पोस्ट्स

फॉलोअर

आज वाचा

गुरुपौर्णिमा

इमेज
  अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया । चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः ॥ ज्ञानरूपी किरणाने जे अज्ञानरूपी अंधकाराने आंधळे झालेल्यांचे डोळे उघडतात त्या गुरूंना नमस्कार | आज गुरुपौर्णिमा, गुरुप्रति आदर व्यक्त करण्याचा आणि आभार मानायचा दिवस , गुरुपौर्णिमेस एक आध्यात्मिक परंपरा आहे , गुरु - ज्यामुळे जीवनाकडे पाहण्याची दृष्टी मिळते , आई व वडील हे आपले प्रथम गुरु , ज्यांनी आपल्याला घडवलं , आपल्या पायावर ताठ मानेने उभं कसं रहावे हे शिकवलं. प्रत्येकाच्या आयुष्यात हे दोन्ही गुरु असतात. आई हि सदैव मुलांची लाडकी असते , काही झाल तरी मुलांना आई लागते , त्या माऊलीच हि सर्वस्व असतात तिची मुलं. आई चं मुलां शिवाय विश्वच नाही अस म्हणालो तरी वावगं होणार नाही , अर्थात मुलांसाठी सुद्धा आईच विश्व आहे. या गुरूचे मार्गदर्शन माझ्या नशिबाने मला आजही मिळते आहे आणि मिळत राहो हि ईश्वर चरणी प्रार्थना ! पण माझे बाबा आज या जगात नाहीत. ते फक्त आठवणींच्या रुपात माझ्या सोबत आहेत. बाबांनी कृतीतून बऱ्याच गोष्टी शिकविल्या , त्या जेंव्हा पाहिल्या तेंव्हा त्याचे महत्व समजून घेता आलं नाही पण आज जेंव्हा ते...

आनंदचा ‘मुरारीलाल’

इमेज
  “मुरारीलाल”, हे नाव कानावर पडताच डोळ्यासमोर कोण येतं? तुम्ही म्हणाल “आनंद” चित्रपटातील जॉनी वॉकर, खरं ही आहे ते वॉकर यांनी ती भूमिका बजावली नव्हती तर ते ती भूमिका जगले होते. पण राजेश खन्नास प्रतिसाद देणारे इसाभाई सुरतवाला हे पात्र त्यांनी निभावलं होतं. मुरारीलाल पात्र आपल्या समोर उभं करण्यात जॉनी वॉकर यशस्वी झाले, असेच मी म्हणेन. साद असेल तर प्रतिसाद हा प्रकृतीचा नियम पण तो सर्वानाच माहिती असतोच असे नाही. चित्रपटात एखादा दुर्धर आजार सोबत घेऊन फिरणारा, केवळ सहा महिने आयुष्य असणारा आनंद ! अनेकांना साद घालत फिरतो पण कुणीतरी एकच त्यास प्रतिसाद देतो. असेच साद घालत फिरणारा आनंद   तर आपल्या अवती भवती सुद्धा तुम्हाला   भेटत असतील. दिलखुलास आयुष्य जगणारे आनंद, दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानणारे, आयुष्य नितांत सुंदर आहे आणि ते भर भरून जगायला हवं म्हणून कृतीतून शिकविणारे आनंद ! एक नाव पण अनेक रूपं धारण करणारे आनंद ! तुम्हाला असा एखादा आनंद भेटला आहे का ? माझी रोज सकाळी अशाच एका “आनंदची” भेट होते. एक मित्र म्हणून नक्कीच रोज भेटावा असाच हा आनंद ! मॉर्निंग वॉक दरम्यान, प्रचंड ऊर्...

भाषा सक्ती आणि शिक्षण

इमेज
  विशेष टीप : हा लेख वाचताना कोणत्याही राजकीय चष्म्यातून वाचू नये. समाजात वावरताना जे पाहिलं ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे एवढचं. उदाहरण- १ एक कॉम्प्युटर कोर्स करण्यासाठी इ.१० वी परीक्षा पास (उत्तीर्ण) विद्यार्थिनी येते आणि तिला कोर्सचे अभ्यासक्रमाचे पुस्तक कोणते (मराठी की इंग्रजी भाषेतील) देऊ विचारल्यावर ती उत्तर देऊ शकली नाही. कारण ती म्हणते सगळं शिक्षण कन्नड भाषेत झाले आहे. वाचायला जे सोपे असेल ते द्या !! प्रवेशाच्या छापील नमुन्यावर (ऍडमिशन फॉर्म) स्वाक्षरी देखील कन्नड भाषेत करते. तिचं शिक्षण कर्नाटकात झालेले आहे हे एव्हाना आपल्या लक्षात आलेलेच असावे. संवाद हा पूर्ण मराठीत झाला हे येथे नमूद करणे क्रमप्राप्त आहे. उदाहरण- २ आज आपल्याकडील स्मार्ट फोन वर विविध ॲप्स उपलब्ध आहेत ज्यावर विविध भाषा शिकता येतात. हे उघड सत्य आता सगळ्यांपर्यंत पोहोचलेले आहे आणि गरज पडल्यास ही मंडळी त्याचा वापर करू शकतील. ज्यावेळी मेंदू विकसित होत असतो (साधारण वयाच्या 14 वर्षा पर्यंत) ते म्हणजे प्राथमिक शिक्षण अशा वेळी सारे छोटे दोस्त स्मार्ट फोनचा सर्रास वापर करतातच हे सर्वांनाच माहिती आहे. हा व...

संक्रमण

इमेज
  आपल्या अवतीभवती बऱ्याच गोष्टी घडत असतात, फक्त आपलं लक्ष नसतं. किंबहुना जो व्यक्ति कामात व्यस्त असतो त्यास फारसं देणं-घेणं नसतं की अवती भवती काय घडतं आहे. “लक्ष्य” साध्य करणे हेतु ध्येयाने पछाडलेल्या व्यक्ति अशाच असतात. हो, पछाडलेल्या , हाच शब्द योग्य वाटतो मला, कारण त्या शिवाय त्याची डेपथ लक्षात येत नाही. त्याचं महत्वही लक्षात येत नाही. व्यवसाय असेल अथवा नोकरी असेल दोन्हीकडेही पछाडलेपणा हवाच ! कामाची वेगळीच नशा. इतर कोणतीही नशा करण्यापेक्षा “कामाची” नशा कधीही लईभारी ! “एम्पटी माइंड इज डेविल्स वर्क शॉप”, असे उगाच नाहीत म्हणतं. सतत कार्य मग्न राहणं आरोग्यासही उत्तमच. आजच्या युवक वर्गात मला कामाप्रती समर्पण दिसून येत नाही, काय कुणास ठाऊक पण जी युवा मंडळी भेटतात त्यांना मार्गदर्शन करतो त्यावेळी लक्षात येतं की त्यांचं ध्येयच मुळी ठरलेलं नाही. आयुष्यात काय करायचं ? काय मिळवायचं या विषयी ही मंडळी फारशी सीरियस दिसतं नाहीत. हे मापदंड सरसकट सर्वाना लागू होत नाहीत, हे या ठिकाणी जाणीवपूर्वक नमूद करतो. पण सॅपल साइज दहा धरला तर किमान सात युवक वरील प्रश्ना विषयी अनभिज्ञ आहेत. तंत्रज्ञानदृष्टी...

संत श्री ज्ञानेश्वर – मुक्ताई

इमेज
  सध्याच युग हे आर्टिफिशियल इंटेलिजंसच युग, जिथे ड्रायवरलेस कार आल्या आहेत, अशा जमान्यात दिग्दर्शकाने “भिंत” चाललेली दाखवणं कितपत रुचेल हा खरा प्रश्नच ! पण तरीही दीगपाल लांजेकर आणि टीम ने हे धाडस केलं आणि १४०० वर्षे वयोमान !! असणाऱ्या योगींच्या स्वागताला सामोरं जाण्यासाठी संत श्री ज्ञानेश्वरांनी भिंत चालविली. हे सारं दिव्यच ! या दिव्यत्वाची महती आणि माहिती नव्या पिढीस होणे नितांत आवश्यक आहे. वाचन आणि संयम कमी होत चाललेल्या युवा पिढीस हा विषय पडद्यावर दाखवणं आणि चित्रपट गृहात आणणं हे एक आव्हान आहे. तंत्रज्ञानाच्या युगात आध्यात्मिक वारसा जपणं आणि त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं मला कौतुकास्पद वाटतं.   हे एक दिग्दर्शक निर्माते म्हणून आपण जाणलं आणि कशाचीही पर्वा न करता हे आपण पडद्यावर साकारलं. यासाठी प्रथम आपले मन:पूर्वक आभार ! श्रद्धा ,भक्ति आणि नम्रता या जोरावर अनेक असाध्य गोष्टी साध्य होतात याचे दर्शन या चित्रपटात होते. अहंकारामुळे होणारे नुकसान सामान्य जनास दिसत नाही, पण भक्ति मार्गावर असणाऱ्या मंडळीना हे सारं ज्ञात असतं. बदलत्या काळा नुसार बदलणे क्रमप्राप्त असतं तसं बदलाव...

सोशल मीडिया एटीकेट्स !

इमेज
  हा एक नवा माहिती देण्याचा , जागो रे ! म्हणण्याचा विषय होवू शकतो, असं वाटलं नव्हतं. पण सोशल मीडियाचा वापर करीत असताना आज ज्या प्रकारे कमेन्टस् वाचण्यात येतात, त्या वाचल्यावर नक्की वाटतं की याचं शिक्षण देण्याची नितांत गरज आहे. काही मंडळी त्वेषाने द्वेष पसरविण्यात एवढी मग्न असतात की खरचं यांची शैक्षणिक पात्रता, विषयातील अभ्यास या विषयी कुतूहल निर्माण होतं. अभिव्यक्ति स्वातंत्र्य म्हणजे बेलगाम घोडा दवडणे होऊ शकत नाही. ताळतम्य हवच, एखाद्या व्यक्तीच्या ज्येष्ठतेचा, ज्ञानाचा आदर होताना दिसतं नाही. ही आपली संस्कृती नाही. सोशल मिडियावरील मंडळी शिक्षित आहेत पण साक्षर नाहीत हे नक्की. या विषयावर माझा ब्लॉग आहेच, तुम्ही तो वाचला असेल अशी आशा व्यक्त करतो. नसेल वाचला तर या लिंकवर क्लिक ( https://amitkamatkar.blogspot.com/ 2025/03/ educate-literate.html ) करून  नक्की वाचावा. सोशल मिडियाचा वापर तसा अनेक वर्षे झाली करतो आहे. हा वापर करीत असताना शिष्टाचारांच (इंग्लिश मध्ये एटीकेट्स) पालन करणं यां विषयी कधी फारसं कुणी बोलेललं पाहिलं नाही अथवा कुणी यावर मार्गदर्शन केलं आहे असेही पाहिलं नाही. माझ...

तुम्ही शिक्षित की साक्षर ?

इमेज
  शिक्षण म्हणजे नक्की काय? फक्त लिहिता वाचता येणं म्हणजे शिक्षण की सुज्ञ, सुसंस्कृत होणं म्हणजे शिक्षण की नैतिकता आंगीकरण्याचं बळ मिळणं म्हणजे शिक्षण की  फक्त प्रश्न विचारणं म्हणजे शिक्षण ? पूर्वीच्या काळी एकच समाज शिक्षित होता त्यामुळे लिखा पढी , सरकारी दरबारी त्यांचाच रुतबा असायचा असे थोर इतिहासकार, समाजसुधारक यांनी लिहून ठेवलं आहे . १८१३ मध्ये ब्रिटिश सरकारने अर्थात राणी ने ईस्ट इंडिया कंपनीस शिक्षणात कंपनीची भूमिका असावी असे आदेश दिले आणि यासाठी सुमारे एक लाखांची तरतूद करण्यात आली. अशी तरतूद असण्याची ब्रिटिश सत्ताक भारता साठी ही पहिलीच वेळ. परिणामी स्थानिकांच्या शिक्षणाची जबाबदारी कंपनीस देण्यात आली. पुरोगामी भारतीय मंडळीनी इंग्रजी शिक्षण आणि पाश्चात्य शिक्षणाच्या प्रसारास अनुकूलता दर्शविली. याच दरम्यान राजा राम मोहन रॉय यांनी कलकत्ता, मद्रास, येथे संस्कृत महाविद्यालय आणि बंगाल मध्ये प्राच्य महाविद्यालये स्थापन करण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला विरोध केला. यावर प्रशासनाने इंग्रजी आणि आशिआई भाषांच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. साधारण १८१७ मध्ये प्रगतिशील बं...

“छावा” च्या निमित्ताने .....

इमेज
  इतिहासातील विविध विषय समजून घेणे , अधिक माहिती घेण्याचा, मिळविण्याचा प्रयत्न करणे ही आवडच, याच आवडीतून इतिहास समजून घेऊन त्याची माहिती इतरांना देणे, हा पण एक छंदच. नुकताच “छावा” चित्रपट प्रदर्शित झाला, आणि जी त्रोटक माहिती छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी वाचली होती, ती अधिक समजून घेण्या विषयी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. मग कादंबरी वाचन असेल, अथवा ऑनलाइन संकलन असेल. ऑनलाइन ! म्हंटल की भुवया उंचावल्या जाऊ शकतात, कारण तेथील उपलब्ध माहितीच्या सत्यतेवर   शंका घेतली जाऊ शकते. विकिपीडिया सारखे माध्यम ज्यात कुणीही बदल करू शकतं . ते किती सत्य माहिती देऊ करतं हा अभ्यासाचा विषय , म्हणून स्पष्ट पणे नमूद केलं की सत्यतेवर सिद्ध होऊ शकेल अशीच माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यात थोड्याफार प्रमाणात यशस्वी झालो खरा पण अद्याप “ज्ञानाची (छत्रपती संभाजी महाराज   समजून घेण्याची ) भूक” काही शमली नाही. “संभाजी” या कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांची एक नवी विडिओ बाइट पाहिली त्यात इतिहासातील कोणत्या लेखनाची विश्वासार्हता अधिक या विषयी माहिती दिली आहे. शुद्ध ऐतिहासिक लेखन महत्वाचं. कुणा...