HCL चा टेक-बी ट्रेनिंग प्रोग्राम
HCL या सॉफ्टवेअर
क्षेत्रातील अग्रेसर कंपनीने रोजगार उपलब्धी मध्ये खुप महत्वपूर्ण असे पाऊल टाकले
आहे. HCL ने मदुराई येथे १०+२ विद्यार्थ्यांसाठी सॉफ्टवेअर इंजिनियरिंग क्षेत्रात
रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. भारत सरकारच्या स्कील इंडिया
मध्ये याचे योगदान मानले जाते आहे. भारत सरकारच्या नवीन धोरणानुसार केंद्र शासन
कौशल्य विकासावर(स्कील इंडिया) आपले लक्ष केंद्रित करीत असताना खाजगी क्षेत्रातील
एका मोठ्या कंपनीने देखील यात योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे याचे खरच कौतुक
करण्यासारखे आहे. कौशल्य विकास साधता आल्यास विद्यार्थ्यास रोजगार उपलब्धी तर
होईलच सोबत विद्यार्थ्याकडे स्वयं-रोजगार सुरु करण्याची संधी उपलब्ध असेल ज्यामुळे
त्यास पैसे कमविणे सहज शक्य होईल. हे साध्य करण्यासाठी केंद्र सरकार अनेक तज्ञ
मंडळींच्या हस्ते विविध कोर्सेस सादर करीत आहेत. या प्रकल्पा अंतर्गत उमेदवारास
त्याच्या आवडत्या क्षेत्रात करिअर करता येवू शकते.बऱ्याच वेळा कौशल्य असते परंतु
रोजगार उपलब्धी होत नाही तर कधी रोजगार उपलब्धी असते पण उमेदाराकडे कौशल्य नसते
अगदी हेच या योजनेंतर्गत केंद्र सरकार बारकाईने पहात आहे.
अगदी हाच
धागा धरून HCL सारख्या सॉफ्टवेअर
क्षेत्रातील मधील मोठ्या कंपनीने १०+२ उत्तीर्ण मदुराई व जवळपासच्या भागातील
विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. मदुराई येथे शिक्षण
घेतलेल्या विद्यार्थ्यांना नौकरीसाठी शहर सोडावे लागू नये हा हेतू देखील या मागे
दडला असावा. या टेक बी कार्यक्रमात विद्यार्थी तांत्रिक दृष्ट्या तसेच व्यावसायिक
दृष्ट्या सक्षम करणे हा मुख्य हेतू आहे. सॉफ्टवेअरचे प्रगत ज्ञान घेता घेता
विद्यार्थी मास्टर प्रोग्राम ला देखील रजिस्टर करू शकतो. ज्या विद्यार्थ्याना १२
वी मध्ये ८०% पेक्षा जास्त गुण (CBSE विद्यार्थ्यांसाठी) तर ७०% पेक्षा जास्त गुण(स्टेट
बोर्ड) व गणित विषय शिकलेला असणं आवश्यक असे विद्यार्थी प्रवेशास पात्र आहेत.विद्यार्थ्यांची
निवड हि चाचणी द्वारे तसेच अॅप्टीट्युड टेस्ट आणि पर्सनल इंटरव्ह्युव द्वारे केली
जाते. HCL चा हा प्रयत्न नक्कीच विद्यार्थ्याना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास
प्रेरणा देणारा आणि सोबत उच्च शिक्षण देणारा ठरेल असा विश्वास वाटतो.
अमित कामतकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा