सोशल मीडिया- उघडा डोळे समजून घ्या नीट !
आज कॉम्प्युटर चे
ज्ञान नसणारा अशिक्षित समजला जातो अस आपण ऐकतो आणि मानतो देखील, त्यामुळेच असावं
कदाचित, माणूस जसं जमेल तसं कॉम्प्युटर आणि त्या अनुषंगाने येणारे तंत्रज्ञान वापरत
असावा बहुतेक ! कदाचित तुम्ही सहमत नसाल पण सर्व्हेक्षण तर असचं सांगतं कि “मला वापरता
येत नाही”, अस सांगणारे फारच कमी !! आता हेच पहा ना, तुम्ही फेसबुक वर आहात कां?
याचं उत्तर १० पैकी ७ लोकांनी होकारार्थी दिल पण हि ७ मंडळी फेसबुक कसं वापरतात हा
अभ्यासाचा विषय आहे, त्यांना एवढचं माहिती असतं ,”फक्त लाईक” ठोकायचा, पोस्ट काय
आहे हे पहायचं नाही, विनोदाचा भाग म्हणून सांगतो एखाद्या दु:खत बातमीला हि काही
मंडळी लाईक ठोकतात!! तो लाईक का दिलेला असतो हा मात्र संशोधनाचा विषय !
पोस्ट लाईक कशी करायची हे शिकवावं लागत नाही पण चित्रास मिळणारी पसंती हि मजकुरास मिळणाऱ्या पसंती पेक्षा जास्त असते, कारण “वाचाल तर वाचाल” हे शाळेत होत, शाळा संपली पाटी खरोखरच फुटली ! अशी काहीशी परिस्थिती आजकाल पहायला मिळते, खर तर सोशल मीडिया साईटस्, ब्लॉग हि सर्व वाचनीय होवू शकतात (नव्हे आहेतच, फक्त आपल लक्ष नसतं)
असा वाचक वर्ग देखील तयार होतो आहे जे ई-बुक्स वाचतात, तुमच्या स्मार्ट फोन चा अथवा कॉम्प्युटरचा वापर हा अशा कारणांसाठी करणे जास्त संयुक्तिक ठरेल असे सुचवावे वाटते, नाहीतर गेम्स आणि व्हिडीओ आहेतच सोबतीला !! दुसरी एक गम्मतशीर बाब आहे, मजकूर पोस्ट जर छोटी असेल (त्यासही
मोजमाप आहे बर कां !) तर ती वाचली जाते, मजकूर पोस्ट जेवढी मोठी तेवढी ती वाचली
जाईल यात शंका घेतली जावू शकते. अर्थात काही स्वानुभव आणि काही अभ्यासलेली
सर्व्हेक्षणं, परिस्थिती इतकीही वाईट नाही जेवढी दिसते सोशल मीडीया / ऑनलाइन वर
वाचक भेटतात का तर त्याचं उत्तर होकारार्थीच देता येईल. पण खरचं एखादं प्रशिक्षण
आवश्यक आहे का? सोशल मीडीया कसा वापराल या विषयावर तर “हो”, याची नितांत आवश्यकता
आहे, मग फेसबुक असेल, whatsapp असेल अथवा इतर सोशल मीडिया साईटस् असतील, यांचा वापर
कसा करायचा याचं प्रशिक्षण घ्यावे, असेच या निमित्ताने सुचवावे वाटते. या सर्व
बाबी वापरताना कायद्याचा अभ्यास (जास्त नाही पण थोडा तरी) असणे आवश्यक आहे. आय.टी.अॅक्ट
२००० थोडा परिचय करून घ्या आणि वापरा सोशल मेडिया अगदी दिलखुलास पणे !
सोशल मीडिया कसा वापरावा ? या
विषयावर आपणास मार्गदर्शन हवे असल्यास कमेंट मध्ये लिहा “मार्गदर्शन-तुमचा मोबाईल
क्रमांक”.
हा उपक्रम #ASK VIDYA या नावाने विद्या कॉम्प्युटर्स इन्स्टिट्यूटच्या
माध्यमातून घेत आहे.
#ASK VIDYA
#I can make a difference
अमित
बाळकृष्ण कामतकर
सोलापूर
परगावच्या
वाचकांसाठी ई-मेल- vidya.comp@rediffmail.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा