फॉलोअर

नर्वस नायंटीज

 

मागील काही दिवस मी नर्वस नायंटीज चा शिकार झालो आहे की काय असं वाटतं मला. नर्वस नायंटीज म्हणजे काय तर वैचारिक ब्लॉक, कृतीशीलता खुंटणे !! अगदी अर्धांग वायु झाल्यावर जी स्थिति तशीच काहीशी मनाची स्थिति म्हणूया फार तर.. नर्वस नायंटीज हा तर क्रिकेटचा भाग आहे, तुम्ही म्हणाल मी कुठे क्रिकेट खेळतो? मग त्याचा माझ्याशी कसा संबंध ? त्याचं असं आहे मित्रांनो आपण सर्वजण तर जाणता की माझा ब्लॉग (https://amitkamatkar.blogspot.com) आहे, ज्यावर मी माझे लेखन प्रकाशित करतो. विविध लेख जे प्रकाशित होतात त्यांची संख्या मागील अनेक दिवस झाले ९०च्या पाशात अडकली आहे. म्हणून मला नर्वस नायंटीजचा फील येतो आहे. लेख लिहायचा आणि पोस्ट करायचा म्हणजे डोक्यात विचार यायला हवे आणि आकारात आणायचे असल्यास ते लिहावे लागतील पण होत नाहीए, अर्थातच माझ्यासाठी नर्वस नायंटीज !!!!

आज हा लेख पूर्ण झाला (म्हणजे एक धाव घेता आली) आणि प्रकाशित करण्यात मी यशस्वी झालो तर एकूण ९८ लेख ब्लॉगवर प्रकाशित होतील, फक्त २ लेख कमी शंभरी गाठायला !! आता पर्यंतच्या लेखांचा प्रवास खूप उत्कट, ज्ञान वर्धन करणारा (वाचक आणि लेखक दोघांचा बरं का!) आणि हो अनुभव शब्दांत व्यक्त होणारा असाचं आहे. आधुनिक माहिती तंत्रज्ञान सोप्या आणि मराठी भाषेत सर्वांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने ब्लॉगची सुरुवात केली आणि नंतर त्यात वैविध्य यावं म्हणून विविध विषयांवर लेखन करण्यास सुरुवात केली अर्थात वेळोवेळी केलेल्या विविध सर्वेक्षणातून वाचकांनी केलेल्या सूचना मी कृतीत उतरविल्या म्हणून देखील लेखांची शंभरी गाठण्याचे भाग्य मला लवकरच लाभेल..

ब्लॉग पेज व्युज संख्या १३,६०० एवढी झालेली आहे आणि उत्तम असा प्रतिसाद लेख प्रकाशित झाल्यावर मिळतो त्यामुळे लेखन करण्याची ऊर्जा मिळते पण जशी लेखांची नव्वदी आली तशी ही ऊर्जा कमी पडू लागली आणि मी नर्वस नायंटीज मध्ये गेलो !! तसं पाहिल तर क्रिकेट मध्ये एखाद्या खेळाडुचं शतक होऊ नये म्हणून प्रतिस्पर्धी कर्णधार यासाठी खास व्यूह रचना आखतो आणि त्याप्रमाणे खेळाडूस रोखण्याचे शर्थीचे प्रयत्न इतर खेळाडू ही करतात, या प्रयत्नात ही मंडळी यशस्वी झाली की त्या खेळाडूचं शतक राहिलचं म्हणून समजा, अर्थात मला असा कुणी प्रतिस्पर्धी नाहीच की जो मला लेखांचे शतक पूर्ण करण्यापासून परावृत्त करतोय अथवा रोखतो आहे. पण नर्वसनेस वर मात करीत लवकरच लेखांची शंभरी गाठण्याचे ध्येय मनात आणि डोक्यात घेतलं आहे ते लवकरच तुम्हा सर्व वाचकांच्या प्रतिसादाने पूर्ण होइल असा विश्वास वाटतो.

आपल्या सर्वांचा लाडका , आदर्श खेळाडू सचिन तेंडुलकर एकूण २७ वेळा### (१७ वेळा वन-डेत  आणि १० वेळा टेस्ट क्रिकेट मध्ये) नर्वस नायंटीज मध्ये बाद होऊन देखील सर्वोच्च धावा करणारा आणि शतकं ठोकणारा महान खेळाडू बनला, त्याचाच आदर्श समोर ठेऊन लवकरच लेखांची शंभरी पूर्ण करण्याचा संकल्प घेऊन आज थांबतो.

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर     

### माहिती स्त्रोत - इंटरनेट 


इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?