फॉलोअर

मोबाईल हरवला तर ?

 

शीर्षक वाचून गोधळलात का ? गोंधळून जावू नका पण आज मोबाईल या संवाद (?) साधना बद्दल काही सत्यता तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हे करीत असताना एक विचार सुद्धा मांडत आहे कि तुमचा मोबाईल गहाळ झाला तर ? काय होवू शकेल? हा विचार सुद्धा मनाला शिवत नाही, हो ना ?  याचही एक कारण आहे ते अस, एवढे दिवस अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा आहेत असं आपणं मानतं होतो पण २१ व्या शतकात या सोबत मोबाईल हि एक गरज बनली आहे. शाळा, कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुलांपासून ते अगदी आजी आजोबांपर्यंत या मोबाईल ने सगळ्यांशी गट्टी जमविली आहे आणि गट्टी साधी सुधी नाही अगदी “जिगर” दोस्ती, मेड फॉर इच अदर म्हणाना ! थोडं आश्चर्य वाटेल पण वास्तव तर असच आहे. मागील वर्षी कोरोना मुळे चालू झालेल्या लॉकडाऊन मध्ये सच्चा साथी म्हणून मोबाईलने प्रमुख भूमिका बजावली आहे. तीच भूमिका आताच्या लॉकडाऊन मध्येही बजावतो आहे, नाही का? या  मोबाईल ची फोन करणे, संवाद साधणे हि प्राथमिकता पण काही ठिकाणी तर हि प्राथमिकता सोडूनच इतर कारणांसाठी हा मोबाईल वापरला जातो. एक सर्वेक्षण असं सांगत कि हा मोबाईल एक वेळ आलेला फोन रिसीव्ह करायाला कमी वापरला जाऊ शकतो पण त्यावरील अॅप साठी हा मोबाईल वापरतात अलीकडे काही मंडळी !  आज भारतातील मोबाईल वापरकर्त्यांची संख्या हि ७७५ दशलक्ष एवढी आहे. आणि 2023 पर्यंत हि संख्या ९६६  दशलक्ष एवढी होईल. हि संख्याच खूप काही सांगते.

          मोबाईल अॅप (आय.ओ.एस. आणि गुगल प्ले स्टोअर) वापरण्यात आपण प्रथम क्रमांकावर आहोत, आपल्यानंतर अमेरिका आणि तृतीय क्रमांकावर चायना,

हि क्रमवारी एका अॅप च्या वापराची आहे. (स्त्रोत:इंटरनेट) आपण किती अॅप-आधीन आहोत हेच जणू या आकडेवारी वरून लक्षात येतं. यामध्ये नेटफ्लिक्स सारखं अॅप भारतीय जनतेस मोबाईल वर बिझी ठेवण्यात अग्र-क्रमांकावर आहे आणि नंतर क्रमांक सोशल मिडिया अॅप्सचा त्यात व्हॉटस् अॅप, फेसबुक !! हि परिस्थिती झाली पण एका गोष्टीचा जर आपण विचार केला कि आपण सगळे एवढे का आहारी जातो आहोत या अॅप्स च्या तर त्याचं काही फार समाधान कारक उत्तर नाही मिळणार.... आजकाल कुठेही जा म्हणजे अगदी भाजी मार्केट पासून सुरुवात करू, भाजेवाले मोबाईल हातात धरून काही ना काही बघत बसलेले असतात, तुम्ही कोणती भाजी घेताय याकडे देखील त्यांचे लक्ष नसते, पैसे घेताना देखील मोबाईल स्क्रीन कडे पाहणे सुरूच असते. तुम्हालाही असा अनुभव आला असेल. हो ना ? हीच परिस्थिती सगळीकडे पहायला मिळते, हॉटेल, लंच रूम्स, थियेटर, रस्ता, बस थांब्यावर, कॉलेज मध्ये क्लास सुरु असताना (थोडं अति रंजित वाटेल पण वास्तव), वाहन चालविताना, जो तो मोबाईल स्क्रीन मध्ये व्यस्त ! कुणी ऑनलाइन गेम्स खेळण्यात व्यस्त तर कुणी ऑनलाइन व्हिडियो स्ट्रीमिंग पाहण्यात व्यस्त तर कुणी सोशल मिडीया मध्ये व्यस्त ! गृहिणी स्वयंपाक करीत असताना देखील मोबाईल हाताळताना दिसतात, लहान मुले जिंगल्स पाहण्यात व्यस्त, एकूण काय तर सगळेच व्यस्त !! पण हे एक व्यसन आहे का? अस वाटतं का तुम्हाला, संवाद सहज साध्य व्हावा या हेतूने मोबाईल ची निर्मिती करण्यात आली पण वापर फक्त करमणुकी साठीच जास्त होतो आहे हे आता ध्यानात घेतलं पाहिजे यामुळे आपलं आयुष्य या मोबाईल भोवतीच घुटमळतं आहे.     

            मग असा हा मोबाईल हरवला तर काय होईल? आता लॉकडाऊन मध्ये हे परवडणारे नाही, किंबहुना तसा विचार देखील करवत नाही. पण भाजीवाल्या पासून ते वाहन चालविणाऱ्या पर्यंत जो तो त्याच्या कार्यात मग्न होवून जाईल. एकाग्रता वाढेल आपसूकच कामे वेळेत आणि गुणवत्तेसह पूर्ण होण्यास मदतच मिळेल. अगदी सर्व मंडळी जरी अजून मोबाईल च्या आहारी नाहीत गेलेली पण जे रोज दिसतं ते पाहिल्यावर वाटत कि जर खरचं एक दिवस मोबाईल हरवला तर...... तुम्हाला काय वाटतं काय होईल? तुम्हाला त्याचा काय त्रास होईल असे वाटते , व्यक्त व्हा कमेंट मध्ये.

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर 

इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?