पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ads

फॉलोअर

आज वाचा

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

इमेज
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही. ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...

व्हायरस पासून संरक्षण

इमेज
          नीलिमा शहरातील एका फायनान्शियल कंपनीत नोकरीस आहे, तिने तिच्या कॉम्प्युटरवर ऑफिसचा सर्व डेटा स्टोअर केला आहे आणि रोजच्या रोज ती त्याचा बॅकअप देखील घेते. एके दिवशी नेहमीप्रमाणे ऑफिस आल्यावर ती तिच्या कामात व्यस्त झाली आणि तिचे ऑफिसच्या विविध फाईल्स चे संगणकीकरण करणे सुरु होते तेवढ्यात तिचे लक्ष शेजारील डेस्क वरील प्रणाली कडे गेले, तिच्या अस लक्षात आल कि प्रणाली बराच वेळ झाला काहीच काम करत नाहीये, तिने लागलीच प्रणालीला विचारल, “का गं प्रणाली, काय झाल?”, आज काय मूड नाही का काम करायचा? यावर प्रणाली म्हणाली, “नाही गं, नीलिमा, अस काही नाही पण माझ्या कॉम्प्युटरवरील फाईल्स ओपन होत नाहीत त्यामुळे टेन्शन आल आहे.”            नीलिमा ने प्रणालीला तिच्या कॉम्प्युटर चा पासवर्ड मागितला आणि तिच्या कॉम्प्युटरवर ती फाईल्स ओपन होतात का ते पाहू लागली. तिच्या लक्षात आले कि ज्या प्रोग्राम मध्ये फाईल्स तयार केलेल्या आहेत तोच प्रोग्राम ओपन होत नाहीये!! ती लागलीच प्रणाली ला म्हणाली, अग तुझ्या कॉम्प्युटर वर...

WhatsApp बंद होणार

इमेज
  घाबरू नका .... पण हे खरे आहे. कांही स्मार्ट फोन साठी ०१ जानेवारी २०२१ पासून   WhatsApp आपली सेवा बंद करणार आहे. WhatsApp हा मोबाईल (स्मार्ट फोन) वापरणाऱ्या मंडळींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्याच्याशिवाय मोबाईलचा वापर हि संकल्पनाच पचनी पडत नाही. अर्थात तंत्रज्ञाचा वापर करणे कुठे थांबावे हे देखील आपल्याला कळायला हवे.. या पूर्वी ३१ डिसेंबर २०१६ ला काही स्मार्ट फोन वरील WhatsApp बंद झाले तशीच घोषणा WhatsApp ने आता पुन्हा केली आहे.           WhatsApp हा इन्स्टंट    मेसेंजर वापरला जातो विविध प्रकारचे मेसेजेस पाठविण्यासाठी , त्यात टेक्स्ट , ग्राफिक , मल्टी-मेडिया मेसेज देखील आले. या मेसेंजर च्या सहाय्याने आपण आपल्या भावना आपल्या मित्र-मैत्रिणी , नातेवाईकांपर्यंत पोहोचवितो. पूर्वी अर्थात २०१६ मध्ये जर तुमचा स्मार्ट फोन एन्ड्रॅाईड   2.१   किंवा 2.2 व्हर्जन चा होता , अथवा ब्लॅक-बेरी 10 ,  Nokia S40, Nokia Symbian S60 ,  iOS6 Windows Phone 7.1  तर तुम्हाला दुसरा पर्याय पहावा लागेल असे सांगण्यात आले...

पद्मश्री मो.रफी

इमेज
“ना फन्कार तुझसा तेरे बाद आया, मो.रफी तू बहोत याद आया”, १९९० साली प्रदर्शित झालेल्या क्रोध या चित्रपटातील हे गीत जे गायलं होत मो.अझीझ यांनी, या गीतातून रफी साहेबां विषयी एक प्रकरची कृतज्ञताच व्यक्त केली अस म्हणावे लागेल. आणि हे खरही आहे रफी साहेबां सारखा दुसरा गायक ना परत जन्माला आला ना परत येईल. रफींच्या आवजाशी साधर्म्य असणाऱ्या मध्ये शब्बीर कुमार, अन्वर, मो.अझीझ पासून थेट सोनू निगम पर्यंत हा प्रवास आहे, अजूनही काही गायक असतील हि..... पण या गायकांना प्रसिद्धी मिळाली. या गायक कलाकारांनी रफी साहेबांचा आवाज म्हणून बरेच ऑर्केस्ट्रा केले, चित्रपट केले. रफी यांना आपल्यातून जावून ४० वर्षे झाली. पण अजूनही “तेरे आने कि आस है दोस्त, तू कही आस पास है दोस्त” या त्यांनीच गायलेल्या गीता प्रमाणे ते आपल्या अवतीभवती आहेत असच वाटतं. तेरे आने कि.... हे रफी यांनी रेकॉर्ड केलेले शेवटचे गीत..... एका कार्यक्रमात अपघाती संधी मिळाली आणि तो रफी यांचा पहिला कार्यक्रम म्हणावा लागेल. या कार्यक्रमात के.एन.सेहगल येणार होते पण ऐनवेळी लाईट गेली आणि आयोजकांना काय करावे सुचेना इतक्यात कुणीतरी रफी यांना गायला सुचविले, त...

ज्ञानवर्धन

इमेज
            रमेश या वर्षी पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे, त्याला पदवीधर झाल्यावर नोकरी लागणे हेतू ज्ञान मिळवायचे आहे पण ते कसे मिळवावे हे त्याच्या लक्षात येत नव्हते, त्याला वाटे आपल्याकडे जे काही ज्ञान आहे किंवा हि पदवी संपादन करताना मिळाले ते नोकरी लागताना अथवा बाहेरच्या जगात वावरताना कमी पडू नये ! त्यासाठी तो नेहमी विविध माध्यमातून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करायचा, असेच एक दिवस, याच प्रयत्नात असताना त्याची भेट महेश शी झाली. महेश मागील वर्षी पदवीधर झाला होता आणि आता एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर काम करीत होता. हे रमेशला माहिती होते, त्याने लागलीच महेश शी हस्तांदोलन केले आणि त्यास म्हणाला, “अरे महेश, पदवी सोबत अजून ज्ञान वाढविण्यासाठी तू काय केले होते, मलाही थोड मार्गदर्शन कर ना ! यावर महेश उत्तरला, “रमेश, तुला नक्की कशाप्रकारचे ज्ञान वाढवायचे आहे, म्हणजे सॉफ्टस्कील हवेत कि तुझ्या पदवी शिक्षणातील अत्याधुनिक बदल तुला जाणून, शिकून घ्यायचे आहेत ? हे आधी मला सांग यावर रमेश म्हणाला , “मला माझ्या पदवी अभ्यास क्रमाशी सबंधित बदल जाणून...

सोशल मीडिया- उघडा डोळे समजून घ्या नीट !

इमेज
  आज कॉम्प्युटर चे ज्ञान नसणारा अशिक्षित समजला जातो अस आपण ऐकतो आणि मानतो देखील, त्यामुळेच असावं कदाचित, माणूस जसं जमेल तसं कॉम्प्युटर आणि त्या अनुषंगाने येणारे तंत्रज्ञान वापरत असावा बहुतेक ! कदाचित तुम्ही सहमत नसाल पण सर्व्हेक्षण तर असचं सांगतं कि “मला वापरता येत नाही”, अस सांगणारे फारच कमी !! आता हेच पहा ना, तुम्ही फेसबुक वर आहात कां? याचं उत्तर १० पैकी ७ लोकांनी होकारार्थी दिल पण हि ७ मंडळी फेसबुक कसं वापरतात हा अभ्यासाचा विषय आहे, त्यांना एवढचं माहिती असतं ,”फक्त लाईक” ठोकायचा, पोस्ट काय आहे हे पहायचं नाही, विनोदाचा भाग म्हणून सांगतो एखाद्या दु:खत बातमीला हि काही मंडळी लाईक ठोकतात!! तो लाईक का दिलेला असतो हा मात्र संशोधनाचा विषय !       पोस्ट लाईक कशी करायची हे शिकवावं लागत नाही पण चित्रास मिळणारी पसंती हि मजकुरास मिळणाऱ्या पसंती पेक्षा जास्त असते, कारण “वाचाल तर वाचाल” हे शाळेत होत, शाळा संपली पाटी खरोखरच फुटली ! अशी काहीशी परिस्थिती आजकाल पहायला मिळते, खर तर सोशल मीडिया साईटस्, ब्लॉग हि सर्व वाचनीय होवू शकतात (नव्हे आहेतच, फक्त आपल लक्ष नसतं) असा व...

लेट हिम गो पीसफुली...

इमेज
रुग्णालयात डॉक्टर म्हणतात, लेट हिम गो पीसफुली ......म्हंटल तर चार शब्द पण काळजाचा ठोका नक्की चुकवू शकतील असे आहेत, खरं तर अनंताचा प्रवास सुरु करण्याची परवानगी देणारे आपण कोण? पण डॉक्टर जेंव्हा हे रुग्णांच्या नातेवाईकांना सांगतात तेंव्हा मेडिकली सर्व प्रयत्न करून झालेले असतात आणि कोणत्याही चमत्काराची आशा उरलेली नसते असे आपण समजावे, अशीच स्वत:ची समजूत काढलेली योग्य ! रुग्णालयातील भिंतीनी हे शब्द अनेकदा ऐकलेले असतात, बदलतात ते फक्त ऐकणारे चेहरे. शब्द कानावर पडता क्षणी रुग्णालयातील सर्वच बाबी या दिखाव्याच्या आहेत असे भासू लागते, त्याच्या मर्यादा दिसू लागतात, रुग्णालयात भरती झाल्यापासून ओळखीचे झालेले चेहरे (डॉक्टर, सिस्टर, ब्रदर यांचे) अचानक अनोळखी भासू लागतात,   खरंतर रुग्णाची सेवा या मंडळींनी केलेली असते, भलेही तो त्यांच्या नोकरीचा एक भाग का असेना पण त्यांचं कर्तव्य त्यांनी पार पाडलेलं असतं. रुग्णास लावलेली उपकरणं ज्याचा आता काहीच उपयोग नाही हे स्पष्ट झालेलं असतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणूस किती पराधीन आहे याची झालेली जाणीव, हि जाणीव खूप यातना देणारी असते. रुग्णालयातील लोक आणि ना...

होप यु अंडरस्टँन्ड

इमेज
  मुलं हि एक संपत्ती असतात अस म्हणालो तर वावगं होणार नाही, अर्थात इथे संपत्ती चा अर्थ आर्थिक असा न घेता तो “निसर्गाने दिलेली देणगी (बिनव्याजी)” असा घेतला तर योग्य होईल. मुलांचही एक वेगळं अस्तित्व असतं, त्यांनाही त्यांची मत असतात हे पालकांनी समजून घेतलं तर खूप गोष्टी सहज होतात, पालकांच्या म्हातारपणात ज्यास आपण दुसरे बालपण म्हणतो त्यावेळी मुलांची जबाबदारी वाढते आणि मुलांना आई-बाबा चा रोल करावा लागतो आणि त्यांनी तो त्यावेळी करावा (अपेक्षा नाही फक्त एक सूचना). तिथे कुठेही तराजू घेवून बसू नये. कारण मुलास लहानपणी घोडा-घोडा करताना बापानी ‘मुलगा मला सांभाळेल का’ असा विचार केला नव्हता, त्यात प्रेम होतं, माया होती आणि सर्वात महत्वाचं आपले पणा होता, माझ लेकरू !! हा भाव होता, आजकाल च्या धावपळीच्या जगात हा “आपलेपणा” कुठे तरी हरवतो आहे अस वाटतं. कुठेतरी वाचलं होत कि “मी, माझ” हा भाव खूप धोकादायक असतो यातून बाहेर पडण खूप कठीण पण प्रत्येक बाबतीत असणारी आशा हि “वेडीच” असते आणि इच्छांना मर्यादा नसते, एक झाली एक हे चक्र सुरूच राहतं त्यास अटकाव जर कुणी घालत असेल तर तो साक्षात यम ! तो हे करू शकतो कारण ...