पोस्ट्स

2024 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

अँग्री यंग मेन

इमेज
  “आज ! खुश तो बहोत होगे तुम” हा डायलॉगच एवढा दमदार आहे, की तो चित्रपटगृहांत ज्याने कोणी पाहिला तो त्या शॉट वर फिदा झाला नाही, तर नवलचं !! ही संवाद लेखकाची जादू तर आहेच पण तो ज्या ताकदीने अमितजींनी सादर केला आहे त्यास आजतागायत तोड नाही. ७० च्या दशका पासून ते अगदी ९० च्या दशका पर्यन्त कथा, पटकथा आणि संवाद यावर मजबूत पकड असणारे दोन मित्र ! ज्यानी बॉलीवूडला अनेक हिट्स, सुपर डुपर हिट्स चित्रपट दिले,  अनेकांचे संसार या जोडीमुळे उभे राहिले, हो संसार ! आजही ही मंडळीनी “शो” ची तिकटे सांभाळून ठेवलेली आहेत. ज्यावर त्यांची पहिली कमाई झाली , ती तिकिटे !! थोड आश्चर्य नक्कीच वाटेल पण खरं आहे. तर, दमदार संवाद, कथा आणि पटकथा याचे धनी सलीम-जावेद, यांनी चित्रपटात अनेक प्रयोग केले. “ अँग्री यंग  मॅन ” हे बिरुद अमितजीना यांच्या मुळेच मिळालं ! प्रकाश मेहरा यांना “जंजीर”च कथानक आवडलं पण या कथेत चित्रपटाच्या नायकास एकही गाणं नव्हतं, (संगीत प्रधान चित्रपटांचा काळ) त्यामुळे अनेक दिग्गज कलाकारांनी “जंजीर” नाकरला होता. त्यातच एके दिवशी महमुद यांचा “बॉम्बे टू गोवा” या चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना सलीम-जावेद ह्या

व्यवसायाची निवड आणि आवड

इमेज
  व्यवसायाची निवड आणि आवड या दोन्ही गोष्टी एकास एक संगती या प्रमाणे आहेत. व्यवसायाची आवड असल्यास निवड योग्य होवू शकते आणि व्यवसायाची निवड योग्य असल्यास त्यात आवड निर्माण होणे हे क्रमप्राप्त होते. बऱ्याच वेळा व्यवसाय हा ना-इलाज म्हणून स्विकारणारी काही मंडळी असतात, अशा परिस्थितीत व्यावसायिकता येणे खूप कठीण असतं, अर्थात हे विविध उदाहरणाने सिद्ध करता येऊ शकते, आज तो विषय नाही म्हणून मी त्यावर प्रकाश नाही टाकत. पण व्यवसाय करणाऱ्या मंडळींनी हे लक्षात घेतलं पाहिजे की “व्यावसायिकतेचा पोशाख” हा घालावाच लागेल. व्यवसायाची निवड करीत असताना सामाजिक गरज (मागणी) या विषयाकडे पाहणे मला जास्त योग्य वाटते, समाजास काय हवं आहे, कशाची मागणी होत आहे ते सहज उपलब्ध करता येऊ शकतं का? त्यावर व्यवसाय करता येऊ शकेल का? त्यातून नवोन्मेश साध्य करता आला तर म्हणतात ना सोन्याहून पिवळं !! अगदी तसच काही..... व्यवसायास करिअर म्हणून निवडताना मला आवडत, मला जमतं आणि समाजास त्याची गरज (मागणी) आहे हि त्रिसूत्री लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. याची काळजी घेतली तर निवड कधीच चुकणार नाही आणि तुमचं व्यवसायात यशस्वी होणं पक्क म्हणून

ब्रॅंडींग लीडरशिप

इमेज
  नेतृत्व गुण हा उपजत असणारा गुण म्हणून आपण पाहतो, ऐकतो, बऱ्याच वेळा आपण सहज म्हणून जातो की लहानपणा पासूनच त्याच्यात / तिच्यात नेतृत्वाची चुणूक आहे. पण आता असे नाही, नोकरी करीत असताना अथवा स्वत:चा व्यवसाय करीत असताना तुम्हाला नेतृत्व हे करावे लागेल आणि त्याच्या अनुषंगाने आवश्यक गुण आत्मसात करावे लागतील, शिकावे लागतील. आज समाजात उत्तम नेतृत्व करणाऱ्या मंडळींची वानवा दिसते. पण नोकरी करीत असताना बढती मिळते (प्रमोशन मिळते), स्वत;चा व्यवसाय सुरू केला असेल तर आशा ठिकाणी   गुणांचा कस लागतो असे माझे मत आहे. विविध टप्प्यावर तुमची निर्णय घेण्याची क्षमता, नैतिकता, प्रामाणिकपणा, सर्व समावेशक विचार, आत्मविश्वास, सहानुभूति, अनुकंपा/ कणव, सचोटी , शिकण्याची इच्छा ही गुण वैशिष्ट्य खूप महत्वाची वाटतात मला. यशस्वी नेतृत्व करण्याची क्षमता ही अनेक वेळा नेत्याच्या धोरणात्मक निर्णय घेणे , अभिप्राय ऐकणे, संघास प्रेरित करणे आणि कार्यसंघात योगदान कशा प्रकारे देऊ करतात यावर अवलंबून असते. आज आपण देशाचा विचार करीत असू तर फक्त "नेतृत्व" असे राहिले नाही, त्यास मी नेतृत्व 2.0 म्हणेन कारण आता ती फक्त लीडरशिप

संगणक प्रशिक्षणाचा रौप्य महोत्सव – विद्या कॉम्प्युटर्स

इमेज
  आज पर्यन्तचा प्रवास काही सोपा नव्हता, २५ वर्षे मार्केट मध्ये टिकून राहायचं , स्वत:चं अस्तित्व निर्माण करायचं ही काही साधी बाब नाही. अवघ्या दोन संगणकावर (286 & 386 प्रोसेसर) आणि ८० चौ. फुटाच्या हॉल मध्ये सुरू झालेला हा प्रवास आज २६ संगणक  (आय-7, आय-3 प्रोसेसर) आणि २००० चौ. फुटाच्या स्व-मालकीच्या जागेत “जुळे सोलापुरातील सर्वात मोठी, अनुभवी आणि मान्यताप्राप्त संगणक संस्था” असे बिरुद मानाने मिरवीत सुरू आहे.    संगणक शिक्षण देणारी संस्था ते दर्जेदार संगणक शिक्षण देणारी आणि करिअर घडविणारी संस्था असा नावलौकिक मिळविणे, पालक आणि विद्यार्थी यांच्या विश्वासास पात्र ठरणे कधीच सहज शक्य नव्हते. सोलापुरात संगणक प्रशिक्षण देण्याच्या एस.ओ.पी. (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर) डिफाईन करणारे विद्या कॉम्प्युटर्स हे प्रथम संगणक प्रशिक्षण केंद्र, विद्यार्थ्याने संगणक प्रशिक्षण घेण्यासाठी कोणत्याही कोर्सला प्रवेश घेतला तरी प्रत्येक कोर्स साठी विशिष्ट प्रशिक्षण प्रणाली अस्तित्वात आणली गेली, प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्याने किमान व्यावहारिक गोष्टींचा सराव  करणे अनिवार्य करण्यात आले त्यामुळे विद्यार्थी मित्र

कष्टाची शिदोरी आणि आशीर्वादाची किमया

इमेज
  आज फोटो अल्बम मध्ये डोकावताना “विद्या कॉम्प्युटर्सचा तिसरा वर्धापन दिन” पुन्हा एकदा अनुभवला !!  विद्या कॉम्प्युटर्सचा तिसरा वर्धापन दिन अर्थात ०९ फेब्रुवारी २००३, सेलिब्रेशन करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, या मध्ये प्रामुख्याने “जिल्हास्तरीय डान्स कॉम्पिटिशन” चे आयोजन आणि तेही “सुशील रसिक” सभागृहात !! सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता, “सुशील रसिक” गच्च भरलं होतं, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक , कवी स्व. व्यंकटेश कामतकर उपस्थित होते. इंस्टिट्यूट मध्ये रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती, त्यात विद्यार्थीनींनी  उत्स्फूर्त सहभाग घेतला होता, इंस्टिट्यूट येथील समोरच्या जागेत रांगोळी काढण्यात आल्या, यासाठी परीक्षक म्हणून येथील महिला मंडळातील पदाधिकारी पुढे आले आणि त्यांनी ही महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. हे सारं घडत होतं, गीतकार गुलशन बावरा यांच्या शब्दांत सांगायचं झालं तर “मिले जो कडी कडी एक जंजीर बने, प्यार के रंग भरो, जिंदा तस्वीर बने”, आज या गोष्टीस २1  वर्ष लोटली, विद्या कॉम्प्युटर्स वर विश्वास ठेवून पालकांनी त्यांच्या पाल्यास आम

हॉस्पिटॅलिटी आणि इवेंट मॅनेजमेंट उद्योग- एक उत्तम स्टार्टअप

इमेज
  हॉस्पिटॅलिटी उद्योग हा एक मोठा उद्योग आहे ज्यामध्ये करिअर करण्यासारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जे फायदेशीर ठरू शकतात. तुम्हाला फूड अँड बेवरेज मॅनेजर व्हायचे असेल असेल तर अनेक करिअर मार्ग तुम्हाला यात मिळतील. अर्थात हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट हे विविध करिअर पर्याय उपलब्ध करून देणारे क्षेत्र आज अनेक युवक मंडळींना खुणावत आहे. युवक वर्गास समूहा (लोकां) सोबत काम करण्यास सोबतच नवीन आव्हाने पेलण्याची क्षमता आणि आवड असल्यास रोज विकसित होत असलेल्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात अद्भुत संधी दडलेल्या आहेत, त्या कुतुहलाने एक्सप्लोर करायची गरज आणि मानसिकता हवी एवढचं. एक ध्यानात ठेवावं लागेल जर तुम्ही व्यवस्थापक भूमिकेत असाल तर हा एक स्पर्धात्मक उद्योग आहे, अर्थात स्पर्धां आजकाल प्रत्येक क्षेत्रात आहे. रोज बदलणाऱ्या यां जगात नवं-नव्या आव्हानास सामोरे जावं लागेल. जिद्द, चिकाटी ही गुणं वैशिष्टं जोपासावी लागतील हे मात्र नक्की !        हॉस्पिटॅलिटी अर्थात आदरातिथ्य – आतिथ्यशिलता हा उद्योग वैविध्यपूर्ण आहे यामध्ये विविध भूमिकांचा समावेश आहे. हे क्षेत्र सेवा क्षेत्रात मोडते, जसे की रेस्टॉरंट, हॉटेल उद्योग, कार्यक्