मायक्रोसॉफ्ट ऑफिस २०१६ ची नवीन वैशिष्ट्ये
मायक्रोसॉफ्ट ने वेळोवेळी त्यांच्या ऑफिस या एप्लिकेशन सोफ्टवेअर मध्ये बदल
घडवून ते जेवढ युजर फ्रेंडली करता येईल तेवढ करण्याचा प्रयत्न केला आहे. नवनवीन एप्लिकेशनचे
इंटेग्रेशन मायक्रोसॉफ्ट ऑफिस चा वापर जास्त आनंददायी करतात. आज पाहूयात ऑफिस २०१६
ची काही वैशिष्ट्ये –
1.
रियल-टाइम को-ऑथरिंग :- एकाच डॉक्युमेंट मध्ये आपल्या सहकाऱ्या सोबत काम करण्याची मुभा ! जे
डॉक्युमेंट शेअर पॉइंट वा वन-ड्राईव्ह वर स्टोअर केलेले असतील त्यांना एकाच वेळी
संपादित करता येते. दुसऱ्या सहकाऱ्यांने केलेले बदल लागलीच अपडेट होतात हे विशेष.
“रिअल टाईम टायपिंग” फिचर ऑन केल्यास या सुविधेचा लाभ घेता येतो.
2.
शेयरिंग सुविधा : तुमच डॉक्युमेंट तुम्हाला इतरांना सोबत शेयर करायचं असल्यास फक्त रिबन वर
देण्यात आलेल्या “शेयर”बटणावर क्लिक कराव लागेल. रियल टाईम सारखच तुमची फाईल शेअर
पॉइंट वा वन-ड्राईव्ह वर स्टोर असावी.
3.
लिंक सुविधा : ज्या
फाईल शेअर पॉइंट वा वन-ड्राईव्ह वर स्टोर केलेल्या असतील आणि फाईल साईज जास्त असेल
अशा फाईल वन-ड्राईव्ह च्या सहाय्याने लिंक मध्ये बदलून फक्त लिंक सेंड करता येईल
जेणे करून फाईल ज्यास हवी आहे त्यास लिंक ला क्लिक करून डावूनलोड करता येईल.
4.
आवृत्ती तपासणी : फाईल मध्ये दिलेल्या या सुविधेमुळे फाईल ची आवृत्ती कोणती आहे हे कळते. फाईल
कोणत्या व्हर्जन मध्ये तयार केली आहे हे तात्काळ file à history येथे क्लिक करताच युजरला समजते.
5.
स्मार्ट लुक-अप : एखाद्या शब्दाचा अर्थ अथवा पूर्ण अर्थ (full form) माहिती करून घेण्यासाठी स्मार्ट
लुक-अप मदत करेल. यासाठी ते बिंग (मायक्रोसॉफ्ट) चा वापर करेल.
6.
नवीन चार्ट चे प्रकार : एक्सेल मध्ये नवीन चार्ट ची सुविधा देण्यात आलेली आहे.नवीन चार्ट जसे ट्री-मेप,
वाटरफॉल, पेरेटो, हिस्टोग्राम इ.
7.
क्रॉस डीव्हाइस सपोर्ट : स्मार्ट फोन, tablets, यावर असणाऱ्या प्लाटफार्म (ऑपरेटिंग सिस्टमवर) तुमच
डॉक्युमेंट व्यवस्थित पाहता याव व एडीट करता याव या साठी हि सुविधा देण्यात आली
आहे.
हैप्पी लर्निंग !!!
अमित कामतकर
वाह सुंदर माहिती
उत्तर द्याहटवाNews idea digital literacy
उत्तर द्याहटवाNews idea digital literacy
उत्तर द्याहटवाExcellent Sir !
उत्तर द्याहटवा