संत श्री ज्ञानेश्वर – मुक्ताई

सध्याच युग हे आर्टिफिशियल इंटेलिजंसच युग, जिथे ड्रायवरलेस कार आल्या आहेत, अशा जमान्यात दिग्दर्शकाने “भिंत” चाललेली दाखवणं कितपत रुचेल हा खरा प्रश्नच ! पण तरीही दीगपाल लांजेकर आणि टीम ने हे धाडस केलं आणि १४०० वर्षे वयोमान !! असणाऱ्या योगींच्या स्वागताला सामोरं जाण्यासाठी संत श्री ज्ञानेश्वरांनी भिंत चालविली. हे सारं दिव्यच ! या दिव्यत्वाची महती आणि माहिती नव्या पिढीस होणे नितांत आवश्यक आहे. वाचन आणि संयम कमी होत चाललेल्या युवा पिढीस हा विषय पडद्यावर दाखवणं आणि चित्रपट गृहात आणणं हे एक आव्हान आहे. तंत्रज्ञानाच्या युगात आध्यात्मिक वारसा जपणं आणि त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं मला कौतुकास्पद वाटतं. हे एक दिग्दर्शक निर्माते म्हणून आपण जाणलं आणि कशाचीही पर्वा न करता हे आपण पडद्यावर साकारलं. यासाठी प्रथम आपले मन:पूर्वक आभार ! श्रद्धा ,भक्ति आणि नम्रता या जोरावर अनेक असाध्य गोष्टी साध्य होतात याचे दर्शन या चित्रपटात होते. अहंकारामुळे होणारे नुकसान सामान्य जनास दिसत नाही, पण भक्ति मार्गावर असणाऱ्या मंडळीना हे सारं ज्ञात असतं. बदलत्या काळा नुसार बदलणे क्रमप्राप्त असतं तसं बदलाव...