यश म्हणजे साध्य, सिद्धी, प्रगती
तसे पाहिले तर यशाची व्याख्या करणं कठीण, कारण प्रत्येकाची यशाची व्याख्या वेग-वेगळी असू शकते, नव्हे असतेच. तुमच्या जीवनातील ध्येयापर्यंत पोहोचण्याची क्षमता म्हणून देखील आपण याकडे पाहू शकतो. मला वाटतं यशासाठी चांगला शब्द म्हणजे साध्य, सिद्धी किंवा प्रगती असा असू शकतो. हा एक प्रवास आहे जो तुमची भरभराट / उत्कर्ष होण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि संसाधने विकसित करण्यास मदत करतो. यशाची व्याख्या सहसा जीवनात तुमची वैयक्तिकरित्या सांगितलेली उद्दिष्टे पूर्ण करणे अशी केली जाते. कारण उद्दिष्टे स्वत:च तयार केली जातात, ती पूर्ण केली की लोक त्यास यश म्हणून पाहतात, आणि हे त्यांच्या गरजा, ध्येय आणि महत्वाचं परिस्थिती नुसार बदलू शकतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी विविध कल्पना, युक्त्या लढवल्या जाऊ शकतात परंतु तुमच्यासाठी सर्वोत्तम कार्य करणारी रणनीती तुमच्यासाठी यशाचा अर्थ काय यावर अवलंबून असू शकते. तुम्ही जिथे कामास आहात अथवा तुमचे स्वत:चे स्टार्टअप आहे तर या ठिकाणी उत्तम काम करणे, उत्तम व्यवसाय मिळविणे अथवा नोकरीस असल्यास पगारा बाबत उत्तम पगार मिळविणे आणि स्टार्टअप असल्यास उत्तम नफा मिळविणे यांना प