पोस्ट्स

सप्टेंबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Gen Z: समस्या की नवी कार्यशक्ती?

इमेज
  आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक पिढीची विचारसरणी , जीवनशैली आणि कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा दिसून येतो. त्यात Gen Z ( १९९७ ते २०१२ या काळात जन्मलेली ) पिढी ही डिजिटल जगाशी सर्वाधिक जवळीक असलेली पिढी म्हणून ओळखली जाते. इंटरनेट , स्मार्टफोन , सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या सान्निध्यात वाढलेल्या या तरुणांनी शिक्षणानंतर आता मोठ्या संख्येने व्यावसायिक जगात प्रवेश केला आहे. त्यांच्या कल्पकता , तंत्रज्ञानाचे ज्ञान , स्वावलंबी विचार आणि लवचिक कार्यपद्धतीमुळे कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा आहे. मात्र , त्यांच्या कामाच्या पद्धती , अपेक्षा आणि कार्यसंस्कृती यांमुळे नियोक्त्यांसमोर काही नवी आव्हानेही निर्माण होत आहेत. त्यामुळे Gen Z आणि बदलती कार्यसंस्कृती हा आजच्या काळातील महत्त्वाचा चर्चेचा विषय ठरत आहे. Gen Z सध्या विविध गोष्टीमुळे प्रकाशझोतात येत आहे. यातच विविध सर्वेक्षण देखील विविध संस्था करीत आहेत . शिक्षण आणि करिअर सल्लागार प्लॅटफॉर्म Intelligent.com च्या एका सर्वेक्षणानुसार , जवळपास सहापैकी एक नियोक्ता Gen Z कर्मचाऱ्या...