पोस्ट्स

Whatsapp स्वभाव !!

इमेज
           शीर्षक वाचून थोड आश्चर्य वाटल असेल, हो ना? पण हे खर आहे, ह्या एका नव्या स्वभावाच वरदान मनुष्याला तंत्रज्ञानाने दिले आहे. आपण रोज विविध व्यक्तीना भेटतो त्यांचे स्वभाव पाहतो अनुभवतो आणि आपसूकच पु.लं. ची आठवण होते, त्यांच्या “व्यक्ती आणि वल्ली” ची ! मनुष्य प्राणी हा असाच आहे कधी एखाद्याला एकमेकाशी बोलायला कसलीच ओळख लागत नाही तर कधी एखाद्याला ओळख असतानाही बोलणे जमत नाही. ओळख नसतानाही बोलणारे आणि आपलस करून घेणारे लोक खरच स्वत:च एक अस्तित्व तयार करतात. स्वत:ची एक स्पेस तयार करतात, तुम्हालाही असा अनुभव आला असेलच कि !! पण आता जमाना whatsapp आणि फेसबुक चा आलाय मग त्यात विविध समूह (ग्रुप) आले, समुहातील गप्पा आल्या ! महत्वाच म्हणजे माणस आली....            माझ निरीक्षण अस सांगत कि समूह तयार करणारा एक प्रमुख व्यक्ती असतो कि जो त्याच्या सम्पर्कातील विविध मंडळीना एका समुहात बांधण्याच काम करतो. कधी समूह एखाद्या विशिष्ट ध्येयाने प्रेरित होवून तयार केलेले असतात काहीवेळा सहजच केलेले असतात. प्रत्येक समूह सदस्याची एकमेकांची ओळख असतेच अस ...

व्यावसायिक आमंत्रण पत्र - कौशल्य - स्किल सेट २

इमेज
          “किरण, आपल्या कंपनीच्या वर्धापन दिनाचे आमंत्रण पत्र दोन दिवसात तयार कर आणि मला दाखव.” किरण च्या साहेबांनी किरण ला फर्मावले. साहेबांच्या या नव्या फर्मावलेल्या ऑर्डर ने किरण पुरता गोंधळून गेला, किरणला लक्षात येईना कि कोणता प्रोग्राम / सॉफ्टवेअर वापराव आणि साहेबांना खुश कराव. याच विचारात तो संगणकावर कंपनी चे रोजचे काम करू लागला. किरण च तोडक ज्ञान आत मात्र त्याला आडव येत होत. त्याने कधीच ऑफिस कामा व्यतिरिक्त संगणक वापरला नव्हता त्यामुळे त्याची चांगलीच पंचाईत झाली होती. तेवढ्यात त्याचा मित्र राहुल त्याच्या जवळ आला व त्याला म्हणाला, “किरण, काय करतो आहेस? काही अडचण ? , यावर किरण ने काही नाही अशी नकारार्थी मान हलवली आणि परत काम करू लागला. राहुल ला कळून चुकले कि काही तरी गडबड आहे तो परत म्हणाला चेहरा का असा झालाय ?, मी काही मदत करू का? यावर किरण म्हणाला, “नेकी और पुछ पुछ.” दोघे हि हसले पुढे किरण म्हणाला, “अरे राहुल, आज साहेबांनी वर्धापन दिनाचे आमंत्रण पत्र तयार करायला सांगितले आहे, मला !! कस तयार करावे काहीच कळेना, “मी एवढा संगणक कधी वा...

ऑनलाईन शिक्षण पद्धती- एक संधी

गिरीश कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग चे शिक्षण घेत आहे. गिरीश ला शिक्षण घेताना सतत अपडेट रहायची सवय आहे. एके दिवशी त्याने ऑनलाईन शिक्षण पद्धती बद्दल माहिती घ्यायचे ठरविले पण त्याला सुरुवात कशी करावी हे कळेना. वैदेही त्यांची मोठी बहिण नेहमी त्याला अशा कामात मदत करत असते. संगणक हाताळण्याच्या तुटपुंज्या ज्ञानावर गिरीश प्रयत्न करीत आहे पण त्याला काही जमत नव्हते. वैदेही चे पदवी पर्यंत चे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि आता सध्या ती पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. हे शिक्षण घेत असतानाच वैदेही ने एम.एस.सी.आय.टी. कोर्स चे प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे तिला विविध बाबी इंटरनेट वर कशा शोधायच्या हे अवगत आहे, ते ती कोर्स मध्ये शिकली आहे.           गिरीश ला सुरुवात कशी करावी हे कळेना हे वैदेही च्या लक्षात आल्यावर वैदेही ने लागलीच ऑनलाईन शिक्षण पद्धती बद्दल गिरीश ला सांगायला सुरुवात केली, वैदेही म्हणाली, “बऱ्याच वेबसाईट आहेत ज्या ऑनलाईन शिक्षण पद्धती मध्ये शिक्षण उपलब्ध करतात, ज्या मध्ये व्हिडीओ कोर्स व वेब कोर्स असे दोन पर्याय उपलब्ध होतात.   ...