फॉलोअर

वेबिनार म्हणजे काय ?



इंटरनेट चा वापर हा दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसतो किंबहुना तो असाच वाढत राहील यात शंकाच नाही. इंटरनेट चा वापर हा माहिती संकलन साठी असेल, गाणी ऐकण्यासाठी असेल अथवा ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी असेल अशा कोणत्याही बाबीसाठी तुम्ही करता आहात,पण तुम्हास आज मी इंटरनेट च्या सहाय्याने करता येणाऱ्या त्याच्या अजून एका वापरा संबंधी माहिती देणार आहे. कोरोना मुळे वेबिनार च्या माध्यमातून अनेक गोष्टी करता येऊ शकतात हे तुम्हीही अनुभवलेलं आहे. सध्या सुरु असलेल्या ऑनलाईन शाळा देखील याचेच एक उत्तम उदाहरण सांगता येऊ शकते. तुम्ही सेमिनार हा शब्द नक्कीच ऐकला असणार, कॉलेज मध्ये पेपर प्रेझेन्टेशन देणे हेतू सेमिनार ची तयारी करताना तुम्ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पाहिले असावे, हा सेमिनार उपस्थित जनसमुदायास दिला जातो. अगदी त्याच प्रकारे सेमिनार (ऑनलाईन) दिला जातो त्यास वेबिनार असे म्हणतात. एखाद्या नवीन विषयाची माहिती देण्यासाठी विद्यापीठातील शिक्षक एकाच वेळी सलग्नीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वेबिनार च्या माध्यमातून देवू शकतात. एखाद्या कंपनीचे विविध ठिकाणी असणारे कर्मचारी विविध कार्यालयातून एकाच वेळी कॉन्फरन्स मध्ये एकमेकाशी चर्चा करू शकतात, असाही वेबिनार चा उपयोग करता येतो.

वेबिनार ची काही वैशिष्ट्ये :

१. सामुहिक वार्तालाप करण्याची सोय.
२. तुम्ही प्रेझेन्टेशन डाऊनलोड करू शकता आणि नंतर पाहू शकता.
३. विषयानुरूप चॅटिंग करणे शक्य.
४. प्रेझेन्टेशन करताना डिजिटल बोर्ड चा वापर करता येतो त्यामुळे मुद्दे समजावून सांगणे सहज शक्य होते.
५. विविध विषयांवरील मत प्रवाह समजून घेता येवू शकतात. काही बाबतीत सर्वेक्षण करायचे असल्यास ते देखील करता येते.
६. ऑनलाइन सेमिनार चे मुद्रीकरण देखील करता येते.
७. रेकॉर्डिंग ची सुविधा मिळते (काही प्रोग्रॅम्स सध्या क्लाउड वर हि सुविधा देऊ करत आहेत)
वेबीनार चे फायदे:
१.    सेमिनार (ऑनलाईन) सादर करणारा व ते ऐकणारा समुदाय यांच्या सोईने आयोजन शक्य.
२.    स्वत:ची जागा न सोडता देखील विविध विषयांचे सेमिनार कार्यालयातून / महाविद्यालयातून ऐकता येतात, सहभाग नोंदविता येतो. हे सगळं सध्या शक्य होताना आपण पाहत आहोत.
३.    फक्त संगणक, इंटरनेट यांची उपलब्धता असणे आवश्यक त्यामुळे हॉलचे भाडे, कॉफी ब्रेक आदी पासून मुक्ती !!
४.    वेबिनार शिक्षण, मार्केटिंग, सेल्स, कॉर्पोरेट ट्रेनिंग, मुलाखत आदी क्षेत्रामध्ये वापरता येवू शकतात.

आजच्या धावपळीच्या जगात, कोरोना सारख्या महामारीच्या काळात वेबिनार मुळे वेळ, उर्जा, परिश्रम नक्की वाचतील ज्याचा उपयोग इतर महत्वाच्या कामांसाठी करता येवू शकतो.

अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर

तळटीप :- कोरोना काळात तुम्ही वेबिनारला उपस्थित राहिला असाल/ पाहिला असेल तर मला कमेंट मध्ये सांगा.       

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?