ads

फॉलोअर

आज वाचा

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

इमेज
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही. ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...

मेरा गम – तेरा गम

 

दुनिया में कितना गम है , मेरा गम कितना कम है , उस्ताद आनंद बक्षी लिखित “अमृत (१९८६)” या चित्रपटातील हे गीत , जीवना कडे पाहण्याची नवी दृष्टी देत असे मी मानतो. स्वत:च्या अडचणी, दू:ख कुरवाळत बसलो की ती मोठी वाटतात, पण जरा इतर व्यक्तींकडे पाहिलं, आजू-बाजूला पाहिलं की लक्षात येईल आपल्याकडे असलेल्या दू:खा पेक्षा किती तरी मोठं दू:ख इतरांकडे आहे. सोलापूरचं साहित्य वैभव कविश्री स्व. दत्ता हलसगीकर यांनी कवितेतून दू:खाच स्वागत करावं असेच सांगितले, तुम्ही त्याला आपलसं  केलं , नाही तर त्याने जायचे कुठे? असा सवाल केला आहे. खरं ही आहे ते, दू:ख तो अपना साठी है !! प्रत्येक मनुष्याच्या जीवनात दू:खास अनन्य साधारण असे महत्व आहे, किंबहुना दू:ख आहे म्हणून सुखाची किंमत आहे, नाही का?   

          शशी म्हणजे एक स्वाभिमानी मुलगा, स्वत:च्या कष्टावर मोठा झालेला, लहानपणापासून तो कधीच दुसऱ्या कुणावर अबलंबून राहिला नाही, लहानपणीच शशिला एका पायास पोलिओ झाला, शशी असो वा कुणीही दिव्यांग व्यक्ती कधीच कुणावर अवलंबून राहत नाही, किंबहुना तसा त्यांचा स्वभावच नसतो. ही मंडळी स्वाभिमानी, आत्मनिर्भर राहण्यात सामान्य माणसाच्या एक पाऊल पुढेच असतात. शशी त्यास अपवाद नव्हता. शाळेत असताना विविध मैदानी स्पर्धांचे आयोजन शाळेत व्हायचे त्यात भाग घेण्यास त्यास मज्जाव होत असे कारण, शरीर साथ देत नसे, त्यावेळी त्यास खचल्या सारखे व्हायचे, हिरमुसला होऊन शशी घरी यायचा, त्याचे वडील त्यास विचारत, “काय झाले?”, शशी शाळेतील सर्व हकिकीत सांगत असे, यावर शशीचे वडील शशिला समजावत असतं, “हे बघ शशी, तुला एक पाय नाही म्हणून तू निराश होऊ नकोस, खचू नकोस, तू दुसऱ्या कडे बघ, ज्यास दोन्ही पाय नाहीत”, तुझा एक पाय उत्तम आहे, त्याच्या आधारे तुला खूप काही करता येऊ शकतं.” शशिला हे पटायचं, तो आनंदी व्हायचा आणि अभ्यासात रमून जायचा.

          स्वत:च दू:ख जास्त आहे असं वाटू लागलं की दुसऱ्याकडे पहावं , जगा कडे पहावं मग लक्षात येतं , त्याच्या समोर आपलं दू:ख काहीच नाही. बाबा जाऊन दहा वर्ष झाली, एक दशक पूर्ण झालं, बाबा गेले तेंव्हा खूप वाईट वाटायचं माझ्या बरोबरचं का असं झालं? बाबा सोडून जाउचं कसे शकतात? देवाने आपल्या सोबतच हा खेळ का मांडला? असे आणि अनेक विचार डोक्यात यायचे पण जेंव्हा आजूबाजूला पहिलं तेंव्हा लक्षात आलं की असं माझ्या सोबतच नाही तर छोट्या सौरभ सोबतही झालं आहे तो तर अद्याप कॉलेज मध्ये शिकतो आहे, माझ्या पेक्षा लहान आहे तरी त्याचं आभाळ त्याच्या सोबत नाही, भलेही तेंव्हा माझं आभाळ माझ्या सोबत नव्हतं पण त्याचं दू:ख माझ्यापेक्षा मोठं होतं. समाधान मानावं लागतं कुठेतरी, आणि अर्थातच समाधान मानण्यातच असतं. ते मानायला शिकावं लागतं एवढच !!

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर


इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छावा

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

एआय शिक्षकांची जागा घेईल ?