पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

ओ मेरे दिल के चैन : मजरूह सुल्तानपुरी

इमेज
हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात यशस्वी गीतकार अस म्हणालो तर वावग होणार नाही, असे ‘असरार उल हसन खान’ म्हणजेच आपल्या सर्वांचे मजरूह ! एक गीतकार, उर्दू कवी म्हणून ते सर्वांच्या परिचयाचे आहेत. जवळपास सहा दशक हिंदी चित्रपट सृष्टीत योगदान देणारे मजरूह विरळच वाटतात मला, नौशाद साहेबांपासून ते पार अलिकडील अनु मलिक, जतीन-ललित, ए.आर.रेहमान या संगीतकारांसोबत देखील मजरूह यांनी गाणी दिली आहेत. १ ऑक्टोबर १९१९ मध्ये उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे मजरूह यांचा जन्म झाला, म्हणूनच त्यांनी सुल्तानपुरी हे आडनाव लावलं. त्यांचे वडील पोलीस दलात हवालदार या पदावर कार्यरत होते. वडिलांची खूप इच्छा होती कि त्यांनी युनानी शिकावं आणि हकीम व्हावं तसा प्रयत्न देखील त्यांनी केला पण त्यांचा ओढा हा कविता लिहिण्याकडे होता आणि त्यांची हीच आवड त्यांना स्वप्न-नगरी मुंबई कडे घेवून आली. दरम्यानच्या काळात विविध संमेलनात सहभाग नोंदवीत घरखर्च पार पाडला जायचा. मजरूह साहेब जिगर मुरादाबादी यांना गुरु स्थानी मानत. त्यांच्याकडून शायरीचे धडे घेतले. १९४५ मध्ये एका कवी संमेलनामध्ये चित्रपट निर्माता ए.के.कारदार यांची नजर मजरूह यांच्यावर

ब्रेकिंग न्यूज

इमेज
टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (TRP) या साठीच आपण टेलिव्हिजन समोर असतो असचं म्हणावं लागेल. कारण प्रत्येक गोष्टीत याच टी.आर.पी. साठी सगळा खेळ सुरु असतो. यात जो जास्त पॉईंट घेतो तो टेलिव्हिजनचा बादशाह ! अर्थात न्यूज टेलिव्हिजनच्या जगात, पण हे साध्य करण्यासाठी नैतिकता नावाचा प्रकार ( त्यांच्या लेखी ) कुठे आहे हा अभ्यासाचा विषय होवून बसला आहे. सगळ्यात जास्त जाहिराती कुणी दाखवीत असतील तर ते इलेक्ट्रॉनिक मीडिया अर्थात चॅनल्स, तुम्ही पहा एखादी ब्रेकिंग न्यूज आली रे आली (आजकाल अनेक ब्रेकिंग न्यूज येतात- अगदी एकामागोमाग एक) कि हा खेळ सुरु होतो. मग एक बातमी आणि लगेच ब्रेक अस काहीतरी समीकरण असतं या मंडळींचं ! नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्राने कौल दिला त्याप्रमाणे सरकार स्थापन व्हायला हवं होतं आत्तापर्यंत पण नाही होवू शकलं, कारणं अनेक असतील पण या न्यूज चॅनल्स नी पार खेळ खंडोबा केला या बातमीचा , अस नाही का वाटतं तुम्हाला ?, पत्रकारिता हा लोकशाहीतील चौथा स्तंभ असे म्हणतात पण “सर्वप्रथम आम्हीच” या स्पर्धेत विश्वासार्हता हरवत चालली आहे, हे मात्र नक्की. या स्पर्धेत जर एखादी बातमी फ्लॅश झालीच आणि क

आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके – गीतकार समीर

इमेज
बहुत खुबसुरुत गजल लिख रहा हुं, तुम्हे देखकर आजकल लिख रहा हुं|| गीतकार समीर अनजान (शीतला पांडे) यांना आपण “समीर” म्हणून ओळखतो. गीतकार अनजान यांचे चिरंजीव, एवढीच ओळख घेवून चित्रपट सृष्टीत आलेले बँक अधिकारी समीर यांनी स्वत:ची अशी वेगळी ओळख तयार केली. किंबहुना ते त्यात यशस्वी झाले असे म्हणाल्यास आतिशयोक्ती होणार नाही. सर्वात जास्त गाणे लिहिण्याचे गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड्स समीर यांच्या नावे आहे. १७ फेब्रुवारी २०१६ रोजी त्यांना गौरविण्यात आले. सुरुवातीच्या काळात गाणी वडिलांकडून लिहून घेतली जातात असा आरोप त्यांच्यावर व्हायचा पण जेंव्हा संगीतकारा समोर बसून गाणी लिहली तेंव्हा सर्वाना पटलं कि “बॉलीवूड ला एक नवा गीतकार समीर” मिळाला. मनाला सोन्याची (सोना कितना सोना है) उपमा देणारा हा गीतकार म्हणजे अगदी सहज यमक जोडणारा जादुगार म्हणावा, १९८३ मध्ये गीतकार म्हणून नवी सुरुवात करणारे समीर यांनी लवकरच आशिकी या चित्रपटासाठी फिल्म-फेअर पुरस्कारावर स्वत:चे नाव कोरले. समीर यांनी त्यांचे वडील गीतकार अनजान ,मजरूह सुलतानपुरी आणि उस्ताद आनंद बक्षी यांना गुरु स्थानी मानले. तुम दिल कि धडकन में अस म्हणत समीर

बदलाचे साक्षीदार व्हा, पुढाकार घ्या

इमेज
गणेशोत्सव म्हणजे सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा जपणारी परंपरा, अर्थात आपण सगळेच हि परंपरा जपत असतो अस म्हणाल्यास वावगं होणार नाही. दरवर्षी श्री गणेशाच्या आगमनाची तयारी आणि विसर्जनाची देखील तेवढीच तयारी प्रत्येक जण यथासांग ज्याच्या त्याच्या परीने करीत असतो. हे करीत असताना विविध रूढी, परंपरा यांचा मान राखणं हि तेवढच महत्वाच असतं आणि हे संभाळणे कोणासही सांगणे न लगे ! बाप्पा येणारं म्हंटल कि घरात केलेली सजावट, रोषणाई ने घर तर फुलून जातच पण सार्वजनिक गणेशोत्सवात केलेल्या रोषणाई ने आसमंत खुलून जातो. हे दहा दिवस म्हणजे आनंद उत्सवाचे असतात, गणेशास काय हवयं, काय नकोय याकडे सगळेच लक्ष ठेवून असतात. दहा दिवसांचा पाहुणा म्हणून कि काय, त्याच्यावर असणारी श्रद्धा म्हणा नाहीतर त्याच्यावरील प्रेम म्हणा किंवा आपल्या हक्काचा , जवळचा भासणारा ईश्वर म्हणा या सगळ्यामुळे खूप काळजी घेतली जाते. परमतत्व ओंकाराचे साक्षात स्वरूप असे गणेशतत्व हे श्री गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत पृथ्वीवर मुबलक प्रमाणात असतं त्याची भक्ती केली कि त्याचा आशीर्वाद लाभतो, तोच सुखकर्ता आणि तोच दुखहर्ता त्यामुळेच आपण सर्वजण दरवर

ये जो पब्लिक है, यह सब जानती है

इमेज
कोणत्याही प्रकारच्या राजकारणावर मत व्यक्त करण्या एवढा माझा अभ्यास नाही, पण ज्या प्रकारची परिस्थिती सध्या भारतीय राजकारणात दिसत आहेत, घडतं आहेत त्यावर व्यक्त व्हावे या उद्देशाने हा लेख प्रपंच ! ! २०१४ च्या लोकसभेत भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांना मताधिक्य मिळाले आणि भाजपा चे सरकार सत्तेत आले. देशास मा.नरेंद्र मोदींच्या रूपाने चतुरस्त्र व्यक्तिमत्व असणारे पंतप्रधान मिळाले. त्यांनी त्यांच्या पाच वर्षाच्या कालखंडात केलेल्या कामाच्या जोरावर जनतेने पुन्हा २०१९ मध्ये प्रचंड बहुमताने भाजपास निवडून दिले आणि पुन्हा सत्ता भाजपाचीच आली, भारताच्या इतिहासात अनेक वर्षानंतर एकाच पक्षास बहुमत मिळाले होते. मला आठवते २१ जून १९९१ मध्ये जेंव्हा मा.पी.व्ही.नरसिंहराव पंतप्रधान झाले होते त्यावेळी एका जाहीर सभेत त्यांनी एक विधान केले होते, कि या देशास फक्त कॉंग्रेसच स्थिर सरकार देवू शकते आणि लोकसभेचा कार्यकाळ पुर्ण करू शकते”, पण जनतेने ज्याप्रमाणे २०१४ आणि २०१९ मध्ये कल दिला ते पाहता जनताच खरी राजा, “ये जो पब्लिक है, यह सब जानती है”, उस्ताद आनंद बक्षी यांच्या गीताप्रमाणे मा.नरसिंहराव यांचा दावा पुरता मोड

ए भाई जरा देख के !!

इमेज
वाहतुकीचे नियम हे पाळण्यासाठी असतात हेच मुळी आपल्याला रुचत नाही. काय होतं? हा जो फाजील आत्मविश्वास आहे तो बऱ्याच वेळा घातक ठरतो. मग अनुज्ञाप्ती (लायसन्स) नसतानाही वाहन चालविणाऱ्या छोटे सरकार ते घरातील कर्तबगार व्यक्ती अशा अनेकांमध्ये असाच आविर्भाव पहायला मिळतो. थांबा असा सिग्नल लागलेला असताना देखील जायची प्रचंड घाई असणारे असोत कि सिग्नल सुटायच्या आधीच वाहन दामटणारी प्रचंड व्यस्त (बरोबर ओळखलतं, मोबाईल वर व्यस्त असणारी) मंडळी असोत या सगळ्यांसाठी श्री.यमराज विश्रांती घेत असतात त्यामुळेच आत्मविश्वासाचे रुपांतर फाजील आत्मविश्वासात होते. हे सगळं खूप भयंकर आहे असं नाही का वाटतं? आपण किती जरी व्यवस्थित वाहन चालवीत असलो तरी समोरून येणारे वाहन चालविणारा कसा वाहन चालवितो यावर देखील बरेच अवलंबून असते म्हणूनच सर्वांनीच नियमांची पायमल्ली थांबवावी.               सोलापूर जिल्ह्याशी जोडले जाणारे राष्ट्रीय महामार्ग नवीन रुपडं घेवून सेवेत तयार होत आहेत, हे आपण जाणतोच, त्याचप्रमाणे हे महामार्ग विविध आव्हानं देखील सोबत आणत आहेत कि काय? अस वाटतं. तस पाहिलं तर अपघातांची मालिका कमी होण्यास मदत नक्की ह

श्रवणीय उदित

इमेज
उदित नारायण झा, आपण ज्यांना गायक उदित म्हणून ओळखतो, अनेक चित्रपटातील नायकांचे पडद्यावरील आवाज, उदित यांच्या आवाजात एक जादू आहे जी आजही त्यांच्याकडे आकर्षित करते,गाण कोणतही असो आवाज उदित यांचा असेल तर ते गाण आपसूकच ओठांवर कधी रुळतं आपल्यालाही कळत नाही. उदित यांचा जन्म १९५५ साली बिहार मधील बासी (एका मुलाखतीत सांगितल्या प्रमाणे) या गावात झाला. १९७० मध्ये त्यांनी मैथिली,नेपाळी आणि भोजपुरी भाषेत गायन केले आणि ७० च्या अखेरीस जेंव्हा उदित मुंबई येथे आले तेंव्हा त्यांनी भारतीय विद्या भवन येथे सहा वर्ष शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले.बॉलीवूड मधील अनेक गायकांचे श्रद्धा स्थान, गुरुस्थानी असणारे श्री.मो.रफी हे यांचे गुरु, त्यांच्याकडे पाहूनच गायनाचे धडे गिरविणारे उदित, यांनी उमेदीच्या काळात नेपाळ रेडीओ वर देखील आपले योगदान दिले त्या नंतर १९८० साली मो.रफी यांच्या सोबत बॉलीवूड मधील त्यांचे पहिले गाणे गायले, हि संधी त्यांना संगीतकार राजेश रोशन यांनी “उन्नीस बीस” या चित्रपटासाठी दिली. याच दरम्यान किशोर दां सोबत देखील उदित यांनी गाणे गायले पण हा काळ त्यांच्या साठी खूप कठीण होता, एखाद्या स्ट्रगल