व्हायरस पासून संरक्षण
नीलिमा शहरातील एका फायनान्शियल कंपनीत नोकरीस आहे, तिने तिच्या कॉम्प्युटरवर ऑफिसचा सर्व डेटा स्टोअर केला आहे आणि रोजच्या रोज ती त्याचा बॅकअप देखील घेते. एके दिवशी नेहमीप्रमाणे ऑफिस आल्यावर ती तिच्या कामात व्यस्त झाली आणि तिचे ऑफिसच्या विविध फाईल्स चे संगणकीकरण करणे सुरु होते तेवढ्यात तिचे लक्ष शेजारील डेस्क वरील प्रणाली कडे गेले, तिच्या अस लक्षात आल कि प्रणाली बराच वेळ झाला काहीच काम करत नाहीये, तिने लागलीच प्रणालीला विचारल, “का गं प्रणाली, काय झाल?”, आज काय मूड नाही का काम करायचा? यावर प्रणाली म्हणाली, “नाही गं, नीलिमा, अस काही नाही पण माझ्या कॉम्प्युटरवरील फाईल्स ओपन होत नाहीत त्यामुळे टेन्शन आल आहे.” नीलिमा ने प्रणालीला तिच्या कॉम्प्युटर चा पासवर्ड मागितला आणि तिच्या कॉम्प्युटरवर ती फाईल्स ओपन होतात का ते पाहू लागली. तिच्या लक्षात आले कि ज्या प्रोग्राम मध्ये फाईल्स तयार केलेल्या आहेत तोच प्रोग्राम ओपन होत नाहीये!! ती लागलीच प्रणाली ला म्हणाली, अग तुझ्या कॉम्प्युटर वर व्हायरस आहे, त्यामुळेच हा असा प्रॉब्लेम येत आहे”, नीलिमा ने कॉम्प्युटर कोर्स केलेला असल्याने