फॉलोअर

यश म्हणजे साध्य, सिद्धी, प्रगती

 


तसे पाहिले तर यशाची व्याख्या करणं कठीण, कारण प्रत्येकाची यशाची व्याख्या          वेग-वेगळी असू शकते, नव्हे असतेच. तुमच्या जीवनातील ध्येयापर्यंत पोहोचण्याची क्षमता म्हणून देखील आपण याकडे पाहू शकतो. मला वाटतं यशासाठी चांगला शब्द म्हणजे साध्य, सिद्धी किंवा प्रगती असा असू शकतो. हा एक प्रवास आहे जो तुमची भरभराट / उत्कर्ष होण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि संसाधने विकसित करण्यास मदत करतो. यशाची व्याख्या सहसा जीवनात तुमची वैयक्तिकरित्या सांगितलेली उद्दिष्टे पूर्ण करणे अशी केली जाते. कारण उद्दिष्टे स्वत:च तयार केली जातात, ती पूर्ण केली की लोक त्यास यश म्हणून पाहतात, आणि हे त्यांच्या गरजा, ध्येय आणि महत्वाचं परिस्थिती नुसार बदलू शकतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी विविध कल्पना, युक्त्या लढवल्या जाऊ शकतात परंतु तुमच्यासाठी सर्वोत्तम कार्य करणारी रणनीती तुमच्यासाठी यशाचा अर्थ काय यावर अवलंबून असू शकते. तुम्ही जिथे कामास आहात अथवा तुमचे स्वत:चे स्टार्टअप आहे तर या ठिकाणी उत्तम काम करणे, उत्तम व्यवसाय मिळविणे अथवा नोकरीस असल्यास पगारा बाबत उत्तम पगार मिळविणे आणि स्टार्टअप असल्यास उत्तम नफा मिळविणे यांना प्राधान्य दिले जाईल. तुमची यशाची व्याख्या भिन्न असू शकते परंतु अनेकजण ध्येयपूर्ती, आनंदी जीवन, सुरक्षित निरोगी जीवन, अशी व्याख्या करू शकतील. हो ना? तर यां गोष्टी साध्य करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? यशस्वी लोकांच्या सवयी कोणत्या असतात? यशस्वी होण्यासाठी एकच मार्ग नाही जो फॉर्म्युला तुम्हास लागू पडला तोच इतरांना लागू पडेल असे नाही, तरीही काही बेसिक्स तुम्ही फॉलो करू शकता आणि यशस्वी होऊ शकता.

१.      ग्रोथ माइंडसेट: मानसशास्त्रज्ञ असे सांगतात की दोन प्रकारच्या मानसिकता असतात, एक फिक्स्ड आणि दुसरी ग्रोथ, फिक्स्ड मानसिकता असणारी मंडळी असे  मानतात की बुद्धिमत्ता ही गोष्ट स्थिर आणि अपरिवर्तनीय आहे , यश हे कठोर परिश्रमाचे फळ नाही तर ते केवळ जन्मजात प्रतीभांचा परिणाम आहे. कारण त्यांचा असा विश्वास असतो की अशी प्रतिभा लोक एकतर जन्माला येतात किंवा नसतात, आव्हानांचा सामना करताना ते अधिक सहजपणे हार मानतात. जेंव्हा गोष्टी सहज मिळत नाहीत तेंव्हा ते त्या सोडून देतात कारण त्यांचा विश्वास असतो की, त्यांच्याकडे उत्कृष्टतेसाठी आवश्यक असलेले जन्मजात कौशल्य नाही. दुसरीबाजू, ज्यांच्याकडे ग्रोथ माइंडसेट आहे त्यांना असे वाटते की ते बदल घडवू शकतात, प्रयत्नातून शिकू शकतात. ज्या मंडळींना वाटतं, विश्वास आहे  की ग्रोथ होऊ शकते, त्यांना यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. जेंव्हा गोष्टी सहज शक्य नसतात तेंव्हा कौशल्य सुधारण्याचे मार्ग शोधतात आणि यश मिळवण्यासाठी कार्यरत राहतात. जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर व्यक्तीस नियंत्रण ठेवता यावं, गोष्टी त्यांना नियंत्रित करू नयेत. ग्रोथ माइंडसेट कसा वाढवावा तर - विश्वास ठेवा की तुमचे प्रयत्न महत्वाचे आहेत. नव-नवीन कौशल्य शिका, आव्हाने पेलतान ते तुम्हास मदतगार सिद्ध होणार आहेत. अपयशास शिकवण म्हणून पाहा, अपयश म्हणजे तुमच्या क्षमतेचे प्रतिबिंब म्हणून पाहू नका, त्यास अनुभवाचा एक मौल्यवान स्त्रोत म्हणून पहा, ज्यातून शिका आणि बदल घडवा. कल्पनांचा नवोन्मेष करण्यास पुढाकार घ्या , घाबरू नका.   

बऱ्याच वेळा स्टार्टअप अयशस्वी होण्यामध्ये फिक्स्ड माइंडसेट हे कारण देखील असतं. म्हणून खास करून हा विषय आज तुमच्यासमोर मांडला आहे. यशस्वी स्टार्टअप मध्ये ०९% पेक्षा जास्त महिला कार्यरत आहेत हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर 


क्रमश:


Photo: Google


इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?