स्लाईड शेयर – शेअरिंग टूल
इंटरनेटच्या वापरामुळे जग खूप जवळ आले आहे म्हणतात, खरचं आहे म्हणा त्यात काही चुकीच अस नाहीच. एखाद्या व्यक्तीस काही माहिती शेयर करायची असल्यास चुटकीसरशी शेयर करता येते. यात काही नाविण्य आता राहिले नाही पण हि छोटीसी बाब खूप महत्वाच काम करून जाते कधी कधी. इंटरनेट चा वापर फक्त करमणुकी साठी न करता तो सर्वव्यापी होणे आपल्याला जास्त फायदेशीर ठरत. नाहीतर बऱ्याच वेळा फक्त करमणूक एवढाच इंटरनेट चा वापर पहायला मिळतो, तसे होवू नये हि आपणा सर्वांची जबाबदारी आहे आणि ती आपण घ्यायला हवी, हो ना ? आज अशाच इंटरनेट च्या एका वापरा विषयी आपण जाणून घेणार आहोत.
मिलिंद आणि श्रीकांत दोघे एका कंपनीत
काम करीत आहेत. श्रीकांत ने या कंपनीत जॉईन व्हायच्या अगोदर संगणक कोर्स पूर्ण
केला आहे. त्यामुळे त्यास संगणक हाताळण्याची तांत्रिक पद्धत चांगली अवगत झालेली
आहे. एके दिवशी साहेबांनी मिलिंद ला एक प्रेझेन्टेशन तयार करायला सांगितले आणि ते
प्रेझेन्टेशन सर्व कर्मचाऱ्यासोबत शेयर करायला सांगितले. मिलिंद ला हा विषय नवीन
होता, त्यास काही कळेना काय करावे? कस करावे? तो साहेबांच्या केबिन मधून बाहेर
पडला आणि थेट श्रीकांत कडे गेला व त्यास साहेबांनी काय करायाला सांगितले आहे याची
पूर्ण माहिती दिली. सर्व माहिती ऐकताच श्रीकांत म्हणाला, “मिलिंद, खूपच सोप काम
दिलयं तुला, साहेबांनी.”, मी आहे ना कशाला काळजी करतोस. श्रीकांत च्या या
शब्दांमुळे मिलिंद ला धीर मिळाला.
श्रीकांत म्हणाला, इंटरनेट च्या
सहाय्याने आता कुठलिही फाईल सहज शेयर करता येते. फाईल साईज कमी असल्यास तो ई-मेल
देखील करता येतो अन्यथा विविध वेब साईट च्या सहाय्याने आपण हे साध्य करू शकतो.
अशाच प्रकारची एक वेब साईट आहे ज्यावर तू तुझं प्रेझेन्टेशन शेयर करू शकतो. ती
म्हणजे स्लाईडशेयर. स्लाईडशेयर २००६ मध्ये सुरु झालेली वेब साईट आहे. प्रामुख्याने
या साईट चा उद्देश च प्रेझेन्टेशन शेयर करणे हा होता. कंपनी च्या सर्व
कर्मचाऱ्यांना त्यांनी तयार केलेल्या प्रेझेन्टेशन्स सहज शेयर करता याव्यात या
साठी हि साईट सुरु केली गेली. जसं आपण यु ट्यूब वर एकाच ठिकाणी विविध व्हिडीओ
पाहतो तसच अगदी त्याच प्रकारे विविध प्रकारची प्रेझेन्टेशन्स हि या वेब साईटवर तुम्हाला
उपलब्ध होतात. स्लाईडशेयर आता लिंकडीन ने खरेदी केली आहे. या साईट वर अपलोड केलेले
शेयर केलेले प्रेझेन्टेशन तुमच्या स्मार्ट फोन वर देखील तुम्ही पाहू शकता आणि काही
बदल करायचे झाल्यास त्वरित सुचवू शकता.
अजून एक महत्वाच, गुगल ने डॉक्युमेंट,
स्प्रेडशीट आणि प्रेझेंटेशन प्रोग्राम ऑनलाईन स्वरुपात दिले आहेत. हे प्रोग्राम युजर
ऑनलाईन वापरू शकतो आणि आवश्यकतेनुसार डॉक्युमेंट तयार करू शकतो. याला गुगल सूट असे
म्हणतात. हे सूट युजरला ऑनलाईन वापरता येते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे इतर
लोकांबरोबर तुम्ही एकाच वेळी शेयर करू शकता. एकाच वेळी हवे ते बदल युजर यात करू
शकतो अर्थात ऑनलाईन, आहे ना गम्मत ? गुगल स्लाईड युजरला विविध टेम्पलेट देते
ज्यामुळे विविध डिझाईन्स वापरता येतात, विडीयो, ऑडीओ, विविध प्रकारचे फॉन्ट,
एनिमेशन ची सुविधा देखील गुगल स्लाईड देते. हे करीत असताना तयार केलेले प्रेझेंटेशन आपल्या मित्रांसोबत रिअल टाईम (ऑनलाईन) एडीट
करता येते. चॅट करता येते कमेंट टाकता येतात. हे सर्व करीत असताना “सेव्ह” वर
क्लिक करायची गरज नाही. मिलिंद म्हणाला, काय तरी सांगतो, म्हणे “सेव्ह करायची गरज
नाही,” कॉम्प्युटर ला कसे कळणार आपला डेटा सेव्ह करायचे ? यावर श्रीकांत म्हणाला
अरे, गुगल ने हि सोय केलेली आहे. तुमचा तयार केलेला डेटा आपोआप
सेव्ह होतो. आणि हा डेटा कुणी सेव्ह केला याची नोंद देखील गुगल ठेवतो. झालेले बदल
हे तारखेवार वर्गीकरण करून युजरला उपलब्ध केले जातात. आणि आता सर्वात महत्वाचे आपण
तयार केले प्रेझेंटेशन हे मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट मध्ये देखील आपण उघडू शकतो. हे
वापरण्यासाठी आवश्यकता एकच तुझ्याकडे जी-मेल चा ई-मेल आय डी हवा, मग काय, सुसाट
सुटायचं !! आणि मिलिंद अजून एक गोष्ट तुला सांगतो गुगल चा यासाठी एक अॅप आहे तो जर
वापरला तर इंटरनेट कनेक्शन देखील लागत नाही.
याच प्रकारात द इंटरनेट, स्पीकर डेक,
स्लाईडस, स्लाईड स्नॅक अशा अनेक वेब साईट तुला मिळतील. मिलिंद ने श्रीकांत च्या
मार्गदर्शना प्रमाणे प्रेझेन्टेशन तयार केले आणि त्याच्या साहेबाना दाखविले. साहेब
मिलिंद च्या कामावर खुश झाले आणी त्यांनी मिलिंद ला शाबासकी दिली आणि सर्व
कर्मचाऱ्यां समोर कौतुक देखील केले.
अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर
wawa.... great.
उत्तर द्याहटवामिलिंद ऐवजी महेश बाबर असे नाव हवे होते....मित्राचं
खुप छान..लेख
श्रीकांत सर - नीलची शाळा.
Nice..👍
उत्तर द्याहटवा