फॉलोअर

व्यावसायिक गरजांसाठी – गुगल

गुगल हे नांव आपणां सर्वांसाठी परिचयाच आहे. इंटरनेटवर काहीही सर्च करायचे म्हंटले कि आपोआपच आपण गुगल कडे वळतो, आणि गुगल टाईप करतो, आणि हीच सवय तुम्हाला, तुमच्या नंतरच्या पिढीला लागली आहे, तपासून पहा !! लक्षात येईल. ४ सप्टेंबर १९९८ साली सुरुवात झालेल्या या कंपनीने लक्षणीय यश कमविले आहे. इंटरनेटचा वापर करीत असताना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न हि कंपनी सदैव करीत आहे, हे विशेष !!
          व्यवसाय करीत असताना ज्या ऑनलाईन गरजा असतात त्या जवळपास सगळ्या गुगल पूर्ण करीत आहे असे म्हणाल्यास वावगे होणार नाही. मग तुम्ही वापरत असलेलें ई-मेल असो, एखादे डॉक्युमेंट असो अथवा एखादी स्प्रेडशीट व प्रेझेन्टेशन असो हे सर्व गुगल पुरविते (ऑनलाईन), तुमच्या स्मार्ट फोनवर, डेस्कटॉपवर आणि लॅपटॉप वर देखील. डेटा स्टोअर करणे हेतू तुम्ही विविध पर्याय निवडता जसे कि युएसबी ड्राइव्ह (पेन ड्राइव्ह), सीडी, डीव्हीडी पण हे सर्व सोबत असणे जरुरीचे होते यावर पर्याय म्हणून गुगल ने गुगल ड्राइव्ह हि सुविधा देवू केली आहे. यामध्ये तुम्हास हवी असणारी आवश्यक माहिती स्टोअर करून ठेवता येईल आणि कुठूनही ती माहिती पाहता येवू शकेल आणि महत्वाच म्हणजे एडीट (बदल) करता येवू शकतील.
          व्यवसायास आणखी एक पूरक अॅप्लिकेशन गुगल ने देवू केले आहे, “गुगल कॅलेंडर” , ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या व्यावसायिक गाठी-भेटीच्या नोंदी यामध्ये करू शकता, सोबत आठवडावार, महिनावार नोंदी करता येवू शकतात आणि हे अॅप्लिकेशन ऑनलाईन असल्याने जिथे इंटरनेट कनेक्टिविटी आहे तिथून तुम्हाला तुमच्या नोंदी पाहता येवू शकतात. मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये समाविष्ट वर्ड, एक्सेल,पॉवरपोइंट, ला ऑनलाईन पर्याय म्हणून “गुगल सूट” चा वापर करता येवू शकतो. हे अॅप्लिकेशन स्मार्ट फोन वर देखील उघडतात त्यामुळे तुमच्या फाईल्स तुमच्या स्मार्ट फोनवर पहायला मिळू शकतात. या फाईल फक्त पाहता येतात असे नाही तर त्यात बदल (एडीट) देखील करता येतात त्यामुळे “गुगल सूट” हा ऑफिस ला पर्याय म्हणून वापरता येवू शकते.
          या शिवाय गुगल हॅंगआऊटस्, गुगल प्लस, गुगल साईटस असे विविध पर्याय गुगल ने उपलब्ध करून दिले आहेत. चला तर मग, या ऑनलाईन सेवांचा वापर करूयात !!


अमित कामतकर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?