फॉलोअर

व्हिजिटिंग कार्ड

 

वेळ संध्याकाळची, बाहेर अगदी मन हर्षून जाण्यासारख वातावरण पडल होत. मी असाच फिरायला म्हणून बाहेर पडलेलो. रुटीन मुळे तसा थोडा वैतागलेलाच होतो मी पण आज बॉस ने अगदी केबिन मध्ये बोलावून सांगितले, “रमेश उद्या तुम्हाला एक दिवस सुट्टी मंजूर केलेली आहे, तुमच्या कामावर साहेब (आमचे डायरेक्टर साहेब) खूपच खुश आहेत, म्हणून तुम्हाला एक दिवस सुट्टी मंजूर करण्यात आलेली आहे. “सुट्टी म्हणजे काय?” तर मागितलेली रजाच मंजूर झाली होती ती ! मी घरी पोहोचलो, घरात आई नेहमीप्रमाणे देवळात गेलेली , बाबा अजून ऑफिस मधून यायचे होते आणि बहीण “अश्विनी” ती काय घरात असून नसल्या सारखीच कारण इयत्ता बारावीच वर्ष !!

          दुसरे दिवशी रजा असल्याने संध्याकाळ मिळाली होती आणि तीही निवांत होती . त्यामुळे फेरफटका मारायला मी बाहेर पडलो. आम्हाला फक्त सूर्य उगविताना कसा दिसतो हेच माहिती तो मावळतो सुद्धा याची कल्पना नाहीच मुळी पण आज तो मावळताना पहिल्यांदाच पाहिलं, निसर्गाच खर रूप जे शब्दात वर्णन करता येणार नाही असं. पाखर आपल्या घरी परतत होती. प्रत्येकाच एकच लक्ष होत , घर !! प्रत्येकजण दिवसभराच्या कामामुळे वैतागलेला, कंटाळलेला हे सर्व मी बागे शेजारच्या कट्टयावर बसून पहात होतो, तेवढ्यात एक सद्गृहस्थ (अर्थात दिसायला तरी) माझ्या शेजारी येवून बसले आणि मला लागलेल्या तंद्रीस भंग केले.

          “मी प्रकाश, हॅलो !” त्याने आपला परिचय देत हात पुढे केला, मी हि माझा परिचय दिला. काही ओळख नसताना सुद्धा मी आणि तो गृहस्थ जवळ जवळ एक तास गप्पा मारत होतो. शेवटी ट्रॅफिक जॅम च्या गोंगाटा मुळे मला वेळेची जाणीव झाली आणि मी निघायचा विचार केला, “चलो फिर मिलेंगे. बाय” एवढे बोलून मी निघालो पण तेवढ्यात तो कार्ड पुढे करीत म्हणाला , हे बघ माझे कार्ड, कधी जरुरत पडली तर भेट, त्यात माझा फोन नंबर सुद्धा आहे.” मी कार्ड घेवून न वाचताच खिशात ठेवून काढता पाय घेतला. आणि मग घरचा रस्ता चालताना डोक्यात विचार यायला सुरुवात झाली, कोण होता तो? माझ्यासोबत जुनी ओळख असल्याप्रमाणे का बोलत होता? या विचारात घर कधी आले ते कळालेच नाही.

          घरात आई व बाबा आलेलेच होते. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद थोडा मावळत्या सूर्याप्रमाणे मावळलाच होता. बाबांनी ते लागलीच हेरले आणि मला विचारणा केली, “काय रमेश काय झाल?, एनी प्रॉब्लेम  ? मी लागलीच कोरड्या शब्दात उत्तर दिले, “नो नथिंग”....

          मी फक्त एकच विचार करत होतो या जगात कुणी स्वार्थ असल्याशिवाय कुणाशीच बोलत नाही मग हा प्रकाश, कोण, कुठला कुणास ठाऊक, पण एवढा जीवाभावासारखा का बोलला? त्या दिवशीची संध्याकाळ, रात्रीत उलटून सकाळ सुद्धा झाली तरी मी एकाच विचारात होतो, “कोण होता तो?” एका परक्या माणसास माझी एवढी माहिती असण म्हणजे थोडस विचित्रच होत. त्याने माझ्या घरातील सर्वांची चौकशी केली होती त्यामुळे एखाद्या कोळ्याच्या जाळ्यात अडकल्यासारख वाटत होत, मला, मला या जाळ्यातून बाहेर कसा पडू ? या विचारान मला क्षणाचीही उसंत मिळू दिली नाही.माझी पूर्ण रजा याच विचारात गेली पण कोडे काही सुटले नाही.

घरात आणि फॅक्टरी मध्ये माझ लक्ष लागेना शेवटी दुसरे दिवशी फॅक्टरी मधून घरी जाताना एका सुंदरशी कार माझ्या जवळ येवून थांबली, आत प्रकाश होता, “हाय रमेश, चल बस मी सोडतो तुला घरी.” प्रकाश म्हणाला.मी थोड चाचरत उत्तर दिले, नको बस आहे, मी जाईन... तसा तो अधिकार वाणीने म्हणाला, “ओ कमऑन यार !! चल लवकर बस” त्याची हि अधिकार वाणी मला नाकारता आली नाही मी कार मध्ये बसलो. आणि काही तरी बोलायचे म्हणून मी म्हणालो, “अरे , आज माझी गाडी सर्व्हिसिंग ला दिली आहे.” त्याने फक्त “हम्म” एवढच उत्तर दिले. परत एकदम शांतता मलाच राहवेना मी त्याला धीर एकवटून विचारलेच, तुला माझ्या बद्दल एवढ कस माहिती?” त्यावर जोर जोरात हसू लागला... मला काही कळेना तो काय हसतोय ? तेवढ्यात घर जवळ आलं.

          मी काही म्हणायच्या आत त्याने गाडी थांबवली देखील आणि स्वत: गाडीतून उतरून माझ दार उघडत म्हणाला, “या रमेश राव या !!!!” मी अजूनच चक्रावून गेलो, मला काहीच समजेना !! माझा हात पकडून तो मला माझ्याच घरात घेवून जात होता.....आणि माझ्या डोक्यात चित्र विचित्र विचारांचा खेळ सुरु होता....त्याने बेल वाजविली आईने दार उघडले !!! आणि आई हि हसू लागली...बाबा सोफ्यावर होते आम्हाला दोघाना पाहताच बाबाही हसू लागले....तेवढ्यात अश्विनी आली तिने प्रकाश ला पंच देत टाळी दिली. आता मात्र मला काहीच कळेना....मी बाबांना विचारले , “बाबा काय प्रकार आहे?” प्रकाशला तुम्ही ओळखता ?” बाबा म्हणाले हो ओळखतो !!!!! हे काय बाबा मला सांगाल , अरे हो हो , तुझा स्वभाव कधी बदलणार किती विचार करतोस, बाबा म्हणाले, प्रकाश तुला भेटला त्याने तुला त्याचे कार्ड देखील दिले पण ते तू न वाचताच खिशात ठेवले आणि परत पाहिले देखील नाही... आणि माझ्याशी  किंवा घरात कुणाशीच न बोलता संपूर्ण रजा विचारात घालवलीस. दादा , अरे एवढा विचारात मग्न होतास कि त्या दिवशी मी आणि प्रकाश दादा आम्ही दोघे परत बागे जवळ भेटलो हे हि तुझ्या लक्षात आले नाही. अश्विनी पुढे येत म्हणाली. प्रकाश दादा ??? आता मात्र मी पार गोंधळून गेलो काय चालले आहे हे काही कळेना. पण एका गोष्टीचे समाधान वाटले कि घरात प्रकाश ला मी सोडून सगळे ओळखत होते. पण तरी प्रश्न होताच , “कोण आहे हा प्रकाश?” एवढ्या वेळ शांत असलेली आई पुढे झाली आणि म्हणाली, रमेश, प्रकाश हा तुझा चुलत भाऊ !! आणि तू कसा विसरलास ? आईला थांबवत प्रकाश म्हणाला, रमेश अरे तुला मी माझ व्हिजिटिंग कार्ड दिल ते तरी पहायचं , पण ते तू केल नाहीस...

          मला आता कळून चुकल होते कि आपला स्वभाव या सर्व गोष्टीना आमंत्रण देणारा ठरला. व्हिजिटिंग कार्ड पाहिलं असत तर लागलीच सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळाली असती पण ..... मग हि सगळी उठाठेव का केली? मी सगळ्याना विचारले, आई बाबांनी अश्विनी कडे बोट दाखविले, आणि बाबा म्हणाले तुझ्या रोजच्या रुटीन मुळे हसणे विसरला होतास, मागील दोन दिवसापूर्वी प्रकाश अमेरिकेहून आला आणि आपल्या घरी आला, तो लहानाचा मोठा अमेरिकेतच झाला त्यामुळे आपला संपर्क फारसा नव्हता. मग अश्विनी आणि प्रकाश यांनी हि गम्मत करायची ठरविली. आता हसायची पाळी माझी होती, त्याच वेळी मी अश्विनी कडे पाहिले तर ती व्हिजिटिंग कार्ड मला दाखवत वेडावत होती.

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर


इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?