WhatsApp बंद होणार
घाबरू नका .... पण हे खरे आहे. कांही स्मार्ट फोन
साठी ०१ जानेवारी २०२१ पासून WhatsApp आपली सेवा
बंद करणार आहे. WhatsApp हा मोबाईल (स्मार्ट फोन) वापरणाऱ्या मंडळींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्याच्याशिवाय मोबाईलचा वापर हि संकल्पनाच
पचनी पडत नाही. अर्थात तंत्रज्ञाचा वापर करणे कुठे थांबावे हे देखील आपल्याला
कळायला हवे.. या पूर्वी ३१ डिसेंबर २०१६ ला काही स्मार्ट फोन वरील WhatsApp
बंद झाले तशीच घोषणा WhatsApp ने आता पुन्हा केली
आहे.
WhatsApp हा इन्स्टंट मेसेंजर वापरला जातो विविध प्रकारचे मेसेजेस पाठविण्यासाठी, त्यात टेक्स्ट, ग्राफिक, मल्टी-मेडिया मेसेज देखील आले. या मेसेंजर च्या सहाय्याने आपण आपल्या भावना आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांपर्यंत पोहोचवितो. पूर्वी अर्थात २०१६ मध्ये जर तुमचा स्मार्ट फोन एन्ड्रॅाईड 2.१ किंवा 2.2 व्हर्जन चा होता, अथवा ब्लॅक-बेरी 10, Nokia S40,
Nokia Symbian S60, iOS6 Windows Phone 7.1 तर तुम्हाला दुसरा पर्याय पहावा लागेल असे सांगण्यात आले होते. त्याच प्रमाणे आता आयफोन 4 आणि इतर मॉडेल्स वरून WhatsApp सेवा बंद करणार आहे. जर तुमच्याकडे iPhone 4S, 5, 5S, 5C, 6 आणि 6S असेल तर तुम्हाला iOS9 व्हर्जनला अपडेट केल्यास WhatsApp वापरता येईल. तुमच्या स्मार्ट फोन वर एन्ड्रॅाईड चे कोणते व्हर्जन आहे हे पडताळून पहा. व्हर्जन पहायचे असल्यास तुमच्या स्मार्ट फोन च्या सेटिंग्ज मध्ये जा त्यात about device असा पर्याय असेल त्यात एन्ड्रॅाईड चे व्हर्जन कोणते आहे ते पहा.. ते 4.0.3 पेक्षा जुने व्हर्जन असल्यास WhatsApp या फोन्स वर चालणार नाही. अशा फोन युजर्स नी गरज असल्यास त्यांचे chat बॅक अप ०१ जानेवारी २०२१ पूर्वी करून घ्यावे.- Whatsapp उघडा – उजव्या कोपऱ्यात तीन उभे डॉट दिसतील तिथे क्लिक करा.
- Settings हा पर्याय निवडा
- नंतर Chats हा पर्याय निवडा
- या मध्ये तुम्हाला “चॅट बॅकअप” असा पर्याय दिसेल
- हा बॅक अप तुमच्या जी-मेल च्या इ-मेल अकाऊंटला स्टोअर होईल.
- ज्याचा उपयोग तुम्हाला गरज असल्यास नंतर करता येईल.
हे करीत असताना काही अडचण आल्यास तुम्ही विद्या कॉम्प्युटर्सला
संपर्क करू शकता. विद्या कॉम्प्युटर्स तुम्हाला बॅक अप घेण्यास सहकार्य करेल.
https://vidya-computers.business.site-
इथे भेट द्या आणि “Call Now” पर्याय निवडा.
अमित बाळकृष्ण
कामतकर
सोलापूर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा