पोस्ट्स

ऑगस्ट, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतातील उद्योजकता आणि Startup Culture: विद्यार्थ्यांसाठी आत्मनिर्भरतेचा मार्ग

इमेज
  भारतात उद्योजकतेची गरज का आहे ? १८३५ मध्ये ब्रिटिश सरकारने इंग्लिश एज्युकेशन अॅक्टला मंजुरी दिल्यानंतर भारतातील शिक्षणव्यवस्थेवर ब्रिटिश दृष्टिकोनाचा प्रभाव वाढला . काळानुसार शिक्षणपद्धतीत अनेक बदल झाले , तरी नोकरीकेंद्रित विचारसरणीची काही मुळे आजही जाणवतात . मात्र आजचा भारत बदलत आहे . Startup India, डिजिटलायझेशन , तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यामुळे स्वतःचा उद्योग उभारण्याची संस्कृती हळूहळू रुजत आहे . भारत जगातील आघाडीच्या Startup Ecosystems पैकी एक बनला आहे . त्यामुळे नोकरी मिळवणे एवढाच career चा पर्याय न मानता समस्या ओळखणे , समाधान निर्माण करणे आणि त्यातून उद्योग उभारणे हा विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याची गरज आहे . माझ्या मते , स्टार्टअप हा केवळ व्यवसायाचा प्रकार नाही ; तो आर्थिक स्वावलंबन , सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याची विचारसरणी आहे . उद्योजकता ही एक संस्कृती का बनली पाहिजे ? स्वतःचा उद्योग उभारणे म्हणजे केवळ दुकान किंवा कंपनी सुरू करणे नव्हे . कल्पना करणे , नव्या ...