या अथवा फोन करा - ९४२२०६६२८७.

हॅप्पी मार्केटिंग !!

अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर 

 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?