फॉलोअर

बिझनेस मॉडेल

 


स्टार्टअप मध्ये बिझनेस मॉडेलचे महत्व

स्टार्टअप मध्ये बिझनेस मॉडेल खूप महत्वाची भूमिका पार पाडतं त्याविषयी आजच्या लेखात मार्गदर्शन करणार आहे. स्वत:चा व्यवयसाय / कंपनी स्थापन करणे आणि त्या माध्यमातून रोजगार उपलब्धी करणे ही काळाची गरजच आहे, त्यावर युवक वर्गाने नक्की विचार आणि कृती करावी असे मला वाटतं. नवीन व्यवसायाची सुरुवात करीत असताना अनेक बाबी असतात ज्यावर व्यवसाय अवलंबून असतो, प्रॉफिट कसा कमवावा त्यासाठी आवश्यक असणारं बिझनेस मॉडेल कसं आहे? ते तयार केलेलं आहे का? नसल्यास ते तयार करण्यास घ्या, आणि व्यवसायात प्रॉफिट कमवा. नवीन आणि प्रस्थापित दोन्ही व्यवसायांसाठी बिझनेस मॉडेल महत्वाचे. प्रस्थापित व्यवसायांनी त्यांच्या व्यवसाय योजना नियमितपणे अपडेट केल्या पाहिजेत अन्यथा पुढील ट्रेंड आणि आव्हानांचा अंदाज घेण्यात तुम्ही अपयशी होऊ शकता. बिझनेस मॉडेल्स गुंतवणूकदारांना त्यांना स्वारस्य असलेल्या कंपन्यांचे मूल्यांकन करण्यात मदत करतात. म्हणून बिझनेस मॉडेलना अनन्यसाधारण असे महत्व आहे.

कृपया हे ध्यानात घ्या:

§  बिझनेस मॉडेल हे कंपनीचे फायदेशीर व्यवसाय करणेचे मुख्य धोरण आहे.     

§  मॉडेल्स मध्ये सामान्यत: उत्पादने किंवा सेवा यासारख्या माहितीचा समावेश होतो.

§  मॉडेल्स मध्ये किंमत आणि खर्च हे महत्वाचं

§  एक गुंतवणूकदार म्हणून बिझनेस मॉडेलचे मूल्यमापन करताना कल्पना अर्थपूर्ण आहे का? याचा विचार केला जातो.

बिझनेस मॉडेल हे व्यवसायास फायदेशीरपणे चालविता यावे यासाठी असणारी योजना म्हणून वापरता येते. यास प्राथमिक घटक म्हणू आपण, जे कंपनी देऊ करीत असलेल्या वस्तु किंवा सेवा यांची माहिती आहे, सर्वात महत्वाचं म्हणजे ते ग्राहकास किंवा क्लायंटला कसे फायदेशीर आहे याबद्दल सांगते आणि हो, तुमच्या सेवा प्रतिस्पर्ध्या पेक्षा कशा वेगळ्या आहेत याची माहिती देते. नवीन इंटरप्रायजेसच्या बिझनेस मॉडेल मध्ये अंदाजित स्टार्टअप खर्च, वित्तपुरवठा स्त्रोत, व्यवसायासाठी ग्राहक, विपणन धोरण, स्पर्धेचा आढावा, महसूल आणि खर्च अंदाज यांचा समावेश असावा.

यशस्वी व्यवसायां मध्ये बिझनेस मॉडेल्स असतात जे कंपन्यांना स्पर्धात्मक किमतीत आणि शाश्वत खर्चावर ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यास अनुमती देतात. कालांतराने बदलते व्यावसायिक वातावरण आणि बाजारातील मागणी पूर्ण करणे हेतु अनेक व्यवसाय वेळोवेळी त्यांच्या बिझनेस मॉडेलमध्ये सुधारणा करतात.

गुंतवणूकदार गुंतवणूक करणेपूर्वी कंपनीचे मूल्यमापन करीत असताना, कंपनी पैसे कसे कमावते याचा शोध घेतात, याचा अर्थ कंपनीचे बिझनेस मॉडेल गुंतवणूकदारास याकामी मदतच करतात.

बिझनेस मॉडेल्सचे फायदे:

१.      चांगले बिझनेस मॉडेल कंपनीस उद्योगात स्पर्धात्मक धार देते.

२.      एक मजबूत व्यवसाय मॉडेल कंपनीला बाजारपेठेत चांगली प्रतिष्ठा प्रदान करते आणि गुंतवणूकदारांना कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करते.

३.      उत्तम बिझनेस मॉडेल मुळे चालू व्यवसायात नफा होतो ज्यामुळे रोख राखीव आणि नवीन गुंतवणुकीत वाढ होते.

४.     सिद्ध बिझनेस मॉडेल कंपनीत आर्थिक स्थिरता आणते.

बिझनेस मॉडेलचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत.

१.      एकदा बिझनेस मॉडेल तयार झाले की मग ते उत्पादनासाठी नवीन कल्पना अंमलात आणण्यास प्रतिबंध करते.

२.      बिझनेस मॉडेल तयार करणे म्हणजे वेळखाऊ काम मानले जाते कारण सर्व घटकांचा विचार करावा लागतो.

 तुम्हास बिझनेस मॉडेल तयार करायचे कामी मदत हवी असल्यास जरूर संपर्क करा, यासाठी सोलापुरात थिंकट्रान्स फाउंडेशन, पुणे तुम्हास नक्कीच मदत करेल.

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर 


इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?