फॉलोअर

वाचाल तर कमेंट कराल

 

आश्चर्य वाटलं असेल शीर्षक वाचून ! पण आजच्या सोशल नेटवर्किंग च्या जमान्यात कमेंट आणि लाईक्स मिळणं खूप महत्वाचं झाल आहे. जर कमेंट आणि लाईक्स नसतील तर ती पोस्ट वाया गेली अस मानण्यात येतं. सोशल नेटवर्किंग करीत असताना तुमची मित्र संख्या मर्यादित आहे अथवा तुमच्या मित्रांना (अर्थात सोशल मेडिया वरील) तुमच्या पोस्ट मध्ये रस नाही.... असे एक ना अनेक निष्कर्ष काढता येवू शकतात, तुम्ही कधी पाहिलं आहे का, सोशल नेटवर्किंग करीत असताना एखादा फोटो पोस्ट केला तर मिळणाऱ्या कमेंट अथवा लाईक्स आणि फक्त मजकूर पोस्ट केल्यावर मिळणाऱ्या लाईक्स खूप तफावत असते, कारण काय असू शकेल यावर काही सर्व्हेक्षणं झाली त्यात असा निष्कर्ष काढण्यात आला आहे कि नेटीझन्स ना (युजर्स ना) वाचायला नको असते (अर्थात त्यातही मोजमापं आहेत, थोडा मजकूर असेल तर वाचावा, जास्त असल्यास नको), कमेंट आणि लाईक करायचे म्हंटले कि तो वाचावा लागेल मग  वाचावे कुणी ? एक म्हण माहिती असेल, “वाचाल तर वाचाल”, हे किती जरी खरे असले तरी वाचावे कुणी?


          आता हाच मजुकर कुणी वाचेल का? हा प्रश्न मला लिहिताना पडला आहे, पण मला वाटत सोशल मेडिया, ई-बुक्स या माध्यमातून खूप चांगल्या गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात आणि तेही चकटफू ! मग आपण त्या मनावर का घेत नाही, वाचन संस्कृती वाचवणं आणि टिकवणं हे आपल्या हातात आहे, आपण हे प्राध्यान्याने केले तर आपली पुढील पिढी वाचायला शिकेल, असे मला वाटते. याचा अर्थ असा कुणी घेवू नये कि वाचन संस्कृतीस फारच वाईट दिवस आहेत म्हणून मी हे लिहितो आहे, छे ! असे काही नाही, पण युवक वर्ग मात्र या संस्कृती पासून दूर जातोय असे चित्र आहे. हा वर्ग ग्रंथालयात किती वेळा जातो, किती पुस्तकं वाचतो / चाळतो, (अभ्यासाचीच (परीक्षेवेळी) वाचली /चाळली जातात हे नशीब !) ८० च्या दशकात बिल गेट्स ने अगदी हेच ताडलं असाव आणि त्याने चित्रांचा आधार घेवून ऑपरेटिंग सिस्टम तयार केली जिला आपण “विंडोज” म्हणून ओळखतो. हि ऑपरेटिंग सिस्टम एवढी लोकप्रिय का झाली तर हि चित्रांच्या आधारे चालते, अगदी हाच प्रकार सोशल नेटवर्किंग मध्ये वापरला जातो, फोटो पोस्ट केला कि तो एका नजरेत कळतो आणि युजर आपसूकच “लाईक” ठोकतो, पण मजकुराच्या बाबतीत असे होत नाही.

          असो, या नव्या सोशल नेटवर्किंग च्या जमान्यात मी एवढचं म्हणेन “वाचाल तर कमेंट कराल” !

 

ता.क.: माझ्या या लेखाचा अर्थ कृपया असा घेवू नये, कमेंट अथवा लाईक करणे अनिवार्य असते, ती करावीच लागते असा माझा आग्रह आहे. नेटीझन्सनी वाचन संस्कृती जोपासावी एवढाच काय तो या लेखाचा अर्थ घ्यावा.

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर       


इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी खालील लिंकला क्लिक करावं  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?