ads

फॉलोअर

आज वाचा

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

इमेज
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही. ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...

अपॉइंटमेंट कॅलेंडर कसे तयार करावे ?

 


          संजीव आणि राजीव  नुकतेच एका कंपनीत नोकरीस लागले आहेत , संजीव चे काम पर्सनल असिस्टंट चे आहे तर राजीव चे काम कॉम्प्युटर ऑपरेटर चे आहे . संजीव ला त्याच्या साहेबांनी अपॉइंटमेंट च्या नोंदी ठेवणे व त्यानुसार त्यांना आठवण करून देणे आदी कामे करायची आहेत. संजीव ने त्यानुसार कॅलेंडर चे एक पान कात्रण करून स्वत:च्या डेस्क वर चिकटवले आणी त्यामध्ये नोंदी करायला सुरुवात केली. राजीव हे सर्व पहात होता त्याने संजीव ला विचारले, “संजीव, हे काय करतो आहेस?, अरे कॉम्प्युटर च्या युगात कॅलेंडर चे कात्रण वापरणार आहेस कि काय ?”, “मित्रा स्मार्ट बन, कॉम्युटर चा वापर करायला शिक !!”, संजीव म्हणाला राजीव मी कॉम्प्युटर चा वापर इतर कामांसाठी करतो आहे, पण कॅलेंडर म्हणून कसा वापर करू ?” यावर राजीव ने आउटलुक बद्दल संजीव ला सांगितले, आउटलुक हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस या अॅप्लीकेशन सॉफ्टवेअर मधील एक प्रोग्राम !! जो वैयक्तिक माहिती व्यवस्थापनाचे काम करतो. आउटलुक चा वापर करून ई-मेल पाठविणे, स्विकारणे, विविध दैनदिनी चे व्यवस्थापन नोंदी करणे, नवीन कॉन्क्टॅक्ट तयार करणे त्याची माहिती स्टोअर करणे, कॅलेंडर इ.कामे करता येतात. 

          आउटलुक मध्ये युजरच्या गरजेप्रमाणे विविध व्यू मध्ये कॅलेंडर पाहता येते जसे दिवसवार,आठवडा पद्धतीने ई. युजर त्याच्या गरजेप्रमाणे अपॉइंटमेंट तयार करू शकतो, ज्या अपॉइंटमेंट तयार केल्या जातील त्याप्रमाणे आउटलुक रिमांयडर देण्याचे काम देखील करतो, फक्त दररोज ऑफिस मध्ये आलास कि लागलीच आउटलुक सुरु करायचे !! तुझ्या कॉम्प्युटर वरील तारीख आणि वेळ अपडेट असली कि झाल !! आउटलुक मुळे तुझे काम सहज शक्य, सोपे होवून जाईल. “क्या बात है, राजीव, मित्रा खुप मदत होणार आहे मला या आउटलुक ची !! संजीव म्हणाला. राजीव ने मग गुगल कॅलेंडर बद्दल देखील संजीव ला सांगितले, गुगल कॅलेंडर वर  सेट केलेली अपॉइंटमेंट हि स्मार्ट फोन वर देखील आठवण करून देते, हि अधिक माहिती देखील राजीव ने संजीव ला दिली. या सर्व माहिती बद्दल संजीव ने राजीव ला धन्यवाद दिले आणि दोघे हि आपापल्या कामात व्यस्त झाले.


अमित बाळकृष्ण कामतकर 

सोलापूर 

इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी खालील लिंकला क्लिक करावं

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छावा

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

एआय शिक्षकांची जागा घेईल ?