वेबिनार म्हणजे काय ?
इंटरनेट चा वापर हा दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसतो किंबहुना तो असाच वाढत राहील यात शंकाच नाही. इंटरनेट चा वापर हा माहिती संकलन साठी असेल, गाणी ऐकण्यासाठी असेल अथवा ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी असेल अशा कोणत्याही बाबीसाठी तुम्ही करता आहात,पण तुम्हास आज मी इंटरनेट च्या सहाय्याने करता येणाऱ्या त्याच्या अजून एका वापरा संबंधी माहिती देणार आहे. कोरोना मुळे वेबिनार च्या माध्यमातून अनेक गोष्टी करता येऊ शकतात हे तुम्हीही अनुभवलेलं आहे. सध्या सुरु असलेल्या ऑनलाईन शाळा देखील याचेच एक उत्तम उदाहरण सांगता येऊ शकते. तुम्ही सेमिनार हा शब्द नक्कीच ऐकला असणार, कॉलेज मध्ये पेपर प्रेझेन्टेशन देणे हेतू सेमिनार ची तयारी करताना तुम्ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पाहिले असावे, हा सेमिनार उपस्थित जनसमुदायास दिला जातो. अगदी त्याच प्रकारे सेमिनार (ऑनलाईन) दिला जातो त्यास वेबिनार असे म्हणतात. एखाद्या नवीन विषयाची माहिती देण्यासाठी विद्यापीठातील शिक्षक एकाच वेळी सलग्नीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वेबिनार च्या माध्यमातून देवू शकतात. एखाद्या कंपनीचे विविध ठिकाणी असणारे कर्मचारी विविध कार्यालयातून एकाच वे