श्रद्धा आणि देव
आपण आयुष्यभर कोठे न कोठे श्रद्धा ठेवून असतो मग ती गुरूंवर असेल , देवा वर असेल, जन्मदात्या आई- वडिलांवर असेल, श्रद्धा हि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भेटते, काही ना काही अनुभूती देते म्हणूनच ती प्रत्येकाच्या आयुष्यात टिकून असते. मला वाटत तसे अनुभव तुम्हालाही आलेले असतील. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक आहे , तो ज्याला कळाला त्याला ती तारक वाटते, सुखावह वाटते पण श्रद्धा हि अंधश्रद्धा होवू नये कारण मग ती मारक ठरू शकते. “देव” हा एक श्रद्धेचा भाग आहे, आस्थेचा भाग आहे, ज्याची जशी श्रद्धा तसा त्यास अनुभव !!! कोणास कधी देव माणसात भेटतो, कधी तो फक्त अनुभवता येतो तर कधी दगडात देखील देव दिसतो, तो आहे अस आपण मानतो. पण ज्या दगडास घडवून मूर्ती तयार होते त्या मूर्तीत देव मावतो ? हा श्रद्धेचा भाग आहे. भारतात तरी याच उत्तर होकारार्थीच आहे. श्रद्धा ठेवली तर दगडाच्या मूर्तीत देव वसतो व मावतो देखील. जो मूर्तिकार मूर्ती घडवितो त्यास देवाची अनुभूती मिळते का? याच उत्तर एखादा मूर्तिकारचं देवू शकेल. जेंव्हा दगडाला एखाद्या मूर्तीच मूर्त रूप येते तेंव्हा त्यात आपल्याला कल्पनेप्रमाणे (मनात असणाऱ्या चित्रा प्रम