फॉलोअर

ज्ञानवर्धन

 


          रमेश या वर्षी पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे, त्याला पदवीधर झाल्यावर नोकरी लागणे हेतू ज्ञान मिळवायचे आहे पण ते कसे मिळवावे हे त्याच्या लक्षात येत नव्हते, त्याला वाटे आपल्याकडे जे काही ज्ञान आहे किंवा हि पदवी संपादन करताना मिळाले ते नोकरी लागताना अथवा बाहेरच्या जगात वावरताना कमी पडू नये ! त्यासाठी तो नेहमी विविध माध्यमातून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करायचा, असेच एक दिवस, याच प्रयत्नात असताना त्याची भेट महेश शी झाली. महेश मागील वर्षी पदवीधर झाला होता आणि आता एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर काम करीत होता. हे रमेशला माहिती होते, त्याने लागलीच महेश शी हस्तांदोलन केले आणि त्यास म्हणाला, “अरे महेश, पदवी सोबत अजून ज्ञान वाढविण्यासाठी तू काय केले होते, मलाही थोड मार्गदर्शन कर ना ! यावर महेश उत्तरला, “रमेश, तुला नक्की कशाप्रकारचे ज्ञान वाढवायचे आहे, म्हणजे सॉफ्टस्कील हवेत कि तुझ्या पदवी शिक्षणातील अत्याधुनिक बदल तुला जाणून, शिकून घ्यायचे आहेत ? हे आधी मला सांग यावर रमेश म्हणाला , “मला माझ्या पदवी अभ्यास क्रमाशी सबंधित बदल जाणून घ्यायचे आहेत, जग ज्या प्रमाणे बदलत आहे, इंडस्ट्री ज्या प्रमाणे बदलत आहे त्याप्रमाणे मी माझे ज्ञान देखील अद्ययावत ठेवेणे आवश्यक आहे.” , महेश , मला मदत करशील ? यावर महेश लागलीच म्हणाला, का नाही रमेश, नक्की मदत करेन. तुला विविध पद्धतीने ज्ञानार्जन करता येईल.

१.      ऑनलाईन शिक्षण पद्धती :   या शिक्षण पद्धती आज तुला पदवी देखील मिळविता येते. ऑनलाईन पद्धती मध्ये मोड्यूलर कोर्सेसउपलब्ध असतात. त्यास नोंदणी करून तुझ्या सोयीच्या वेळेत तू कोर्स पूर्ण करू शकतोस.

२.      गुगल: हे एक सर्च इंजिन आहे. तुला अभ्यासात असणाऱ्या विविध शंकांचे निरसन तु गुगलचा वापर करून करू शकतोस. गुगल हा एक उत्तम मित्र होवू शकतो हे नक्की फक्त मिळालेली माहिती तपासून  घ्यावी लागेल.

३.      ऑनलाईन समुदाय : शिकण्यासाठी तुला सतत प्रश्न पडायला हवेत आणि त्या प्रश्नांची उकल व्हायला हवी यासाठी ऑनलाईन समुदाय (Online Community) बरीच मदत करू शकतो. तुला पडणारे प्रश्न या समुदायात मांडावेत आणि समुदायातील सदस्यांनी त्यावर चर्चा करावी याने देखील ज्ञानार्जन होते.

          ऑनलाईन सर्च, ऑनलाईन कोर्सेस, आणि प्रश्न विचारण्याची आवड यामुळे तुझ्या ज्ञानात भर पडेल, याची मला खात्री आहे, महेश म्हणाला. ही सर्व माहिती मिळाल्यामुळे रमेश आनंदात होता. त्याने लागलीच  टूल्सचा वापर करण्याचे ठरविले आणि ज्ञानवर्धन करण्यास सुरुवात देखील केली.

तुम्हाला आवड असणाऱ्या क्षेत्रातील ज्ञान वाढविणे हेतू तुम्ही देखील या टूल्स चा वापर करावा.

 अधिक माहिती हवी असल्यास कमेंट मध्ये प्रश्न लिहावा विद्या कॉम्प्युटर्स तर्फे आपणांस याचे मार्गदर्शन करण्यात येईल. 

हॅप्पी लर्निंग.

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर       

इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?