मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......
नमस्कार सोलापूरकर, मी एम.आय.डी.सी. चिंचोळी येथील एक धूळ खात पडलेली इमारत ज्याचे माहिती तंत्रज्ञान संकुल म्हणून १० फेब्रुवारी २००१ रोजी तत्कालीन उद्योग मंत्री डॉ.पतंगराव कदम साहेब यांचे शुभहस्ते उद्घाटन केले होते. या कार्यक्रमास तत्कालीन खासदार सुशीलकुमार शिंदे साहेब, आर आर पाटील साहेब, आमदार उत्तमप्रकाश खंदारे साहेब हि दिग्गज मंडळी उपस्थित होती. सोहळा खूप दिमाखदार झाला, हे दाखविणारा फलक तुमच्या स्वागताला पहायला आणि वाचायला तुम्हाला मिळेल. आजकाल तुम्ही काय म्हणता ते, ट्रेन्डीग वगैरे तसचं काहीतरी तेंव्हा मीडिया ने यास खूप चांगली प्रसिद्धी दिली होती, महाविद्यालयातील युवक मोठ्या आशाने या सर्वांकडे पाहत होता, शेवटच्या वर्षात शिकणारे विद्यार्थी तर स्वप्नं रंगू लागले होते, कि आता सोलापूर सोडायची गरज नाही, माहिती तंत्रज्ञान संकुल (आय टी पार्क) सोलापुरात झाल आहे म्हणजे “अपनी तो निकल पडी”, कारण जॉब साठी होम टाऊन सोडायची गरज आता राहणार नव्हती, सगळं इथेच सोलापुरी होईल असे वाटतं होते. २०१५ च्या महाराष्ट्र शासनाच्या रिपोर्ट नुसार पुण्यात खाजगी आय टी पार्क संख्या हि १७२ एवढी आहे, मुंबई १६१ , ठाणे १