फॉलोअर

प्रवास करणाऱ्या महिलांसाठी खास मोबईल अॅप्स



भ्रमंती करणे हे सर्वांच्याच आवडीचे असते. कधी निसर्ग भ्रमंती, तर कधी एखादे गाव, डोंगर, किल्ले आदी भ्रमंती वर पुरुष असो अथवा महिला सगळेच उत्साहात बाहेर पडतात पण येणाऱ्या अडचणी वर मात करता करता बऱ्याच जणांची दमछाक होते. अस वाटत कि या मध्ये कुणीतरी मदत करणारे हवे ज्यामुळे या अडचणी सहज दूर होवू शकतील/ येणारच नाहीत. स्मार्ट फोन हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग बनला आहे, त्यामुळे तो तरी प्रत्येक जण सोबत ठेवतोच फक्त त्याच स्मार्ट फोन वर खाली देण्यात आलेले अॅप्स डाऊनलोड केल्यास एक सहकारीच सोबत घेवून गेल्यासारखे होईल. ते कोणते अॅप्स आहेत , चला तर मग, पाहूयात-

१.गुगल ट्रान्सलेट : भारतात भ्रमंती करीत असताना हे अॅप म्हणजे एक दुभाषीच म्हणावा लागेल. तुम्हाला इतर भारतीय भाषेत काय बोलायचे आहे हे तुम्हास येणाऱ्या भाषेत लिहा/टाईप करा अॅप तुम्हाला लागलीच भाषांतर करून देईल. त्यामुळे तुमची दुभाषीकाची गरज पूर्ण करणारा अॅप तुमच्या स्मार्ट फोन वर हवाच !!

२. लीन कोड्स : हा अॅप ऑफलाईन देखील वापरता येतो, म्हणजे यास इंटरनेट चे कनेक्शन सुरु असणे बंधनकारक नाही हे या अॅप चे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. नवीन शहरात तुम्ही कोठे आहात यासाठी हा मार्गदर्शक अॅप आहे.एखाद्या शहरात जागेचे नांव कसे उच्चारावे याबद्दल देखील हा अॅप मदत करतो.

३. उबर/ओला :  हि दोन्ही नावे तुम्ही ऐकलेली असतील / तुम्हास परिचयाची असतील. नवीन शहरात ट्रान्सपोर्ट साठी तुम्ही तेथील लोकल ट्रान्सपोर्ट चा वापर करू शकता पण यामध्ये तुमचा वेळ जाण्याची शक्यता असते पण उबर / ओला यामुळे तुमचा मूल्यवान वेळ वाचू शकतो, अर्थात त्यांनी दिलेल्या सेवेमुळे हे बऱ्याचदा सिद्ध झालेले आहे. तुम्ही अद्याप हा अॅप डाऊनलोड केला नसेल तर हीच वेळ आहे हा अॅप डाऊनलोड करण्याची.

४. स्मार्ट २४ X ७ : हा सिक्युरिटी अॅप आहे. ज्याची जोडणी थेट पोलीस कार्यालयाशी करता येते.शिवाय याची एक खास बाब म्हणजे या अॅप मध्ये एक “स्पेशल पॅनिक” बटण देण्यात आलेले आहे. गरज पडल्यास हे पॅनिक बटण दाबल्यास पोलिसांशी/तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकाशी संपर्क होतो. या अॅपचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या अॅप द्वारे फोटो काढता येतात सोबत ऑडीओ / व्हिडीओ देखील रेकॉर्ड करता येतो आणि ट्रॅकिंग देखील करता येते , जे तुम्हाला नवीन जागेत सुरक्षित ठेवायला मदत करते.

५. ओ.वाय.ओ (OYO) रूम्स : तुम्ही नवीन ठिकाणी जात आहात म्हंटल कि तिकिटे, आरक्षण, रूम बुकिंग आदी बाबी प्राधान्याने करता पण काही अडचणीमुळे तुम्ही बुक केलेली रूम उपलब्ध होत नसेल तर हा अॅप तुम्हाला मदत करेल.

हे ५ अॅप्स भ्रमंतीला निघताना तुमच्या स्मार्ट फोनवर असावेत ज्याचा उपयोग तुम्हाला होवू शकतो.

हॅप्पी जर्नी !!

अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?