HCL चा टेक-बी ट्रेनिंग प्रोग्राम
HCL या सॉफ्टवेअर क्षेत्रातील अग्रेसर कंपनीने रोजगार उपलब्धी मध्ये खुप महत्वपूर्ण असे पाऊल टाकले आहे. HCL ने मदुराई येथे १०+२ विद्यार्थ्यांसाठी सॉफ्टवेअर इंजिनियरिंग क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. भारत सरकारच्या स्कील इंडिया मध्ये याचे योगदान मानले जाते आहे. भारत सरकारच्या नवीन धोरणानुसार केंद्र शासन कौशल्य विकासावर(स्कील इंडिया) आपले लक्ष केंद्रित करीत असताना खाजगी क्षेत्रातील एका मोठ्या कंपनीने देखील यात योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे याचे खरच कौतुक करण्यासारखे आहे. कौशल्य विकास साधता आल्यास विद्यार्थ्यास रोजगार उपलब्धी तर होईलच सोबत विद्यार्थ्याकडे स्वयं-रोजगार सुरु करण्याची संधी उपलब्ध असेल ज्यामुळे त्यास पैसे कमविणे सहज शक्य होईल. हे साध्य करण्यासाठी केंद्र सरकार अनेक तज्ञ मंडळींच्या हस्ते विविध कोर्सेस सादर करीत आहेत. या प्रकल्पा अंतर्गत उमेदवारास त्याच्या आवडत्या क्षेत्रात करिअर करता येवू शकते.बऱ्याच वेळा कौशल्य असते परंतु रोजगार उपलब्धी होत नाही तर कधी रोजगार उपलब्धी असते पण उमेदाराकडे कौशल्य नसते अगदी हेच या योजनेंतर्गत केंद्र सरकार बारकाईने...