एक “आयडिया” जी बदलेलं तुमचं जीवन
परिचित शीर्षक
वाटला असावा, हो ना? पण
स्टार्टअप मध्ये आयडियाला खूप महत्व आहे, आता ही आयडिया आणायची कुठून यासाठी बरीच
ऑनलाइन साधनं उपलब्ध आहेत पण मी म्हणेन तुम्ही तुमच्या अवती-भवती पहा, समाजात जा
तिथे लोकांना कोणत्या समस्या आहेत हे जाणून घ्या, ज्यास आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट
असं म्हणू , या स्टेटमेंटला तुमच्याकडे सोल्यूशन / उत्तर असल्यास तुमची सुरुवात
झाली असं म्हणण्यास काहीच हरकत नाही. अर्थात फक्त सोल्यूशन देऊ करणं म्हणजे
स्टार्टअप असे नाही. त्यास प्रमाणित करावं लागेल, त्याची व्यवहार्यता तपासावी
लागेल यामध्ये जर तुमचं सोल्यूशन यशस्वी झालं तर तुम्ही एक उत्तम स्टार्टअप करू
शकाल. या मार्गदर्शन मालिकेत या पूर्वी मी “प्रमाणित कल्पना” यां विषयी माहिती
दिलेली आहे. आजकाल विविध ठिकाणी आयडियाथॉनच्या माध्यमातून विविध डोमेन वरुन अनेक
समस्या विधाने दिली जातात किंवा उमेदवारास स्वत:चे समस्या विधान स्वत: निवडण्याचे
स्वातंत्र्य देऊ करण्यात येते, त्यांनी निवडलेल्या समस्येचे पूर्ण निराकरण १६-१८
तासांच्या आत करणे क्रमप्राप्त असते. यात महत्वाचं अंमलबजावणी आवश्यक नसली तरी
पेपरवर उमेदवाराचा संपूर्ण दृष्टिकोन अपेक्षित असतो. उमेदवाराने तो पेपर
प्रेझेंटेशन द्वारे सादर करावा , काही ग्राफिक्स वापरायचे असल्यास तशी मुभा
उमेदवारास देऊ करण्यात येते. सादरीकरण पूर्ण झाल्यावर आणि प्रमाणित झाल्यानंतर
त्याचे प्रोटोटाइप करायचे अथवा नाही हे सर्वस्वी उमेदवारावर अवलंबून असते.
विद्यार्थ्यां मधील सर्जनशीलता फुलविण्याच्या
दृष्टीने मला हे खूप महत्वाचं वाटतं, “चाकोरीबद्ध” शिक्षणातून बाहेर डोकाविण्याची
नितांत गरज अनुभवी, तज्ञ मंडळी वेळोवेळी बोलून दाखवितात, मला वाटतं शाळा,
महाविद्यालयात असे उपक्रम नित्य आयोजित करणे काळाची गरज बनत चालली आहे. प्रॉब्लेम
स्टेटमेंट साठी बँक तयार करता येऊ शकते अथवा विद्यार्थ्यानी प्रॉब्लेम स्टेटमेंट
शोधायचे आणि त्यावर ग्रुप्स मध्ये चर्चा करायची. खूप मनोरंजक अशी उत्तरं यात
मिळतील असा विश्वास मला वाटतो. २१ व्या शतकातील आवश्यक कौशल्यं आत्मसात करण्यात
मदत मिळेल, सोबतच उद्योग आणि शिक्षण यांचा उत्तम समन्वय साधता येऊ शकेल. समाजात
आपण पहात असलेली एखादी समस्या अनेक नाविण्यपूर्ण उपायांना प्रेरणा देईल. या सदैव
बदलणाऱ्या जगात जवळपास साऱ्या मोठ्या कंपन्या त्यांच्या क्षेत्रातील कल्पनांचा
नवोन्मेष करण्यासाठी पुढाकार घेत आहेत अशा वेळी विद्यार्थ्यानी मागे राहता कामा
नये, विद्यार्थ्यानी पुढे यावे आणि अशा होणाऱ्या विविध स्पर्धां मध्ये सहभागी
व्हावे. आयडियाथॉन सारख्या स्पर्धां मध्ये सहभागी होण्याने विविध टीम्स सोबत काम
करण्याची एक उत्तम संधी असते, ज्यामुळे उपायांना व्यवहार्य उत्पादनांमध्ये विकसित
केले जाऊ शकते जी तुमच्या संस्थेची आव्हाने सोडवू शकतात आणि उद्योगांवर सकारात्मक
परिणाम करू शकतात.
तुमच्याकडे
देखील एखादं प्रॉब्लेम स्टेटमेंट सोल्यूशन सह तयार आहे तर मला भेटा आपण त्यास
नक्की पुढे नेऊ.
अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर
फोटो स्त्रोत: गुगल
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा