पोस्ट्स

2023 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

कोडिंग म्हणजे काय ?

इमेज
  कोडिंग, आजकाल यश संपादन करण्यासाठी परवलीचा शब्द ! अर्थात यशाची व्याख्या ज्याची त्याची वेगळी असू शकते, आणि ती वेगळी असावीच, नाही का? संगणक वापरकर्ते (एंड युजर) आपण सगळेच असतो पण जर तुम्हाला तुमचा हा रोल बदलायचा असेल तर कोडिंग हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. संगणकास सांगता यायला हवं की तुम्हाला काय आउटपूट त्याच्याकडून हवय, मग हे सांगणार कसं? तर त्यासाठी आपण ज्या प्रकारे विविध भाषा मध्ये संवाद साधतो अगदी तसचं संगणका सोबत संवाद साधून त्यास आदेश देता येणं, आणि हवं ते आउटपूट मिळवणं हे कौशल्य आत्मसात करणं म्हणजे कोडिंग.. एखादा प्रोग्राम म्हणजे तर काय हो ? तर्कशुद्ध (लॉजीकल) सूचनांचा सेट , मग ह्या तर्कशुद्ध सूचना द्यायच्या कशा ? त्यासाठी कोणता फॉरमॅट असतो ? तर्कशुद्ध सूचना देता येणं हे एक कसबं आहे, हे शाळेतच मुलं शिकू शकतं असतील, तशी मुलांनी तयारी केली तर त्यांच्या शाळेच्या अभ्यासक्रमात देखील याचा फायदा ते मिळवू शकतात. तर्कशुद्ध सूचना द्यायच्या असतील तर तसा विचार करावा लागेल, एंड युजरची गरज काय आहे? याचा विचार करावा लागेल, एकदा आउटपूट काय हवं आहे हे ठरलं की मग इनपुट काय आणि कसं स्विकारायचं ? या

माऊली

इमेज
  पंढरीचा पांडुरंग , विठ्ठल भाविकांचे श्रद्धास्थान , संतांचे प्रेरणास्थान , भक्ती भावनेचा अतूट धागा विठ्ठला भोवती गुंफला गेला आहे , “ श्री विठ्ठल महाराष्ट्राचे परमदैवत आहे.” वर्षातून चार वेळा अवघ्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातून वारकरी वारी करतात आणि पंढरपुरी पांडुरंगाचे दर्शन घेतात , डोळाभेटच म्हणायची ती ! दर्शन होताच जन्म धन्य झाल्याचे समाधान मिळते. हे समाधान खूप मोठं असतं ते फक्त अनुभवता येतं आणि शब्दात व्यक्त करणं शक्य नसतं. वारकरी विठ्ठल दर्शनाच्या ओढीने पंढरपूर कडे निघतात प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या परीने विठ्ठलाचे स्मरण करीत असतो , भक्तीत तल्लीन असतो , वारी अनुभवता आली पाहिजे , वारीची शिस्त , वारीत केली जाणारी सेवा आणि दिंडीत दिसणारी , अनुभवास येणारी माणुसकी ! या दिंडीत सहभागी सगळे वारकरी सारखेच भासतात कारण प्रत्येकाचा भाव एकच असतो “विठ्ठल” , त्याच्याशी ते सगळे एकरूप झालेले असतात. शेकडो वर्षापासून संतांच्या आणि सत्पुरुषांच्या पालख्या पंढरीस येतात. या पालख्यामध्ये दिंड्या सहभागी असतात , वारी एक साधना असून दिंडी हे साधन आहे असं मानणारा हा संप्रदाय , भागवत संप्रदा

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?

इमेज
  ब्रिटिश काळात राजकीय चळवळ जनसामान्यां पर्यन्त पोहोचावी यासाठी विविध मार्ग शोधण्याची निकड वाटू लागली असता टिळकांचे लक्ष गणपती बाप्पा कडे गेले आणि त्यांनी गणेश उत्सव सार्वजनिक रित्या साजरा करणेचे ठरविले आणि त्याकाळात पुण्यातील काही प्रतिष्ठित मंडळींच्या सहकार्याने उत्सवास सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले. यास ठोस अशी कारणं देखील होती, त्याकाळातील भाषा माध्यम इंग्रजी आणि त्याची व्याप्ती खूप कमी , सोबतच सामान्य माणसास ब्रिटिश जुलमी राजवटी विरोधात जन-जागृती करणे , त्यांच्या भाषेत त्यांना विषय समजावा त्यासाठी जमाव जमविणे खूप कठीण, कॉंग्रेस मध्ये मवाळ नेतृत्व ज्यांचा भर हा पत्रव्यवहार, निवेदनं देणं यावर असायचा परंतु टिळकांना हे मान्य नव्हतं त्यासाठी त्यांनी उत्सवास सार्वत्रिक स्वरूप देण्याचे निश्चित केले. पेशवे काळा पासून उत्सव साजरे केले जायचेच. पण ते सार्वजनिक नव्हते.   ही पार्श्वभूमी प्रथम मांडण्याचे कारण म्हणजे सार्वत्रिक उत्सवाची गरज आणि त्यामागची भूमिका- स्वातंत्र्यपूर्व काळात काय होती आणि आता काय आहे? थोडा विचार केल्यास स्वातंत्र्यानंतर या सार्वत्रिक उत्सवाची खरीच गरज आहे का? कोणत्या वि

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

इमेज
  संगणकीय जगातील कृत्रिम बुद्धिमत्ता नवे नवे प्रयोग करताना आता आपल्याला पहायला आणि अनुभवाला मिळत आहे. येणाऱ्या पिढीला याचा खूप फायदा होवू शकेल अस वाटते. विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता अनेक चमत्कार दाखवेल असा विश्वास तंत्रज्ञांना वाटतो आहे. मग ते क्षेत्र वैद्यकीय असेल, तांत्रिक असेल अथवा जिथे गरज असेल ते क्षेत्र ! सगळीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता कमाल दाखवेल हे मात्र नक्की ! आणि हा सगळा चमत्कार घडेल तुमच्याकडील डेटा मुळे !! तुमच्याकडील डेटा (माहितीसाठा) हा खूप महत्वाची भूमिका पार पाडेल यामध्ये शंकाच नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेचा गाभा हा डेटाच असणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मानवाला मिळालेली नवी देणगी आहे याच्या जोरावर बरेच प्रयोग यशस्वी होताना दिसत आहेत. तस पाहिलं तर आरोग्यसेवा हि मनुष्यबळावर अवलंबून आहे यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता योग्यरीत्या वापरली गेल्यास, या क्षेत्रास त्याचा खूप मोठा फायदा होताना पहायला मिळेल. संशोधक, शास्त्रज्ञ आणि डॉक्टर्स यांची एक टीमच या विषयावर कार्यरत आहे नक्कीच हि मंडळी एका नव्या ए.आय. (आर्टीफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाच्या अव

झेप- मुलं मोठी होतात

इमेज
  आयुष्याच्या वाटेवर चालत असताना काळ कसा सरतो समजत नाही, ‘काळच’ बऱ्याच गोष्टीवर मलम असतो, सोल्यूशन असतं अर्थात याची उपरती प्रौढ झाल्यावर होते आणि तो आजचा विषयही नाही. बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि वृद्धावस्था अशा अवस्थेतून वाटचाल, म्हंटल तर “दिव्य” म्हंटल तर “आनंद”, प्रत्येकजण यास कसे पाहतो त्यावर सारं अवलंबून असतं असं म्हणावं लागेल. वडील आणि आई यांच्या छत्र छायेत दिवस मजेत सरत असतात ते कधीच संपू नयेत असे प्रत्येकास वाटते, पण तुम्ही जबाबदारी घेण्यास सक्षम होता – तुम्ही सक्षम झालात हे ठरवायचं कसे? याचं कोणतच मापक , दंडक नाही. आजच्या जमान्यात शहरा -शहरा परत्वे मुलांचे संगोपन यात बदल होत आहेत. मुलांना मिळणाऱ्या सुविधा, सभोवतालचे वातावरण यावर बरचं काही अवलंबून असतं. आयुष्यात उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विविध वळणावर निर्णायक टप्पे येतात त्याकडे पाहण्याचा विविध शहरातील मुलांचा दृष्टिकोन बदलतो आहे. याकडे एक पालक म्हणून पाहताना भिती वाटते, पण मुलांमध्ये दिसणारा आत्मविश्वास आश्वस्थ करतो की ही मंडळी काहीतरी वेगळ करून दाखवतील.                 मुलं मोठी होतात, काळ एवढा लवकर सरतो की आपल्या लक्षातही

“आदर्श” बनण्याचा क्यु-आर कोड

इमेज
  आजच्या लेखांमध्ये वापरण्यात आलेला क्यु-आर कोड, आदर्श असा अर्थबोध देतो, तो फक्त स्कॅन करून “आदर्श” होता आलं असतं तर किती सोपं झालं असतं, नाही का? ज्यास आदर्श व्यक्ति व्हायचं आहे त्याने क्यु-आर कोड स्कॅन करावा, पण असे होत नाही, असे करता येत नाही, मग आदर्श बनण्याचा क्यु-आर कोड नक्की काय आहे? हे आजच्या लेखात पाहुयात..   आयुष्यात आपण कुणाचा आदर्श होऊ म्हणून कुणी त्यासाठी परिश्रम करीत नाहीत, आदर्श बनतात ते त्यांनी जपलेल्या नैतिक मूल्यां मुळे, केलेल्या सामाजिक योगदान आणि दूरदृष्टि मुळे , त्यांचा नवीन तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सर्वात महत्वाचं म्हणजे गरुडझेप घेण्याची जिद्द या सर्व बाबी मुळे एक आदर्श व्यक्तिमत्व घडतं , लोक आजकाल फक्त लाईम लाइटच्या झगमगाटास भुलतात आणि त्यासच आदर्श मानू लागतात. जे सर्वस्वी चुकीचे आहे. अवघ्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे संत ज्ञानेश्वर ज्यांनी विश्वशांती साठी प्रार्थना १३ व्या शतकात लिहून ठेवली होती जी आजही प्रेरणा देते. अवघ्या हिंदुस्थानाचे अखंड प्रेरणा स्त्रोत छत्रपती शिवाजी महाराज- आजही त्यांची शिकवण , त्यांचे विचार धीरोदात्त मानून चालणारे अनेक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून शिकायचे लाइफ स्किल्स

इमेज
  आपणा सर्वांचे अखंड प्रेरणास्त्रोत , वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा साजरा करीत असताना आपण महाराजांकडून विविध कौशल्य शिकून त्यानुसार राष्ट्र उभारणीत योगदान देण्यास पुढे यावे. जयंती साजरी करताना आपण त्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे मला वाटते. महाराजांकडे पहावं आणि शिकावं , स्वराज्य निर्माण करण्याचा संकल्प महाराजांनी असंख्य मावळ्यांच्या साथीने सिद्धीस नेला पण हे करीत असताना जी जीवनावश्यक कौशल्य महाराजांनी आपणास दिली त्याच अनुसरणं करावं. श्री समर्थ रामदासस्वामींनी महाराजां विषयी भावना व्यक्त करताना अगदी मोजक्या शब्दांत व्यक्त केल्या आहेत- निश्चयाचा महामेरू | बहुत जनासी आधारू | अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंतयोगी. संस्कृतीचा आदर करा: छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली संस्कृती जतन करण्यासाठी आणि वाढविण्यासाठी मराठी आणि संस्कृत या भाषांना राजभाषेचा दर्जा दिला. आपली संस्कृती टिकविण्यासाठी स्थानिक भाषेचे महत्व महाराजांनी अधोरेखित केले आहे. सोबतच समाजातील प्रत्येक घटकांशी संवाद सुलभ होण्यास यामुळे मदत मिळाली.         नाविण्यपूर्

यश म्हणजे साध्य, सिद्धी अन् प्रगती- भाग -२

इमेज
  मागील भागात यश म्हणजे काय? या विषयी मार्गदर्शन केले त्याचाच भाग म्हणून पुढे मार्गदर्शन करीत असताना हे यश कसे साध्य करावं यां विषयी अधिक माहिती यां लेखात देत आहे. तसे पाहिले तर यशाची व्याख्या व्यक्ति परत्वे बदलते पण तरी देखील विविध तज्ञ मंडळींनी केलेली यशाची व्याख्या आपल्याला जीवनात पुढे जाण्यास मदत करते. यश म्हणजे मन:शांती अशीही व्याख्या करता येऊ शकते, जीवनात सर्वोत्कृष्ट होण्यासाठी तुम्ही केलेले सर्वोत्तम प्रयत्न म्हणजे यश !! अमेरिकन तत्वज्ञानी इमर्सन याने केलेली यशाची व्याख्या आपल्याला सांगते- आनंदात राहणे, हसणे, हुशार लोकांचा आदर करणे, इतरामध्ये सर्वोत्तम शोधणे, जगाला तुमच्याकडील उत्तम देणे, जीवन सुलभ आहे , जे तुम्ही जगला आहात ते म्हणजे यश आहे. हे कसे साध्य होऊ शकेल यां विषयी मागील भागात मार्गदर्शन केलेले आहे आज याच विषयी अधिक जाणून घेऊया: १.       भावनिक बुद्धिमत्ता: एकूणच बुद्धिमत्ता हे जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये यश मिळविण्यासाठी योगदान देणारा एक घटक असल्याचे मानले जात आहे. परंतु काही तज्ञानी असे सुचविले आहे की भावनिक बुद्धिमत्ता प्रत्यक्षात आणखी महत्वाची असू शकते. भाव