पोस्ट्स

गुगल होम – तुमचा वैयक्तिक सहाय्यक

इमेज
गुगल विविध सेवांसाठी सर्वश्रुत आहे ! इंटरनेट वर काहीहि काम असल कि युजर गुगल ला पहिली पसंती देतो. गुगलवर सर्च करायचं आणि पुढे जायचं अस साधारण इंटरनेट वापरणाऱ्याचे असत अस सर्वेक्षण सांगत. गुगल च्या विविध सेवांबद्दल मी या अगोदर लिहिले आहे पण आज तुम्हाला गुगल ने देवू केलेल्या नवीन सेवे बद्दल माहिती सांगणार आहे. गुगल नित्य नवीन नवकल्पना घेवून आपल्या भेटीला येते, मग त्या मध्ये विविध अॅप्लीकेश्न्स असतील अथवा गुगल सूट असेल वा इंटरनेट ऑफ थिंग्ज या तंत्रज्ञानावर आधारित गुगल ग्लास असेल, गुगल सदैव भविष्यातील तंत्रज्ञानासह आपल्याला आजच अचंभित करते हे खरे, अशीच एक नवीन संकल्पना घेवून गुगल यावेळी आल आहे, “गुगल होम” ला घेवून, गुगल होम हा तुमचा तुमच्या घरातील सहाय्यक असेल जो तुमच्यासाठी तुमच्या सांगण्यावर, तुमच्या आवाजाच्या आदेशानुसार गाणी लावेल, तुमची शॉपिंग लिस्ट तयार करेल, तुमच्या ऑफिस च्या प्रवासात वाहतुकीचा मार्ग मोकळा आहे कि वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे या बद्दल तुम्ही विचारताच माहिती मिळेल. तुमची उद्याची कार्यालयातील नियोजित भेट किती वाजता आहे या बद्दल हि गुगल होम मदत करेल, आहे ना नवकल्पना ...

सर्व्हेक्षण करा गुगल फॉर्म्स सोबत

इंटरनेट मुळे जग बोटांवर स्थिरावत चालल आहे, हे तुम्हालाही जाणवत असावं. तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची अडचण आली कि नकळतपणे आपण गुगल कडे त्याच उत्तर शोधायला सुरु करतो, आता याची काही मंडळीना तर सवय झाली आहे. काही माहितीची गरज भासली कि आहेच, गुगुल !! अर्थात गुगुल ने देखील वापरकर्त्याच्या (तुमच्या, आमच्या) गरजेप्रमाणे सेवा पुरवायला सुरुवात केल्याने गुगल ची लोकप्रियता वाढली आहे आणि ती अशीच वाढत जाईल यात कोणताही किंतु मला वाटत नाही. गुगल ने “गुगल सूट” या नावाने त्यांच्या विविध सेवा पुरविल्या आहेत. मग त्यात ई-मेल, कॅलेंडर, गुगल मॅप, गुगल डॉक्युमेंट   असेल, व्हॉइस टायपिंग अथवा फॉर्म्स असेल सगळ्या सेवा एकाच नावाने अर्थातच “गुगल”. ४ सप्टेंबर १९९८ साली सुरुवात झालेल्या या कंपनीने लक्षणीय यश कमविले आहे. इंटरनेटचा वापर करीत असताना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न हि कंपनी सदैव करीत आहे, हे विशेष !! व्यवसाय करीत असताना ज्या ऑनलाईन गरजा असतात त्या जवळपास सगळ्या गुगल पूर्ण करीत आहे असे म्हणाल्यास वावगे होणार नाही. मग तुम्ही वापरत असलेलें ई-मेल असो, एखादे डॉक्युमेंट असो अथवा एखादी ...

२०१८ मधील डिजिटल नेतृत्व

इमेज
२०१८ हे वर्ष डिजिटल युगाशी जोडलेले वर्ष ठरणार आहे अस विविध सर्वेक्षणामधून वर्तविण्यात येत आहे. आणि हे खर देखील आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ( Artificial Intelligence ) याने तर तंत्रज्ञानामध्ये खूप बदल होणार आहे. अर्थात हे बदल मानवास पूरक असेच असणार आहेत. त्यामुळे जीवनशैली मध्ये अमुलाग्र बदल देखील अनुभवता येणार आहेत, हे नक्की ! पण हे बदल घडत असताना एक नव नेतृत्व तयार होण्याची नितांत गरज असते अस तज्ञाच मत आहे. मग त्या नेतृत्वामध्ये कोणती वैशिष्टये असावीत याच्या बद्दलच आपण आज माहिती घेणार आहोत. मागील दशक हे इंटरनेट क्रांतीचे दशक म्हणून ओळखले गेले ज्यामुळे बऱ्याच बाबी आता सहज करता येतात जसे, मोबाईल रिचार्ज असेल अथवा मोबाईल पेमेंट असेल अथवा ऑफिसला पाठवायचा मेल असेल, सगळ अगदी चुटकी सरशी पाठविता येतं. प्रत्येक व्यक्ती आभासी एकमेकास जोडला गेलेला आहे, नाही का? या क्रांतिकारी परिस्थितीचा सामना करताना, आपल्याकडे दोन पर्याय आहेत, एक- हा बदल स्विकारायचा आणि या बदलाच्या लाटेवर स्वार व्हायचं नाहीतर जगाच्या मागे रहायचं !! या दोन पर्याय शिवाय तिसरा पर्याय उपलब्ध नाहीच. या सर्वा मध्ये डिजिटल नेतृत्वाल...