व्हायरस पासून संरक्षण
नीलिमा शहरातील एका फायनान्शियल कंपनीत
नोकरीस आहे, तिने तिच्या कॉम्प्युटरवर ऑफिसचा सर्व डेटा स्टोअर केला आहे आणि
रोजच्या रोज ती त्याचा बॅकअप देखील घेते. एके दिवशी नेहमीप्रमाणे ऑफिस आल्यावर ती
तिच्या कामात व्यस्त झाली आणि तिचे ऑफिसच्या विविध फाईल्स चे संगणकीकरण करणे सुरु
होते तेवढ्यात तिचे लक्ष शेजारील डेस्क वरील प्रणाली कडे गेले, तिच्या अस लक्षात
आल कि प्रणाली बराच वेळ झाला काहीच काम करत नाहीये, तिने लागलीच प्रणालीला विचारल,
“का गं प्रणाली, काय झाल?”, आज काय मूड नाही का काम करायचा? यावर प्रणाली म्हणाली,
“नाही गं, नीलिमा, अस काही नाही पण माझ्या कॉम्प्युटरवरील फाईल्स ओपन होत नाहीत
त्यामुळे टेन्शन आल आहे.”
नीलिमा ने प्रणालीला तिच्या कॉम्प्युटर चा पासवर्ड मागितला आणि तिच्या कॉम्प्युटरवर ती फाईल्स ओपन होतात का ते पाहू लागली. तिच्या लक्षात आले कि ज्या प्रोग्राम मध्ये फाईल्स तयार केलेल्या आहेत तोच प्रोग्राम ओपन होत नाहीये!! ती लागलीच प्रणाली ला म्हणाली, अग तुझ्या कॉम्प्युटर वर व्हायरस आहे, त्यामुळेच हा असा प्रॉब्लेम येत आहे”, नीलिमा ने कॉम्प्युटर कोर्स केलेला असल्याने व्हायरस पासून कॉम्प्युटर चे संरक्षण कसे करायचे हे तिला माहिती होते. नीलिमा पुढे म्हणाली, प्रणाली, मला सांग तू या अगोदर इंटरनेट च्या सहाय्याने माहिती डावूनलोड केली आहेस का? अथवा बाहेरील पेन ड्राईव्ह वरून एखादी फाईल कॉपी केली आहेस का? किंवा असुरक्षित इंटरनेट साईट वरून काही डाऊनलोड केले आहेस का? कारण अशाच ठिकाणावरून व्हायरस तुझ्या कॉम्प्युटर वर दाखल होवू शकतो. आपण माहिती गोळा करण्याच्या नादात व्हायरस आपल्या कॉम्प्युटर मध्ये कधी प्रवेश करतो हे आपल्याला देखील कळत नाही.
प्रणाली म्हणाली, हो, नीलिमा, काल मी
प्रशांतच्या पेन ड्राईव्ह मधील एक फाईल कॉपी करून घेतली,” नीलिमा म्हणाली ,”कदाचित
त्यामुळे अस झाल असाव, असो, तू काळजी करू नकोस, मी तुझ्या कॉम्प्युटर वरील व्हायरस
रिमूव करून देते, तिने लागलीच इंटरनेट वरील उपलब्ध ओपन सोर्स (मोफत उपलब्ध असणारे)
अॅऩ्टीव्हायरस साठी सर्च केल आणि “क्लेम्विन” अॅऩ्टीव्हायरस डाऊनलोड केला. क्लेम्विन
व्यतिरिक्त कोरा, अॅव्हास्ट हे देखील मोफत सेवा देणारे अॅऩ्टीव्हायरस उपलब्ध आहेत.
अॅऩ्टीव्हायरस डाऊनलोड करून नीलिमाने
संपूर्ण कॉम्प्युटर वरील डेटा स्कॅन केला आणि व्हायरस रिमूव केला यावर प्रणाली
म्हणाली, थँक्स नीलिमा, तुझ्यामुळेच मला माझा देटा परत मिळाला, यावर नीलिमा
म्हणाली, “थँक्स मला नको देवूस या अॅऩ्टीव्हायरस प्रोग्राम ला म्हण ज्यामुळे तुझा
डेटा तुला परत मिळाला आणि हो, या पुढे पेन ड्राईव्ह वापरताना काळजी घे, तो अॅऩ्टीव्हायरस
ने स्कॅन केल्याखेरीज वापरू नकोस, शिवाय असुरक्षित साईटस वरून डेटा डाऊनलोड करणे
टाळ यामुळे तुझा डेटा सुरक्षित राहील आणि कॉम्प्युटर च व्हायरस पासून संरक्षण
होईल.
अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा