सोलापूर आणि आयटी पार्क : तीन पिढ्यांच्या प्रतीक्षेचा अंत कधी?
सोलापूर आणि आय टी पार्क – एक हास्यास्पद समीकरण होईल की काय अशी भिती आता वाटते आहे. सरकार कुणाचंही असो सोलापूरकरांच्या पदरात फक्त निराशाच पडते. असा अनुभव याही वेळी येईल अशीच शक्यता दिसते आहे. वृत्तपत्रांतून रोज नव्या अडचणी समोर येतात पण त्यावर तोडगा काढणारा “धुरंधर” काही सोलापूरकरांच्या वाट्याला येत नाही, ही एक शोकांतिका म्हणावी लागेल. निवडणुकां पुरते आणि त्या नंतर काही दिवस चर्चेत राहणारे विषय अशा प्रकारे हाताळण्यात येतात की अवघं सोलापूर नवी स्वप्नं रंगवू लागतं, पण सामान्य सोलापूरकरांच्या हाती काहीच लागत नाही. छोट्या छोट्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो हे काही सोलापूरकरांना नवीन नाही पण विमान सेवा, आय टी पार्क आणि नवे सुविधा युक्त एमआयडीसी, नवे उद्योग सुरू होणे कठीणच आहे. यासाठी आता सामान्य जनतेस रस्त्यावर उतरावं लागेल काय? आजच्या वृत्तपत्रात आलेली बातमी अवश्य पहावी. १९९० च्या दशकात शिक्षण घेत असलेली आमची पिढी ही संगणक आणि इंटरनेटच्या सुरुवातीच्या टप्प्याची साक्षीदार आहे. १९९७–९८ च्या सुमारास सोलापुरात आयटी पार्क सुरू होणार असल्या...

Mast very informative
उत्तर द्याहटवाMast very informative
उत्तर द्याहटवा