फॉलोअर

टम्बलर काय आहे ?

 

 टम्बलर हि एक मायक्रोब्लॉगिंग सोशल नेटवर्किंग साईट आहे. मायक्रोब्लॉग हा ब्लॉग पेक्षा थोडा वेगळा असतो,या मध्ये इमेजेस,व्हिडीओ लिंक्स, युजर शेयर करू शकतो किंबहुना मायक्रोब्लॉग लोकप्रिय होण्याचे हेच मुख्य कारण मानले जाते. ब्लॉगर पेक्षा मायक्रोब्लॉगर्स एखाद्या विषय सबंधीची माहिती विविध चित्राद्वारे किंवा व्यवसायिक दृष्टीकोनातून वेबसाईटस, सेवा, उत्पादन यांचे मार्केटिंग करणे हेतू देखील वापर करता येऊ शकते. टम्बलर ची स्थापना २००७ मध्ये डेव्हिड कार्प ने केली पुढे जावून २०१३ मध्ये याहू ने ती विकत घेतली. हि सेवा युजरला ब्लॉगवर मल्टी-मेडिया वापरण्याची मुभा देते आणि या मध्ये युजरला मिळणारा डॅश बोर्ड खुप महत्वाचा आहे. युजरला फोटो, मजकूर, कोट, संगीत आणि व्हिडीओ आपल्या ब्राऊजर च्या सहाय्याने पोस्ट करता येते. आज मितीस ३३७ दशलक्ष एवढे ब्लॉग्ज व १४६ अब्ज पोस्ट १७ भाषांमध्ये उपलब्ध आहेत.

          टम्बलर मध्ये मिळणारा डॅश बोर्ड आणि लॉग देखील उपलब्ध होतो. टम्बलर ची अजून एक खासियत अशी सांगता येईल कि मोठ्या पोस्ट म्हणजे ब्लॉग,भरपूर लिखाण म्हणजे ब्लॉग अस इथे नाही, अगदी साधी पोस्ट, साधा मेसेज, ऑडीओ किंवा तुमच्या मोबईल वरून देखील तुम्ही ब्लॉग पोस्ट करू शकता आणि

तुमच्या मित्रांना (कोलॅबरेशन मध्ये) त्यात बदल करणे हेतू अथवा संपादित करणे हेतू आमंत्रित करता येते. युजरला त्याच्या गरजे प्रमाणे पोस्ट खासगी ठेवता येते. सोबत विविध पाने जसे अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस अशी वेबसाईट वर लागणारी पाने देखील ब्लॉग ला वापरता येतात.

          सर्च इंजिन आँप्टीमायझेशनची सुविधा देखील टम्बलर ने देवू केली आहे, ज्यामुळे सर्च इंजिन मध्ये तुमचा ब्लॉग, पेजेस सर्च करीत असताना प्राधान्याने दिसतात. युजरला त्याच्या ब्लॉगसाठी वेगळे कॉपीराईट घ्यावे लागत नाहीत हे देखील टम्बलर चे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. तुम्ही टम्बलर वर पोस्ट केलेली पोस्ट / ब्लॉग हा फेसबुक, ट्वीटर च्या न्यूज स्ट्रीम मध्ये दिसण्याची सोय देखील टम्बलर मध्ये करण्यात आलेली आहे.

          चला तर मग तुमचे ब्लॉग तयार करा व टम्बलर वर अपलोड करा आणि सोप्या, छोट्या, मल्टीमेडिया ब्लॉगच्या दुनियेत प्रवेश करा !!!

          टम्बलिंग साठी खुप खुप शुभेच्छा !!!

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर 


इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?