प्रेरणादायी मुखपृष्ठ कसे तयार करावे ?

नीला आणि निलेश दोघे सच्चे दोस्त, शाळे पासून एकत्र वाढलेले, एकत्र शिकलेले आणि एकत्रच पदवीच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला. फक्त प्रवेश घेताना निलेश ला उशीर झाल्याने निलेश ची आणि नीला ची प्रात्यक्षिक बॅच वेगळी असायची आणि मागील सुट्टीत निलेश मामाच्या गावाला गेलेला असल्याने त्याचा एम.एस.सी.आय.टी. हा कोर्स करायचा राहिला आहे. कॉलेज मध्ये एव्हाना विविध स्पर्धे संदर्भात सूचना येवू लागल्या आहेत आणि प्राध्यापक मंडळी विद्यार्थ्यांना या स्पर्धामध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित करत आहेत. नीला एक एम.एस.सी.आय.टी.यन असल्याने संगणकाच्या विविध प्रोग्राम्स चा वापर शैक्षणिक कामात अगदी योग्य प्रकारे करते. आंतर विद्यापीठ एका स्पर्धे मध्ये नीला आणि निलेश ने भाग घेतला आहे, दोघांचे वेग वेगळे ग्रुप्स आहेत. सेमिनार रिपोर्ट तयार करणे त्यासाठी विविध सर्च टूल्स चा वापर करणे या सर्व बाबी नीला ला माहिती असल्याने त्यानुसार तिने त्यांच्या ग्रुप चा रिपोर्ट चुटकीसरशी तयार देखील केला व त्यास आकर्षक मुखपृष्ठ सुद्धा दिले यामुळे तिच्या मार्गदर्शक प्राध्यापकांनी ...