ब्लॉग मध्ये सामावलेली समृद्धता

 

लॅपटॉपवर ब्लॉग लिहित असलेली व्यक्ती आणि समृद्ध विचारांचे प्रतीक असलेले लेखन

आज अनेक दिवसांनंतर ब्लॉगच्या Admin Console ला भेट दिली आणि लक्षात आलं की माझ्या ब्लॉगवर एकूण १९५ लेख वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. इंटरनेट हे माहितीचे मायाजाल म्हणतो खरे पण आपण आजवर या एवढ्या मोठ्या समूहास काय दिलं? तर अनुभव आणि ज्ञान याच्या जोरावर हे लेख ! जे कदाचित कुणासाठी प्रेरणा देऊ करतील, कुणासाठी माहितीचा खजिना म्हणून ज्ञान देऊ करतील. ज्ञान दिल्याने वाढते हेच खरे, या देण्यात जो आनंद आहे तो अनमोल आहे. स्वत:चे कौतुक म्हणून नाही पण वाचन तुम्हाला विचाराने समृद्ध करतं, नवी दिशा देतं आणि प्रेरणाही देतं, ब्लॉगला भेट दिल्यास तुम्हास देखील याची प्रचिती येऊ शकेल. समृद्ध होणं या पेक्षा काही वेगळं असेल असे नाही वाटत. समृद्धता ही केवळ संपत्ती, वैभव किंवा भौतिक सुखसुविधांची बेरीज नसून, ती जीवनाच्या व्यापक आणि सूक्ष्म पैलूंना स्पर्श करणारी संकल्पना आहे, असे मी मानतो.  

ब्लॉगवरील हे लेख कुण्या एकाच विषयावर नाहीत तर त्यात बॉलीवुड, सुलेखन, माहिती तंत्रज्ञान, चालू घडामोडी, प्रासंगिक, माहितीपर, करिअर विषयक, व्यावसायिक मार्गदर्शन, स्टार्टअप, अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञान विषयक, मनोगत असे विविध प्रकारात वाचण्यास उपलब्ध आहेत ! Admin Console पाहून मी थोडा अचंभित झालो खरा, मन भूतकाळात गेलं आणि एवढे लेख कधी आणि कसे पूर्णत्वास गेले याचे आश्चर्य वाटून गेले. एखादा विषय सुचला, डोक्यात रुंजी घालू लागला की तो कागदावर (अलीकडील काळात लागलीच संगणकावर लिहिण्यास सुरुवात करणे अशी प्रॅक्टिस ठेवली आहे.) उतरवायचा असा शिरस्ता , आणि पाहता पाहता १९५ लेख !   ब्लॉगवरील १९५ लेखांचा विचार केला, तर त्यातून समृद्धतेचे अनेकविध आयाम उलगडताना दिसतात—कधी ती ज्ञानसंपन्नतेत प्रकटते, तर कधी अनुभवांच्या गाठीशी साठलेलं शहाणपण ! कदाचित हे उद्गारवाचक चिन्ह पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, खरेच आहे, शहाणपण आपल्याकडे आले आहे का? असा प्रश्न पडतो.  या शहाणपणावर माझा फारसा विश्वास नाही पण कदाचित एवढं लिखाण आपल्याला जमलं म्हणजे शक्यता नाकारता येत नाही. असो...........

समृद्धता म्हणजे मनाची समाधानशील अवस्था, जिथे अपेक्षा आणि कृतज्ञता यांचा सुंदर समतोल साधला जातो. ज्या व्यक्तीकडे विचारांची खोली, भावनांची संवेदनशीलता आणि इतरांप्रती करुणा असते, ती खऱ्या अर्थाने समृद्ध असते, असे म्हणतात. भौतिक प्रगती महत्त्वाची असली, तरी ती मानवी मूल्यांच्या आधीन राहिली, तरच तिचे सौंदर्य खुलते.

अशा लेखसंग्रहातून हेही जाणवते की समृद्धता ही वाटण्यात वाढते—ज्ञान वाटले की वाढते, प्रेम दिले की फुलते आणि सहकार्य केले की विस्तारते. म्हणूनच, समृद्धतेचा खरा अर्थ बाह्य संपत्तीपेक्षा अंतः करणातील समाधान, नात्यांतील उब आणि जीवनातील अर्थपूर्णतेत सामावलेला आहे.

            आज पर्यन्त वाचकांनी दिलेल्या प्रतिसादा बद्दल मनस्वी धन्यवाद.

अमित बाळकृष्ण कामतकर

 

आपण अद्याप ब्लॉगला भेट दिलेली नसल्यास अवश्य भेट दया-

https://amitkamatkar.blogspot.com

विशेष विनंती- ब्लॉगवरील तुम्हाला आवडलेला लेख नक्की कमेन्ट करावा -


Image Source: Gemini


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

डिजिटल लीडरशिपकडे वाटचाल करणारे सोलापूर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून शिकायचे लाइफ स्किल्स