विद्या कॉम्प्युटर्स: २६ वर्षांचा विश्वास, ज्ञानसाधना आणि Ai Ready Career Institute ची यशोगाथा
आणखी एक वर्ष ! वर्षाचे ३६५
दिवस पूर्ण करून नवा दिवस ! नवी ऊर्जा, नवा उत्साह, नव्या कल्पनांसह , नव्या
तंत्रज्ञानाचे दीप हाती घेऊन पुढील ज्ञानपर्वाच्या वाटेवर मार्गस्थ होणे, नक्कीच
अभिमानास्पद आहे, वाढलेली जबाबदारी खूप मोठी आहे. अर्थात याचे भान आम्हाला आहे.
जुळे सोलापूर परिसरात ८० चौ. फुटा पासून सुरू झालेला प्रवास आज २००० चौ फुटात
दिमाखात सुरू आहे. विद्या कॉम्प्युटर्स २६ वर्षांचं झालं ! तसं पाहिलं तर खूप मोठा पल्ला, ९४९० दिवस, १
लाखा पेक्षा जास्त सोलापूरकरांच्या हृदयात स्थान मिळविणं हे आमचं सर्वात मोठं यश
मानतो आम्ही. सोलापूरकरांच्या मनो विश्वात
आशा, विचार आणि नव चैतन्याचा प्रकाश पेरण्याचे पवित्र कार्य आम्ही केले , करीत
आहोत. सोलापूरकरांचा आशीर्वाद असाच सोबत करेल याची काडीमात्र शंका आमच्या मनात
नाही आणि त्याच बळावर आम्ही आमची वाटचाल अशीच सुरू ठेवू.
आयुष्यातील महत्वाची वर्षं या वाटचालीत उपयोगात आणली गेली. पदव्युत्तर शिक्षण झालेले असताना देखील सोलापूर शहर न सोडता, येथेच राहून संगणक शिक्षण, स्किल प्रशिक्षण, कर्मचारी प्रशिक्षण, स्टार्टअप मार्गदर्शन, डिजिटल मार्केटिंग, तंत्रज्ञान जागरूकता या क्षेत्रात आपण काय वेगळं करू शकतो हाच विचार आणि त्यास सोलापूरकरांनी दिलेला प्रतिसाद यामुळेच हे शक्य झालं. Ai च्या जमान्यात ह्युमन क्रिएटीव्हिटी वर विश्वास ठेऊन कार्यरत राहणं आणि इतराना देखील हाच मंत्र देणं आम्ही कटाक्षाने पाळलं. आपुलकीची ऊब , नव्या तंत्रज्ञानाशी मैत्री , पालकांना शिक्षण शुल्क त्यांच्या सोईने भरण्याची मुभा आणि व्यवहार कुशल संगणकाचा वापर करण्याचे कौशल्य विद्यार्थ्याना प्रदान करण्यात आम्ही यशस्वी झालो अर्थात हा प्रवास आजही तेवढ्याच प्रामाणिक पणे आम्ही करीत आहोत.
कोणत्याही व्यवसायाच्या
दीर्घकालीन प्रवासात ग्राहक टिकविणे, त्यांचा
विश्वास संपादन करणे आणि त्या विश्वासाच्या आधारे विस्तार घडवून आणणे हे क्रमप्राप्त
असते. मात्र आम्ही निवडलेल्या शिक्षण क्षेत्रात हा दृष्टिकोन केवळ व्यावसायिक
चौकटीत मर्यादित राहू शकत नाही. आमच्यासाठी “ज्ञान” हाच केंद्रबिंदू असून येथे
विद्यार्थ्यास ग्राहक म्हणून संबोधणे योग्य नाही, याची
आम्हाला ठाम जाणीव आहे. कारण केवळ सेवा घेणारा घटक म्हणून नव्हे, तर ज्ञानाच्या आधारे स्वतःचे करिअर घडवणारा एक सक्षम व्यक्ती म्हणून
विद्यार्थी आमच्या समोर उभा असतो.
ज्ञानाच्या जोरावरच
विद्यार्थी जीवनात अग्रेसर होतो आणि समाजात आपले स्थान निर्माण करतो, याची जबाबदारी स्वीकारूनच आम्ही शिक्षणकार्याला सुरुवात केली. “ज्ञानदान”
हा व्यवसाय होऊ शकत नाही, ही जाणीव आम्ही सुरुवातीपासूनच
मनाशी बाळगली; मात्र त्या ज्ञानाचे प्रामाणिक, सातत्यपूर्ण आणि व्यावहारिक अनुष्ठान करण्याचा प्रयत्न आम्ही अखंडपणे करत
राहिलो. शिकवणे आणि घडवणे या प्रक्रियेत मूल्यांची जोड देत, विश्वासाचे
नाते निर्माण करणे हेच आमचे खरे उद्दिष्ट राहिले.
याच मूल्याधिष्ठित आणि दूरदृष्टी
असलेल्या भूमिकेमुळे विद्या कॉम्प्युटर्सकडे आज केवळ विद्यार्थी नाहीत, तर एका पिढीनंतर दुसरी पिढीही शिक्षणासाठी विश्वासाने येत आहे. ही वाढ
केवळ संख्येची नसून, ज्ञानाच्या परंपरेची आणि नात्यांच्या
सातत्याची साक्ष देणारी आहे. एकत्र कुटुंब पद्धतीतील घरात जवळपास सगळ्याच मंडळीनी
विद्या कॉम्प्युटर्स मध्ये कोर्स केलेला आहे. तंत्रशिक्षणातील सर्वोच्च संस्था ऑल
इंडिया काऊंसिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने “आउटकम बेस्ड एज्युकेशन” असावे असे
सुचविले आहे, आम्ही विद्या कॉम्प्युटर्स मध्ये हेच धोरण २६ वर्षे तंतोतंत पाळतो
आहोत. कोणताही कोर्स विद्यार्थ्याने पूर्ण केल्या नंतर त्याचा वापर / उपयोग
व्यावहारिक क्षेत्रात कसा करता येतो हे आम्ही विद्यार्थ्यास शिकवितो.
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थातच Ai चा वापर करणे यासाठी सगळ्याच संगणक कोर्सेस सोबत Ai चे शिक्षण दिले जाते. सोबतच करिअर मार्गदर्शन, सॉफ्ट स्किल चे प्रशिक्षण हे सार विद्यार्थ्याना देण्यात येते. याचे स्पेशल सेशन्स घेण्यात येतात. २६ वर्षांपूर्वी संगणक शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या विद्या कॉम्प्युटर्सने आज काळाची पावले ओळखत एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. केवळ कॉम्प्युटर शिकवणारी संस्था न राहता, आज विद्या कॉम्प्युटर्स ही AI Ready Institute म्हणून विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना भविष्यासाठी सज्ज करत आहे. आजचे युग हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे (Artificial Intelligence) आहे. उद्योग, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, मीडिया, मार्केटिंग – असा कोणताही क्षेत्राचा कोपरा नाही जिथे AI चा प्रभाव जाणवत नाही. भविष्यातील करिअर संधी या AI-केंद्रित असणार आहेत, हे ओळखून विद्या कॉम्प्युटर्सने AI Career Oriented Courses सादर केले आहेत.
विद्या कॉम्प्युटर्सचे वैशिष्ट्य
म्हणजे केवळ सॉफ्टवेअर शिकवणे नव्हे, तर “AI
कसा विचार करतो आणि आपण AI कडून काम कसे करून
घ्यायचे” हे शिकवणे. त्यामुळे विद्यार्थी केवळ नोकरी शोधणारे न राहता, नवीन संधी निर्माण करणारे प्रोफेशनल्स बनतात. २६ वर्षांची विश्वासार्हता,
अनुभवी मार्गदर्शन आणि आता AI ची ताकद – या
त्रिसूत्रीमुळे विद्या कॉम्प्युटर्स ही संस्था भविष्यातील करिअरसाठी सर्वोत्तम
व्यासपीठ ठरत आहे. आजच आपण आमच्या संस्थेस भेट द्यावी आणि Ai रेडी होण्यासाठी पहिलं पाऊल उचलावे.
अधिक माहितीसाठी विद्यार्थी आणि
पालकांनी विद्या कॉम्प्युटर्स, प्लॉट नं २, पहिला मजला, श्रीकांत नगर, फार्मसी कॉलेज
रोड, जुळे सोलापूर येथे भेट द्यावी.
सौ. अदिती अमित कामतकर श्री अमित कामतकर
संचालिका संचालक

.png)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा