फॉलोअर

नॉस्टलजीआ

 

आज काही कारणांनी कॉम्प्युटर मध्ये स्टोअर करून ठेवलेल्या जुन्या फाईल्स (जुनी कागदपत्र) उघडून पाहत होतो आणि पाहता पाहता तुम्ही काय म्हणता ते नॉस्टलजीआ का, काय तो प्रकार झाला. जवळपास १६ वर्षाचा फ्लॅशबॅक, साल २००५, त्यावेळी केलेल्या पत्र व्यवहारावरील तारखां मुळे अगदी सर्व बाबी डोळ्या समोर तरळू लागल्या आणि वाटलं किती आणि काय काय गोष्टी केल्या आपण यश मिळावं म्हणून , एका अर्थाने स्वत:ला सिद्ध करायला म्हणू फारतर आपण ! आपल्या उमेदीच्या काळात केलेली धडपड (अर्थात ती अजूनहि चालूच आहे) म्हणजे हेच काहीतरी असावं !! मला आठवतं २००० साली कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरु केल्यानंतर त्यास संस्थेच स्वरूप देण्यासाठी एक संस्था स्थापन केली आणि मग प्रयत्न सुरु झाले एखाद्या शासकीय संस्थेची मान्यता घेण्याचे. जसे कि विद्यापीठ मान्यता, शासनाच्या तंत्र-शिक्षण बोर्डाची मान्यता अनेक पर्याय !! हे करीत असताना सगळा पत्र व्यवहार हा कधी मराठीत तर कधी इंग्रजी मध्ये आणि तोही शिस्तबद्ध भाषेत ! आज वाचल्यावर मलाच थोड आश्चर्य वाटलं कि हे आपण केलं आहे ? कसं जमलं असेल आपल्याला !!! भूतकाळात डोकावताना आणि त्यात स्वत:च्या भूतकाळात डोकावताना भारीच कौतुक वाटतं तसच काहीतरी मला आज वाटतं होतं. या सगळ्या खटाटोपात यश किती मिळालं हे मात्र नका विचारू ! पण जो मिल गया उसिको मुकद्दर समझ लिया !! 

विद्यापीठाची स्थापना आणि मला सुचू लागलेले संस्थेस विविध मान्यता घेण्याचे पर्याय हे एक वेगळचं समीकरण होत तेंव्हा.... त्यासाठी विविध दाखले स्वरूपात केलेल्या नोंदी या सगळ्या जशाच्या तशा आज पुन्हा वाचायला मिळाल्या आणि परत त्या काळाची ओढ वाटू लागली. महाराष्ट्र शासन स्तरावर देखील मान्यते साठी प्रयत्न करताना केलेल्या नोंदी, त्यावेळचा विषयाच्या प्रस्तुती साठी केलेला अभ्यास, ते सादरीकरण, सगळं सगळं डोळ्या समोर तरळू लागलं आणि स्वत:ची पाठ थोपटून घेतली !! आणि हे सर्व करीत असताना ह्युमन रिसोर्स उपलब्धतता करण्यासाठी पुढाकार घेतलेले माझे मित्र, माझी बहीण, माझी बेटरहाफ, माझा तेंव्हाचा स्टाफ, मग त्यांची यादी, त्यांच्या विविध क्षेत्रातील अनुभवा नुसार त्यांचा हुद्दा, हे सगळं तयार करून मान्यता कार्यवाही साठी पुढे पाठविणं, हे करीत असताना झालेल्या बैठका, त्यात मांडलेले विविध मुद्दे, मुद्द्यांच्या आधारे तयार केलेला प्रस्ताव ... सगळं अतुलनीय आणि अविस्मरणीय !! विद्यापीठा अंतर्गत कॉम्प्युटर कोर्स सुरु करणारे त्यावेळी आम्ही सोलापुरातील प्रथम होतो, याचा तेंव्हाही अभिमान होता आणि आजही आहे.

आठवणींची पोतडी खूप मोठी आहे, पण आज इथे थांबतो. आज खरतर या लिखाण प्रपंचातून या सर्वांचे धन्यवाद ! औपचारिकता नाही पण मनापासून थॅंक्स  !! आणि अ बिग थँक टू कॉम्प्युटर कारण त्यानेच मला हि सफर घडविली.

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर


इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?