फॉलोअर

मेरा रंग दे बसंती चोला

मेरा रंग दे बसंती चोला, हे गीत कायम प्रेरणास्त्रोत आहे, कधीही गावे/ऐकावे आपल्या समोर भगतसिंग आलेच पाहिजेत, हे गीत आपणही अनेकदा ऐकले असावे. प्रत्येक गीतकाराने मातृभूमी प्रती त्याच्या भावना प्रकट करीत असताना नकळत आपल्या भावनांना देखील स्पर्श केला आहे. मातृभूमी प्रती समर्पण भाव या गीतातून व्यक्त होतो असे मला वाटते. मातृभूमी प्रती समर्पित भाव जागवण्याचे प्रेरणादायी गीत !! हे गीत हिंदी चित्रपट सृष्टीत अनेकदा लिहिले गेले आणि त्यास संगीत दिले गेले. मग ते प्रेम धवन (शहीद- मनोजकुमार अभिनित शहीद) असतील, समीर (द लीजंड ऑफ भगतसिंग- अजय देवगण अभिनित) असेल अथवा देव कोहली (२३ मार्च १९३१ शहीद - बॉबी देवोल अभिनित) असतील, या सर्वांनी मेरा रंग दे बसंती चोला या गीतास त्यांच्यापरीने न्याय देण्याचे काम केले आहे. प्रत्येक संगीतकाराने देखील तेवढीच त्याची काळजी घेतली आहे. आणि प्रत्येक वेळी उत्कट असे गीत आपल्यापर्यंत पोहोचले.

पण मेरा रंग दे बसंती हे गीत सर्व प्रथम लिहिले राम प्रसाद बिस्मिल यांनी, आता हे, राम प्रसाद बिस्मिल कोण? तर लखनऊ च्या तुरुंगात काकोडी कारस्थानात अटक केलेले स्वातंत्र्यसैनिक होते. वसंत पंचमी च्या दिवशी त्यांना कोर्टात हजर व्हायचे होते, त्यावेळी सर्वांनी ठरविले कि कोर्टात जाताना डोक्यावर पिवळी टोपी आणि हातात पिवळा रुमाल घेवून जायचं. याचं नेतृत्व राम प्रसाद बिस्मिल करत होते. या सर्वांनी बिस्मिल यांना विंनती केली कि कोर्टात जाताना आपल्याला गायला एखादं प्रेरणादायी गीत लिहा आणि मग राम प्रसाद बिस्मिल यांनी लिहिलं हे अजरामर गीत....
बिस्मिल यांनी लिहिलेल्या गीताचे बोल असे होते,

मेरा रंग दे बसन्ती चोला....

हो मेरा रंग दे बसन्ती चोला....
इसी रंग में रंग के शिवा ने मां का बन्धन खोला,
यही रंग हल्दीघाटी में था प्रताप ने घोला;
नव बसन्त में भारत के हित वीरों का यह टोला,
किस मस्ती से पहन के निकला यह बासन्ती चोला।
मेरा रंग दे बसन्ती चोला....
हो मेरा रंग दे बसन्ती चोला....
स्वातंत्र्यसैनिकां मध्ये हे गीत प्रचंड लोकप्रिय झाले होते, एकमेकास भेटल्यावर या गीताचा उल्लेख व्हायचा त्यासुमारास भगतसिंग लाहोर तुरुंगात होते त्यांनी हे गीत ऐकले आणि त्यांना आवडले देखील या गीतात त्यांनी त्यांचे बोल गुंफले ते असे होते,
इसी रंग में बिस्मिल जी ने 'वन्दे-मातरम्' बोला,
यही रंग अशफाक को भाया उनका दिल भी डोला;
इसी रंग को हम मस्तों ने, हम मस्तों ने;
दूर फिरंगी को करने को ;
लहू में अपने घोला।
मेरा रँग दे बसन्ती चोला....
हो मेरा रँग दे बसन्ती चोला....
माय! रँग दे बसन्ती चोला....
हो माय! रँग दे बसन्ती चोला....
मेरा रँग दे बसन्ती चोला....
प्रदर्शित झालेल्या सगळ्या चित्रपटात भगतसिंग यांना वधस्तंभा कडे नेताना हे गीत चित्रित झाल आहे. या शेवटच्या काळात भगतसिंग लेनिन चे जीवनचरित्र वाचत होते आणि त्यांची इच्छा होती कि वधस्तंभावर नेण्या अगोदर ते वाचून व्हावे.
प्रेम धवन यांनी लिहिलेल्या गीता मध्ये...
इस चोले को पेहन शिवाजी खेले अपनी जान पे.
जिसे पेहन झांसी कि रानी मिट गयी अपनी आन पे
आज उसिको पेहन के निकला, पेहन निकला
हम मस्तोंका टोला
मेरा रंग दे बसंती चोला.....

“या देशातील युवा पिढीने डोळे उघडून पहायला शिकले पाहिजे, कुण्या एका नेतृत्वाच्या मागे डोळे बंद करून जाणे धोकादायक होवू शकते, या युवा पिढीने प्रश्न विचारायला शिकले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने नवा भारत घडेल”- #शहीद_भगतसिंग

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?