ads

फॉलोअर

आज वाचा

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

इमेज
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही. ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...

रॅन्समवेअर काय आहे ?



कॉम्प्युटर व्हायरस हे काही आता नवीन राहिले नाहीत. व्हायरस हे विविध प्रकारचे असतात, काही फक्त फाईल्स खराब करतात तर काही ऑपरेटिंग सिस्टम च्या वापरामध्ये खोडा घालतात तर काही कॉम्प्युटर सुरु देखील होवू देत नाहीत. जे सुरळीत चालू आहे त्यात व्यत्यय आणणे हेतू जो प्रोग्राम तयार केलेला असतो त्यास व्हायरस प्रोग्राम असे म्हणतात. आज आपण रॅन्समवेअर या व्हायरस बद्दल बरच काही सोशल मेडिया मार्फत ऐकतो,वाचतो पण रॅन्समवेअर नक्की काय आहे ? रॅन्समवेअर एक खंडणी मागणारा व्हायरस आहे.हा व्हायरस तुमच्या कॉम्प्युटर वरील डेटा गोळा करून त्याचे युजरला न समजणाऱ्या कोड मध्ये रूपांतरण करतो व डेटा लॉक करून पैशाची मागणी करणारा मेसेज दर्शविला जातो. जो पर्यंत युजर पैशाची मागणी पूर्ण करीत नाही तो पर्यंत युजरला त्याचा डेटा वापरता येत नाही, डेटा अनलॉक होत नाही. जी पैशाची मागणी केली जाते ती भारतीय रुपये मूल्य २०,००० ते ३५,००० पर्यंत असू शकते, आणि हि मागणी बीट कॉइन्स (आभासी चलन) मध्ये केली जाते ज्याचा शोध लागणे कठीण असते.

      

    रॅन्समवेअर हा तुमच्या कॉम्प्युटरवर ई-मेल अटॅचमेंट च्या स्वरूपात प्रवेश करू शकतो. जर तुम्ही एखाद्या सिक्युरिटी सर्टिफिकेट नसणाऱ्या वेबसाईटला भेट दिल्यास शक्यता आहे कि रॅन्समवेअर तुमच्या कॉम्प्युटर मध्ये प्रवेश करू शकतो; तुमच्या ब्राऊजरच्या अड्रेस बार मध्ये हिरव्या रंगा मध्ये बंद कुलुप दिसायला हवे याचा अर्थ त्या वेबसाईट कडे सिक्युरिटी सर्टिफिकेटस आहेत व ती साईट ब्राउजिंग साठी सुरक्षित आहे. बऱ्याच वेळा कालबाह्य सॉफ्टवेअर मध्ये अशाप्रकारच्या लिंक असू शकतात. तुमच्या स्मार्ट फोनवर देखील बऱ्याच जाहिराती तुम्हास पहायला मिळतात, त्यावर क्लिक करणे टाळा !! युजरने त्याच्या कडील उपलब्ध डेटा चे बॅकअप (डेटा ची दुसरी प्रत तयार करणे) घेणे हा सर्वात सुरक्षित मार्ग मला वाटतो.


तुमचे डिव्हाइस रॅन्समवेअर पासून सुरक्षित कसे ठेवाल-
१.तुमच्या डिव्हाइसवर अपडेटेड अॅन्टीव्हायरस ठेवा.
२.तुमच्या डेटा चे नियमित बॅकअप घेत चला, ते स्टोअर करताना ऑफ लाईन (इंटरनेट सुरु नसणे) असण्यास प्राधान्य द्या, असे केल्यास गुन्हेगाराना पैसे न देता देखील तुम्ही तुमचा डेटा परत मिळवू शकाल.
३.तुमचे वापरात असणारे सॉफ्टवेअर अप-टू-डेट ठेवा.
४. झिप फाईल्स, ऑफिस डॉक्युमेंट (वर्ड,एक्सेल,पॉवरपॉइंट) आदी इंटरनेट द्वारे उघडताना विशेष काळजी घ्या. अनोळखी व्यक्तीने पाठविलेले ई-मेल्स उघडू नका.
५. ब्राऊजर प्लगइन्स वापरात  नसतील तर त्यास डिसेबल (अक्षम) करा.


तुमच्या डिव्हाइसची थोडीशी काळजी घेतली तर तुम्हाला रॅन्समवेअर चा धोका टाळता येईल.


अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छावा

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

एआय शिक्षकांची जागा घेईल ?