फॉलोअर

गुगल मॅप आहे तरी काय ?

 

सरिता आणि जुईली इ. ११ वीच्या एकाच वर्गात शिकत आहेत. नुकतीच कॉलेजमध्ये ‘कोण बनेल आय टी जिनिअस?’ ची नोटीस नोटीसबोर्डवर लावलेली दोघींनी पहिली आहे. ती पाहून सरिता जुईलीला म्हणाली जुई, आपण स्पर्धेत भाग घ्यायचा? यावर जुईली म्हणाली अगं, तुला आय टी बद्दल काय माहिती आहे? मला तर काहीच माहिती नाही.” यावर सरिता म्हणाली, ‘अग मी व्हेकेशन मध्ये संगणक कोर्स पूर्ण केला आहे. त्यामुळे माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे की, मी कोण बनेल आय टी जिनिअस स्पर्धेत प्रवेश घेऊ शकते. तू ही तुझं आय टी ज्ञान तपास,” सरिता म्हणाली. यावर जुईली म्हणाली “ते तर मी करणारच आहे, पण ......पण काय? सरिता म्हणाली, जुईली म्हणाली अग पत्ता बघ ना काय लिहिलाय? मला नाही माहित ती जागा कुठेय? सरिता म्हणाली “हत् तेरी, एवढचं ना, मी शोधून देते तुला पत्ता,” जुईली म्हणाली. कसं काय?” सरिता म्हणाली अग गुगल मॅप्स आहे ना! हे काय नवीन ? जुईली म्हणाली.

सरिता पुढे बोलू लागली गुगल मॅप्स ही सेवा गुगल ने तयार केलेली आहे ही सेवा सॅटेलाईट इमेज सुविधेचा वापर करते व कोणताही रस्ता, ठिकाण शोधण्यात आपल्याला मदत करते. या सुविधेसोबत एखाद्या रोडवर ट्रॅफिक परिस्थिती कशी आहे. याची सूचना या सुविधेमुळे प्राप्त होते. साधारण २००४ मध्ये ही सुविधा सुरु झाली. तेव्हापासून प्रत्येक संगणक वापरकर्ते, व्यावसायिक, प्रशिक्षण केंद्र यांनी स्वत:च लोकेशन मॅप्स वर मार्क करून ठेवले आहे. सरिताला थांबवत जुईली म्हणाली, मला माझं घर देखील गुगल मॅप्स वर मार्क करता येईल काय? सरिता म्हणाली, हो अगदी सहज सोप्या पद्धतीने तू तुझं गुगल मॅप्स वर मार्क करू शकतेस. तुझ्याकडे जीमेलचा ईमेल आयडी असावा की तू लागलीच ही सेवा वापरू शकते.

गुगल मॅप्स जर स्मार्ट फोन वर वापरत असू अथवा डेस्कटॉप कॉम्पुटर वर तुम्हाला लोकेशन नावाचा पर्याय येतो ज्यामुळे तुम्ही कोठे आहात हे दाखविले जाते त्यात तुमचे स्वत:चे लोकेशन दिले की झालं. या नंतर कोठे जायचे आहे ते इनपूट करायचे, गुगल मॅप तुम्हाला त्यावर उपलब्ध पर्याय उपलब्ध करतो त्या पर्यायांपैकी तुमचा पर्याय निवडा व नॅव्हीगेशन या बटनावर क्लिक करा तुम्ही ज्या प्रकारे पुढे जात रहाल त्याप्रमाणे मॅपवर रूट दाखवीला जातो, झालं तर मग आपणही असाच गुगल मॅप चा वापर करायचा आणि परीक्षा केंद्र शोधायचे. आलं का लक्षात जुईली? जुईली म्हणाली “हो आलं लक्षात” आणि थँक्स आज तुझ्या मुळे नवीन काही शिकू शकले.

गुगल मॅपचा वापर आता आपण सगळेच करतो, आपल्याकडील स्मार्ट फोनवर उपलब्ध सुविधेत आपण कुठेही खंड पडू देत नाही, पण याची सुरुवात जेंव्हा झाली तेंव्हा खूप अप्रूप वाटायचं आपलं लोकेशन इंटरनेटच्या माध्यमातून सर्वांसमोर येत याचा आनंद असायचा. आताच्या पिढीस लोकेशन हुडकणे फारसे आव्हानात्मक राहिले नाही, थंँक्स टू गुगल !! 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर 


 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?